Posts

Showing posts from October 13, 2023

# पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे; पण लिखाणात सुसंस्कृतपणा हवा, असा टोमणा तटकरे यांनी राऊत यांना हाणला. # अजित पवार यांच्याविषयी जबाबदारीने बोलत जावे, सुनील तटकरे यांनी संजय राऊत यांना सज्जड दम # ‘सामना’ या मुखपत्रात राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तटकरे यांनी घेतला खरपूस समाचार. # श्रीवर्धन मतदार संघात कोण? शिवसेना कि राष्ट्रवादी शिवसेना कुठली? राष्ट्रवादी कुठली? मतदार झाले संभ्रमित

Image
# पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे; पण लिखाणात सुसंस्कृतपणा हवा, असा टोमणा तटकरे यांनी राऊत यांना हाणला. # अजित पवार यांच्याविषयी जबाबदारीने बोलत जावे, सुनील तटकरे यांनी संजय राऊत यांना सज्जड दम  # ‘सामना’ या मुखपत्रात राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तटकरे यांनी घेतला खरपूस समाचार. # श्रीवर्धन मतदार संघात कोण? शिवसेना कि राष्ट्रवादी शिवसेना कुठली? राष्ट्रवादी कुठली? मतदार झाले संभ्रमित  मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका करताना सभ्य भाषा वापरावी. अजित पवार यांच्याविषयी बोलताना अथवा लिहिताना त्यांनी आपली पातळी सोडू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे. ‘सामना’ या मुखपत्रात राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तटकरे यांनी समाचार घेतला. अजित पवार यांचा उल्लेख संजय राऊत ‘सिंचनदादा’ म्हणून करत आहेत. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार हे उत्तम काम करीत आहेत, असे हेच संजय राऊत म्हणत होते. अजित पवार यांच्या प्रशासनावर असलेल्या हुकमतीविषयी राऊत त्यांचे कौतुक क

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार; भाजप महायुतीचा महाविजय होणार; मावळ सर्वाधिक मतांनी जिंकणार

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार;  भाजप महायुतीचा महाविजय होणार;  मावळ सर्वाधिक मतांनी जिंकणार   - प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  पनवेल (प्रतिनिधी) देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातील आपल्या महायुतीचा उमेदवार सर्वात जास्त मतांनी विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि. ११ ) येथे व्यक्त केले.        भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील आणि रायगड जिल्हयात येणाऱ्या पनवेल, उरण, कर्जत विधानसभा मतदार संघाचा कार्यक्रम पनवेल येथे संपन्न झाला.        या का

नवीन पनवेलमध्ये ’होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमांतर्गत भाजपच्या मनमानी कारभाराचा रहिवाशांनी केला निषेध

Image
नवीन पनवेलमध्ये ’होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमांतर्गत भाजपच्या मनमानी कारभाराचा रहिवाशांनी केला निषेध  पनवेल,  (संजय कदम) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा आता पर्दाफाश करण्याची वेळ आली असून, फसव्या योजनांविरोधात ’होऊ जाऊ दे चर्चा’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या गावागावात झाला पाहिजे, या अनुषंगाने पनवेल जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या आदेशाने तसेच नविन पनवेल शहरप्रमुख  यतिन देशमुख आणि संघटिका अपूर्वा प्रभू यांच्या नेतृत्वात पनवेल विधानसभा-188 मधील नविन पनवेल शहरात सेक्टर 9 , द्वारका चौक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वाढती महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती यावरून सरकारवर संधान साधण्यात आले. या प्रसंगी तालुकाप्रमुख संदीप तांडेल , उपमहानगर प्रमुख किरण तावदरे, शहरप्रमुख यतीन देशमुख, संघटीका अपूर्वा प्रभू, शहर समन्वयक शिवाजी पालांडे , विभाग प्रमुख बिपीन झुरे , उपतालुका संघटिका सुगंधा शिंदे, तनुजा झुरे ,उपशहर संघटिका मालती पिंगळा , विभाग संघटिका वैशाली थळी, शाखाप्रमुख शाम

प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून* *बालविवाह, मानवी तस्करी सारख्या घटना रोखण्याचा प्रयत्न करावा.* *- डॉ.गणेश व. मुळे*

Image
*प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून*  *बालविवाह, मानवी तस्करी सारख्या घटना रोखण्याचा प्रयत्न करावा.*                                                                              *- डॉ.गणेश व. मुळे*  नवी मुंबई,  : समाजातील प्रत्येक नागरिकांने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बालविवाह , मानवी तस्करी सारख्या घटनांबाबत सतर्क राहून अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी केले.   आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, देशभरात सुरु असलेल्या ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट पेण आणि सोहम फाऊंडेशन,पनवेल यांच्यावतीने भुवन रिभू यांनी लिहिलेल्या “व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन टिपिंग पॉईंट टू एन्ड चिल्ड्रन मॅरेज” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. यावेळी पेणच्या महाराष्ट्र सामजिक विकास ट्रस्टचे संस्थापक मनोज गांवड, विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव-पाटील, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, पत्रकार राजेश प्रधान, तसेच विभागीय माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.  डॉ.गणेश मुळे म्हणाले की,

खड्ड्यांना हार घालून मा.नगरसेवक रवींद्र भगत यांनी केले कळंबोली वसाहतीमध्ये अनोखे आंदोलन

Image
खड्ड्यांना हार घालून मा.नगरसेवक रवींद्र भगत यांनी केले कळंबोली वसाहतीमध्ये अनोखे आंदोलन पनवेल,  ः कळंबोली वसाहतीमधील विविध भागात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात तेथील स्थानिक मा.नगरसेवक रवींद्र भगत व त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून रस्त्यांना हार घालून अनोखेे आंदोलन करून पनवेल महानगरपालिकेचा निषेध केला. कळंबोली वसाहतीमधील अनेक रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत स्थानिक मा.नगरसेेवक रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेला वेळोवेळी स्मरण पत्र देवून खड्डे बुजविण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु या मागणीला महानगरपालिकेने अजूनही दुर्लक्षितच ठेवले आहे, असा आरोप रवींद्र भगत यांनी केला आहे. नुकतीच कळंबोली वसाहतीसाठी महापालिकेने 300 कोटींच्या कामांना मंजूरी दिली आहे. याचे श्रेय भाजपा घेत असेल तर रस्त्यावरील खड्ड्यांचे श्रेय देखील भाजपनेच घ्यावे असे सुद्धा रवींद्र भगत यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांच्या समवेत मा.नगरसेवक गोपाळ भगत व इतर पदाधिकारी, महिला आघाडी यावेेळी उपस्थित होत्या. फोटो ः रस्त्यांना घातलेले हार