Posts

Showing posts from October 18, 2023

खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू.. महादेव पाटील म्हणजे स्वच्छता दुतच.. ग्रामपंचायत पेक्षा लोकांनी मानले आभार..

Image
खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू.. महादेव पाटील म्हणजे स्वच्छता दुतच.. ग्रामपंचायत पेक्षा लोकांनी मानले आभार.. म्हसळा (रायगड मत) खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे शासनाच्या स्वछता अभियानाला खऱ्या अर्थाने या मंडळाने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे दिसून येतो आज द  घटस्थापना सणाच्या निमित्ताने गावदेवी मंदिर रस्ता आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच मुख्य रस्त्याला लगत वाहनांना अडसर असणारी झाडे झुडपे स्वच्छ करण्यात आली शासनाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत जसा आपण सर्व ग्रामस्थ सहभागी होतो त्याच प्रमाणे गावाची स्वच्छता करण्यासाठी जनसेवा मंडळ कार्यरत आहे त्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला तर गाव चांगल्या प्रमाणात स्वच्छ राहील गावात साथीचे आजार पसरण्यास आळा बसेल या मंडळाने पुढाकार घेऊन स्वच्छतेचे व्रत घेतले आहे त्यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा आणि गाव स्वच्छ करण्यासाठी शासनाला आणि मंडळाला सहकार्य करावे आजच्या स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यासाठी श्री महादेव पाट

सेंट्रल पार्क नावामध्ये 'मुर्बी' गावाचा उल्लेख करा- आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे पुनर्मागणी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची भेट घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची केली मागणी पनवेल (प्रतिनिधी) बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे उन्नत मार्गावरील 'सेंट्रल पार्क' स्थानक' या नावामध्ये 'मुर्बी' गावाचा उल्लेख करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची मुंबईत भेट घेऊन केली. खारघर नोड अंतर्गत मुर्बी हे जवळपास दहा हजार लोकवस्ती असणारे गाव पूर्वीपासूनच नावलौकिकास आहे. सिडको तर्फे 'नवी मुंबई मेट्रो' प्रकल्पांतर्गत बेलापूर ते पेंधर हा उन्नत मार्ग उभारण्यात आला आहे. या मधील सात क्रमांकाचा स्थानक मुर्बी गावात असतानाही त्या स्थानकाला सिडकोने सेंट्रल पार्क नाव दिले. त्यामुळे यापूर्वीच लोकप्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर आणि तत्कालीन नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी ०६ डिसेंबर २०२१ रोजी सिडकोला निवेदन देऊन या स्थानकाच्या नावात 'मुर्बी' गावाचा उल्लेख करण्याची मागणी केली होती. सिडकोने या संदर्भात चालढकलपणा केल्यामुळे नावात बदल झाला नाही. सिडकोच्या या मनमानी कारभाराला आमदार प्रशांत ठाकूर व मुर्बी ग्रामस्थांनी विरोध केला असून आपल्या गावाची अस्मिता जपण्यासाठी तसेच या स्टेशनला मुर्बी गाव स्टेशन असे नाव देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी झालेल्या लाक्षणिक उपोषणाला उपस्थित राहून ग्रामस्थांना पाठिंबा दिला होता. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्या अनुषंगाने सोमवारी (दि. १६) आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची निर्मल भवन येथे भेट घेऊन मुर्बी गावाचे नाव स्थानकाला देण्यासंदर्भात पुनर्मागणी करत तातडीने कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली तसेच मागणीचे स्मरण पत्रही दिले.

Image
सेंट्रल पार्क नावामध्ये 'मुर्बी' गावाचा उल्लेख करा- आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे पुनर्मागणी   सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची भेट घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची केली मागणी  पनवेल (प्रतिनिधी) बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे उन्नत मार्गावरील 'सेंट्रल पार्क' स्थानक' या नावामध्ये 'मुर्बी' गावाचा उल्लेख करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची मुंबईत भेट घेऊन केली.                खारघर नोड अंतर्गत मुर्बी हे जवळपास दहा हजार लोकवस्ती असणारे गाव पूर्वीपासूनच नावलौकिकास आहे. सिडको तर्फे 'नवी मुंबई मेट्रो' प्रकल्पांतर्गत बेलापूर ते पेंधर हा उन्नत मार्ग उभारण्यात आला आहे. या मधील सात क्रमांकाचा स्थानक मुर्बी गावात असतानाही त्या स्थानकाला सिडकोने सेंट्रल पार्क नाव दिले. त्यामुळे यापूर्वीच लोकप्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर आणि तत्कालीन नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी ०६ डिसेंबर २०२१ रोजी सिडकोला निवेदन देऊन या स्थानकाच्या

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले 88 व्या स्मृतिदिनानिमित्त येवला येथे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

Image
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले 88 व्या स्मृतिदिनानिमित्त येवला येथे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन  पनवेल,(वार्ताहर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 19 35 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. या घटनेच्या 88 व्या स्मृतिदिनानिमित्त येवला येथे देशभरातील आंबेडकरी जनतेने उपस्थित राहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले . स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे सुद्धा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता उपस्थित राहिले होते .                   त्या प्रसंगी महाराष्ट्र संघटक भगवान गरुड, मुंबई सेनेचे विजय जाधव रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अरुण धिवर, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिपक धिवर, व इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते . या कार्यक्रमाकरिता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय

कोल्ही गाव हे स्वतंत्र गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांची खा.श्रीरंग बारणे यांच्याकडे मागणी

Image
कोल्ही गाव हे स्वतंत्र गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांची खा.श्रीरंग बारणे यांच्याकडे मागणी पनवेल (वार्ताहर) : कोल्ही गाव हे स्वतंत्र गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी खा. श्रीरंग बारणे यांच्याकडे  निवेदनाद्वारे  केली आहे.                 सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांच्यासह, हितेश नाईक, साहिल नाईक आदींनी खा. श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांना सरपंच  अहिल्या बाळाराम नाईक यांच्या मागणीचे हे पत्र दिले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि ग्रुपग्रामपंचायत पारगाव ता. पनवेल हद्दीत कोल्ही हे गाव आंतरराष्ट्रीय विमानतळात मोडत असल्याने त्याचे पुनर्वसन झाले आहे. सदरचे पुनर्वसन वडघर हद्दीतील झाले आहे. तरी सदरचे कोल्ही गाव म्हणून घोषित करावे व त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच यावेळी ग्रामसभा ठराव प्रत सुद्धा जोडली आहे. या निवेदनाची खा. श्रीरंग बारणे यांनी दखल घेत या मागणी संदर्भात  स्वतःचे पात्र तयार करून ते मा. जिल

३३ गंभीर दाखल असलेल्या आरोपीस पनवेल शहर पोलीस व उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी युनिटने संयुक्त कारवाईत केली अटक*

Image
३३ गंभीर दाखल असलेल्या आरोपीस पनवेल शहर पोलीस व उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी युनिटने संयुक्त कारवाईत केली अटक* पनवेल (संजय कदम): उत्तर प्रदेश येथील गॅगस्टर अॅक्टचे ३ गुन्हे, दुहेरी खुनासह दरोडा एक गुन्हा दरोडयाचे तीन गुन्हे, हत्येचा प्रयत्न, ७ गुन्हे जबरी चोरी व इतर असे एकुण ३३ गंभीर गुन्हे दाखल असलेला, उत्तर प्रदेश सरकारचे ५० हजारांचे बक्षिस जाहीर असलेला फरार आरोपीत यांस पनवेल शहर पोलीस व उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी युनिट यांचे संयुक्त कारवाईत अटक.        उत्तर प्रदेश येथील एकुण ३३ गंभीर गुन्हे दाखल असलेला तसेच उत्तर प्रदेश सरकारचे ५० हजारांचे बक्षिस जाहीर असलेला फरार आरोपीत नामे हारिस उर्फ छोटू अब्दुल अजीज, रा. मुडीयार, यांस पनवेल शहर पोलीस व उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी यांचेसह संयुक्त कार्यवाहीत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, यांनी पनवेल शहर पोलीस ठाणेकडील खास पथक तयार करून उत्तर प्रदेश स्पेशल

पनवेल तालुका पोलिसांची जबरदस्त कामगिरी अवघ्या १५ दिवसात महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या २ टोळ्यांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

Image
पनवेल तालुका पोलिसांची जबरदस्त कामगिरी  अवघ्या १५ दिवसात महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या २ टोळ्यांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड पनवेल (संजय कदम): अवघ्या १५ दिवसांत पनवेल परिसरातील एक्सप्रेस महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या २ वेगवगेळ्या टोळ्यांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.   पनवेल जवळील पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील जेएनपीटी पनवेल एक्झिट येथे लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकासह त्याच्या भावाला अज्ञात त्रिकुटाने मारहाण करून लुटल्याची घटना ४ दिवसांपूर्वी घडली होती. त्यामध्ये ट्रक चालक असीर मो. बशीर खान (51) हा त्याचा भाऊ हे त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र.एमएच-43-वाय-7123 हे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील जेएनपीटी पनवेल एक्झिट येथे थांबून लघुशंकेकरिता गेले असता तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांना धक्काबुक्की व हाताने मारहाण करून त्याच्या भावाकडून व त्यांच्या ट्रकमधून रोख रक्कमेसह मोबाईल फोन असा मिळून जवळपास 15 हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरीने चोरुन ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यातक्रारी न

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केला मोठ्या प्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा गाडीसह हस्तगत

Image
गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केला मोठ्या प्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा गाडीसह हस्तगत पनवेल,  (संजय कदम) ः गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने खिडूूकपाडा गावाच्या हद्दीतील प्रशांत ढाब्यासमोरील स्टील मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावर एक गाडी अडवून त्यामध्ये असलेला मोठ्या प्र्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा हस्तगत केला आहे. गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनी उमेश गवळी यांना खास बातमीदाराकडून खिडूकपाडा गावाच्या हद्दीत गुटख्याचा साठा घेवून गाडी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस हवालदार अनिल पाटील, पो.हवा.सचिन पवार, पो.हवा.निलेश पाटील, इंद्रजित कानू, सागर रसाळ, पोलीस शिपाई चालक विक्रांत माळी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून एका इसमास गाडीसह थांबविले असता त्याच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने त्याच्या विरोधात आरोग्यास अपायकारक असा महाराष्ट्रात विक्री, साठवणूक व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ बेकायदेशीररित्या व मानवी शरिरास घातक व लोकजिवीतास धोका