Posts

Showing posts from October 10, 2023

# प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा # विधानसभा वॉरियर्सची बैठक घेणार म्हणजे आमदारकी खासदारकी एकत्र होणार कि काय? # अत्यंत महत्वाची सभा होणार...

Image
# प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा # विधानसभा वॉरियर्सची बैठक घेणार म्हणजे आमदारकी खासदारकी एकत्र होणार कि काय? # अत्यंत महत्वाची सभा होणार... पनवेल (प्रतिनिधी) महाविजय २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवारी (दि. ११) पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार आहे.   भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ३३ मावळ लोकसभा मतदार संघात बुधवारी त्यांचा दौरा होणार असून त्यांच्या या दौर्‍याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.          सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाब

# गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन लवकरच # चला मेट्रो ने जाऊ या.... हुश्श!!! झाली बुवा एकदाची.. # तळोजाकडे जाणाऱ्या लोकांनी सोडला मोकळा श्वास..... # येत्या नवरात्र उत्सवात सुरु होऊ शकते मेट्रो # पनवेलकर होणार खूष, दसरा दिवाळीची जबरदस्त भेट # आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष प्रयत्न.

Image
# गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन लवकरच # चला मेट्रो ने जाऊ या.... हुश्श!!! झाली बुवा एकदाची.. # तळोजाकडे जाणाऱ्या लोकांनी सोडला मोकळा श्वास..... # येत्या नवरात्र उत्सवात सुरु होऊ शकते मेट्रो # पनवेलकर होणार खूष, दसरा दिवाळीची जबरदस्त भेट # आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष प्रयत्न.... नवी मुंबई (रायगड मत) नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते मेट्रोचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याचे कलेक्टर योगेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटन सोहळा कधी असेल याची तारीख निश्चित्त करण्यात आली नाहीये. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणत्याही निश्चित तारखेची घोषणा केली नाहीये. 21 जून रोजीच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सिडकोला मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळं बेलापूर ते पेंढरपर्यंत मेट्रो सेवा सुरू केली जाऊ शकते. तशी तयारीही मेट्रोने सुरू केली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 3063 कोटींचा असल्याची शक्यता वर्

भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन - नवी मुंबई पोस्टमास्तर गणेश व्ही सावळेकर

Image
भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन - नवी मुंबई पोस्टमास्तर गणेश व्ही सावळेकर पनवेल (संजय कदम) : ग्राहकांना नव्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत आपल्या विविध सेवांबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय टपाल सप्ताह उत्सवाचा एक भाग म्हणून नवी मुंबई विभागात आधार शिबिरांसह, निबंधलेखन स्पर्धा, बचत योजनांबाबत जनजागृती तसेच लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती नवी मुंबईचे पोस्टमास्तर गणेश व्ही सावळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी नवी पनवेल येथील मुख्य पोस्ट कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.                    युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्टल दिवस साजरा केला जातो. लोकांच्या आणि व्यवसायाच्या जीवनात

सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेचे नियोजित अध्यक्ष मा. मंदारजी कवाडे साहेबयांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय काव्य संमेलन स्पर्धा संपन्न

Image
सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेचे नियोजित अध्यक्ष मा. मंदारजी कवाडे साहेबयांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय काव्य संमेलन स्पर्धा  संपन्न दि. ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी भव्य राज्य स्तरीय काव्य संमेलन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तरी  सर्व प्रथम संस्थचे कार्याध्यक्ष चिंतामणी जाधव माजी सचिव राजाभाऊ गमरे यांच्या हस्ते भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुध्दपुजा संपन्न झाली. या काव्य संमेलनात सहभाग घेतलेल्या सर्वच कवी आणि साहित्यकांच्या कवीतांनी अक्षरशः गाजवून सोडले. बहुजन चळवळीची दिशा आणि दशा काय आणि कशी आहे, हे प्रत्येक कवींच्या काव्य कल्पनेतून ऐकायला मिळाले.  (१) प्रथम क्रमांक - म्हसळा तालुक्यातील केलटे गावचे सुपुत्र कवी - विनायक जाधव यांनी पटकावली  (२) दुसरा क्रमांक - महाड तालुक्यातील मांडकी गावचे प्रख्यात कवी विजय पवार यांना मिळाला  (३) तिसरा क्रमांक - मंडणगड तालुक्यातील दहागाव या गावचे कवी सुरेश पवार यांनी मिळविला  (४)चौथा क्रमांक म्हणून उत्तेजनार्थ कवयित्री - संध्याताई गायकवाड यांना मिळाला.  या काव्य संमेलनाला प्रमुख पा