Posts

Showing posts from October 23, 2023

म्हसळा हादरला.... म्हसळ्यात गो-हत्या, आरोपीला पोलिसांनी पकडले

Image
म्हसळा हादरला.... म्हसळ्यात गो-हत्या, आरोपीला पोलिसांनी पकडले    म्हसळा (रायगड मत) म्हसळा तालुक्यातील वरवठणे येथे गोहत्याचा प्रकार घडला मात्र वरवठणे पंचक्रोशीतील हिंदू बांधवांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस आली. त्याची तक्रार म्हसळा पोलीस ठाणे येथे केल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री सोनवणे यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणावर प्रत्यक्ष जाऊन मुद्देमालासह आरोपी याला अटक करून गजाआड केले आहे. तरी तालुक्यातील सर्व बांधवांनी याबाबत सतर्क राहून गो रक्षण करावे आणि अशा घटना आपल्या परिसरात निदर्शनास आल्यास बांधवांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा आणि आपल्या हिंदू देवतेची गो मातेचे रक्षणासाठी सतर्क राहावे. काल घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोपी याला अटक केल्याबद्दल श्री सोनवणे आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देताना दिसत आहेत. मुळात हे असले बेकायदेशीर आणि समाजासाठी घातक अश्या घटना घडतातच कश्या? कोण आहे याच्या पाठीशी असा प्रश्न सद्या चर्चीला जातं आहे. या रायगड जिल्ह्यात 7 आमदार हिंदू, खासदार हिंदू आहेत. तसेच अनेक हिंदू समाज संघटना आहेत. मात्र तरीही कसलीही भीती या समाज कंटकांना नाही