Posts

Showing posts from October 9, 2023

पनवेल महानगरपालिकेचे वृक्षप्रेम बेगडी, पोलिसांचा गुन्हे दाखल करण्यास विलंब आठ दिवसात गुन्हे दाखल न झाल्यास पालिका व पोलिस प्रशासना विरोधात आंदोलन करणार - डॉ.मुनीर तांबोळी

Image
पनवेल महानगरपालिकेचे वृक्षप्रेम बेगडी, पोलिसांचा गुन्हे दाखल करण्यास विलंब आठ दिवसात गुन्हे दाखल न झाल्यास पालिका व पोलिस प्रशासना विरोधात आंदोलन करणार - डॉ.मुनीर तांबोळी  पनवेल / प्रतिनिधी नवीन पनवेल येथील सेक्टर २ येथील नवभारत सोसायटी आवारातील ३७ झाडांची तर सेक्टर ३ येथील कर्णा सोसायटीने १ झाड, पनवेल येथील महापालिका समोरील दर्ग्या समोरील एक झाड, खारघर टोल नाका येथील अनेक वृक्ष कत्तल करण्यात आली होती. याबाबत महापालिकेने खांदेश्वर,पनवेल, खारघर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले होते. परंतु अजून एका ही पोलिस ठाण्याने एक ही गुन्हा अजूनही दाखल केलेला नाही. त्यामुळे असे वृक्षतोडीचे प्रकार सर्रास घडत आहेत. ही वृक्ष कत्तल व छाटणी करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. याबाबत मानवी हक्क संरक्षण फेडरेशचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ श्रेयस ठाकूर यांनी महापालिका, मुखमंत्री यांना  तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने त्या ठिकाणी जावून पंचनामा केला. परंतु पुढील कोणतीच कारवाई होत नसल्याने महापालिकेचे पंचनामे कागदावरच राहत आहेत.

ग्रामविकास जनसेवा मंडळ खारगाव खुर्द सकलप यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मनोहर पाटील ते भालचंद्र पाटील आणि कॄष्णा कानु मेंदडकर ते सुरेश मेंदडकर यांच्या घरापर्यंत रस्ता केला साफ.

Image
ग्रामविकास जनसेवा मंडळ खारगाव खुर्द सकलप यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मनोहर पाटील ते भालचंद्र पाटील आणि कॄष्णा कानु मेंदडकर ते सुरेश मेंदडकर यांच्या घरापर्यंत रस्ता केला साफ.  म्हसळा (रायगड मत)  दिनांक 9/10/2023सोमवार रोजी सकाळी ग्रामविकास जनसेवा मंडळ खारगाव खुर्द सकलप यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मनोहर पाटील ते भालचंद्र पाटील आणि कॄष्णा कानु मेंदडकर ते सुरेश मेंदडकर यांच्या घरापर्यंत रस्ता साफसफाई करण्यात आले या मंडळाने गेली 2 महिन्यापासून सुरू केलेला स्वछता मोहीम तसेच केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या स्वछ भारत मोहिमेचे सातत्य आमचा मंडळ सुरू ठेवणार आहे. ग्रामस्वच्छता हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य मनात असल्याची भावना यावेळी स्वछता दूत यांनी व्यक्त केली. त्या साठी श्री महादेवराव पाटील साहेब, मनोहर पाटील, मंगेश म्हात्रे, चंद्रकांत कांबळे, योगेश मेंदडकर, मुकेश पाटील, जयवंत खोत, भालचंद्र पाटील यांच्या सहभागाने करण्यात आले आपले शतशःहा आभार. गेली अनेक वर्ष ग्रामपंचायत निष्क्रिय ठरल्याची जोरदार चर्चा सद्या सगळीकडे चालू आहे. अशातच महादेव पाटील आणि सहकारी यांच्या समाजसेवे

पनवेलचा सनी टाक नेपाळच्या चॅम्पीयनशीप मध्ये 2 सुवर्ण पदाचा मानकरी....

Image
पनवेलचा सनी टाक नेपाळच्या चॅम्पीयनशीप मध्ये 2 सुवर्ण पदाचा मानकरी.... पनवेल (प्रतिनिधी) पनवेलचे राजेश टाक हे उत्तम स्वीमर व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या सनी व संदिप या दोन्ही मुलांना चांगल्या संस्काराबरोबरच एक उत्तम स्वीमींगचे योग्य प्रशिक्षण दिल्याने दोन्ही मुलांनी आई वडीलांचे नाव सातासमुद्रापलीकडेही चांगला नावलौकीक मीळविल्याने त्यांचे सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे. नुकताच युथ स्पोअर्ट डेव्हलपमेंन्ट फोरम आयोजीत रंगशाळा स्टेडीयम पोखरा नेपाळ येथे  नेपाळ इंन्टरनॅशल गेम्स चॅम्पीयन शीप सन 2023 चे आयोजन करण्यात आले होते या बहारदार कार्यक्रमास बांगलादेश,भुतान,श्रीलंका अशा विविध स्थरातुन अनेक मुले आपल्या स्कीलचे प्रात्यक्षीक दाखविण्या करीता सामील झाले होते या मध्ये पनवेलचा रहीवाशी असलेला सनी राजेश टाक यांनी 50 मी.ब्रेस्टस्ट्रोक व 50 मी.फ्री स्टाईल मध्ये दोन सुवर्ण पदके जिंकुन आणुन पनवेलचा नावलौकीक केल्याने सनी टाक वर विविध स्थरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

मानपाडा पोलीसांची कारवाई #सेक्स रॅकेट उध्वस्त / ७ बांगलादेशी महीलांची सुटका #५ बांगलादेशी आरोपीसह १ भारतीय गजाआड

Image
#मानपाडा पोलीसांची कारवाई #सेक्स रॅकेट उध्वस्त / ७ बांगलादेशी महीलांची सुटका #५ बांगलादेशी आरोपीसह १ भारतीय गजाआड पनवेल :  दिनांक ०५/१०/२०२३ रोजी बांगला देशातील एन. जी. ओ. च्या अधिकारी श्रीमती मुक्ता दास यांनी 'फिडम फर्म' या पुण्यातील सामाजिक संस्थेस ई मेल द्वारे कळविले की, राणा नांवाच्या इसमाने एका १९ वर्षीय बांगलादेशी महीलेस नोकरीला लावण्याच्या बहाण्याने बांगला देशामधुन भारत देशामध्ये आणुन हेदुटणे नांवाच्या गांवामध्ये तिला खोलीत डांबुन ठेवुन तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केले आहेत. असे ई मेल द्वारे कळविल्यानंतर दिनांक ०६/१०/२०२३ रोजी तिची सुटका करण्यासाठी 'फिडम फर्म' संस्थेतील समाजसेविका सौ. शिल्पा वानखेडे यांनी मानपाडा पोलीस स्टेशनला संपर्क साधुन मदतीची मागणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी ताबडतोब बांगलादेशी महीलेची सुटका करण्यासाठी पोलीस पथकाला मार्गदर्शन करून हेदुटणे गांवामध्ये रवाना केले. मानपाडा पोलीस पथकाने हेदुटणे गांवातील विठ्ठल रूक्मीणी मंदीराजवळ असलेल्या घर क्रमांक ३२ मध्ये रात्री १२ वा. सुमारास छापा टाकला असता सदर घराच्या तळमजल्यावर पिडीत म

पारगाव परिसरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी लवकरच सिडको सोबत बैठक लावणार- खा. श्रीरंग बारणे

Image
पारगाव परिसरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी लवकरच सिडको सोबत बैठक लावणार- खा. श्रीरंग बारणे पनवेल (संजय कदम): पारगाव परिसरातील नागरी समस्यांबाबत अनेक तक्रारी ग्रामस्थांकडून येत असून या समस्या सोडवण्यासाठी लवकरच सिडको सोबत बैठक लावणार असल्याचे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहे.        जय हनुमान सार्वजनिक मित्र मंडळ पारगाव व ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित गौर गणेशोत्सवाला भेट देताना खा. श्रीरंग बारणे यांनी केलेल्या भाषणात या विभागातील समस्या सोडवण्यासाठी सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा करत आहे व या पूढे सुद्धा करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी सरपंच तथा सदस्य निशा रत्नाकर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक, रत्नदीप पाटील, माजी उपसरपंच तथा सदस्य अंजली राहुल कांबळे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मनोज दळवी, राहुल कांबळे, कार्यकर्ते सुनील पाटील, प्रवीण पाटील, कवी तारेकर, विजय पाटील, भालचंद्र मोकल, माणिक पाटील आदी उपस्थित होते.  फोटो: खा.श्रीरंग बारणे यांचे स्वागत

तळोजे एम.आय.डी.सी. मधील व्हिस्टा कंपनीकडून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला तीन संगणक संचांची देणगी* *नजीकच्या काळात रुपये पाच लाखांची अत्यावश्यक औषधे CSR फंडातून देण्याची घोषणा..... चंद्रशेखर सोमण यांची आश्वासन पूर्ती...*

Image
तळोजे एम.आय.डी.सी. मधील व्हिस्टा कंपनीकडून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला तीन संगणक संचांची देणगी*  *नजीकच्या काळात रुपये पाच लाखांची अत्यावश्यक औषधे CSR फंडातून देण्याची घोषणा..... चंद्रशेखर सोमण यांची आश्वासन पूर्ती...*  गुरुवार दिनांक ५ऑक्टोबर २०२३ रोजी व्हिस्टा फूड्स या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीकडून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला देणगी दाखल तीन कम्प्युटर संच सुपुर्द करण्यात आले असून लगेच कार्यान्वित सुद्धा करण्यात आले.  याप्रसंगी शिवसेना पनवेलचे स्थानिक नेते व कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमण, रुग्णालयातर्फे अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ, डॉ. सकपाळ डॉ. जठार तसेच कंपनीचे प्लांट हेड प्रवीण ठाकूर, एच. आर. डिपार्टमेंटच्या इंद्रायणी आगलावे, प्रथमेश पाटील, आय टी डिपार्टमेंटचे अजित मिश्रा, रुग्णालय कर्मचारी, शिवसेना महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला ॲड. प्रथमेश सोमण यांनी प्रास्तविक करून चंद्रशेखर सोमण व ग्रामीण रुग्णालयाची धडपड अधोरेखित केली तसेच यापूर्वीही डिसेंबर २०१९ मध्ये व्हीस्टा कंपनीकडून रुपये पाच लाखांची औषधे ही एस आर फंडातून

युवा नेतृत्व महेश सावंत यांची शिवसेना उपमहानगरप्रमुखपदी नियुक्ती ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Image
युवा नेतृत्व महेश सावंत यांची शिवसेना उपमहानगरप्रमुखपदी नियुक्ती ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पनवेेल, (संजय कदम) ः सामाजिक कार्यकर्ते उद्योजक तसेच युवा नेतृत्व महेश सावंत यांची आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपमहानगरप्रमुख पनवेल व नवीन पनवेल या विभागासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली व सदर नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. कळंबोली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेेल्या आजच्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी युवा नेतृत्व महेश सावंत यांची नियुक्ती उपमहानगरप्र्रमुखपदी केली. यावेेळी महानगरप्रमुख अ‍ॅड.प्रथमेश चंद्रशेखर सोेमण व तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना रामदास शेवाळे यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करावा तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोेबत घेेवून कार्य करावे, यासाठी आम्ही

भारत विकास परिषद पनवेल शाखेचा "सैनिक हो तुमच्यासाठी" उपक्रम; यंदाच्या वर्षी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी १० हजार फराळाचे बॉक्स पाठवणार*

Image
भात विकास परिषद पनवेल शाखेचा "सैनिक हो तुमच्यासाठी" उपक्रम; यंदाच्या वर्षी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी १० हजार फराळाचे बॉक्स पाठवणार पनवेल (संजय कदम): ‘सैनिक हो तुमच्‍यासाठी' हा भारत विकास परिषद, पनवेल शाखेचा प्रमुख प्रकल्प आहे, जो गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे आणि या उपक्रमामधे उत्तरोत्तर प्रगती होत आहे. या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देत नितिन कानेटकर, डॉ. किर्ती समुद्र, सौ. ज्योती कानेटकर, सुबोध भिडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेत कौतुक केले. यंदाच्या वर्षी सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी १० हजार फराळाचे बॉक्स पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.       भारत विकास परिषद ही एक राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे जी 1963 पासून स्वस्थ, समर्थ आणि संस्कृत भारत निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. भारत विकास परिषदच्या देशभरात 1,500 पेक्षा जास्त शाखा आणि 1,50,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत. भारत विकास परिषदेची सर्व माहिती www.bvpindia.com वर उपलब्ध आहे. पनवेल शाखेची स्थापना 2019 साली झाली आणि 2020 मध्ये दिवाळीच्य

जय गोपीनाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे कामोठे येथे शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व भाजपा कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन

Image
जय गोपीनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्र जनसंपर्ककार्यालयाचे कामोठे येथे झाले उद्घाटन* पनवेल : जय गोपीनाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे कामोठे येथे शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व भाजपा कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे मा.नगरसेवक प्रविण शेठ पाटील माजी सभापती, माजी नगरसेविका, सौ.पुष्पाताई कुत्तरवाडे, सहकार सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मा.अशोक मोटे , रायगड जिल्हा चिटणीस सौ विद्या तामखडे मा.सुनिल शिरसाट मा.काकासाहेब कुत्तरवाडे , समाजसेवक किरण गीते व अनेक वेगवेगळ्या परिसरातून अनेक संस्थेचे पदाधिकारी व लोक उपस्थित होते . संस्थेच्या वतीने काही नियुक्त्या करण्यात आल्या, रायगड जिल्हाध्यक्ष, किरण गित्ते, रायगड जिल्हा उपाध्यक्ष, तुकाराम केदार, संस्थेच्या उपाध्यक्ष पदी विनोद खेडकर, महिला उपाध्यक्षा मनिषाताई वनवे,यांच्या नियुक्ती वरील सर्व मान्यवरांच्या हास्ते करण्यात आल्या . सुरुवातीला संस्थेच्या विषयी बोलताना बबन मार्ग यांनी संस्थेच्या कामाचा आढावा मांडला व संस्थेच्या वतीने जी क

रायगड सम्राट न्यूज जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पडला पार # मंगेश अपराज, पत्रकार गणेश कोळी, पत्रकार संतोष आमले, पत्रकार आप्पासाहेब मगर पत्रकार सनीप कलोते, पत्रकार राजेंद्र कांबळे पत्रकार गणपत वरगडा पत्रकार राम बोरिले, पत्रकार सुरेश भोईर यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांची लाभली उपस्थिती.

Image
रायगड सम्राट न्यूज जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पडला पार # मंगेश अपराज, पत्रकार गणेश कोळी, पत्रकार संतोष आमले, पत्रकार आप्पासाहेब मगर पत्रकार सनीप कलोते, पत्रकार राजेंद्र कांबळे पत्रकार गणपत वरगडा पत्रकार राम बोरिले, पत्रकार सुरेश भोईर यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांची लाभली  उपस्थिती. पनवेल / प्रतिनिधी :- रायगड सम्राट न्यूज आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२३" चा निकाल व परितोषक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार.  राज्यस्तरीय घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेतया दुसऱ्या वर्षी शेकडो गणेश भक्तांनी सहभाग घेऊन बाप्पा साठी केलेल्या आरासाची माहिती पाठवली होती.  त्यामध्ये ८६ स्पर्धकांची निवड केली गेली होती.  यात ऑनलाईन पद्धतीने निकाल काढण्यात आला. यात प्रथम पाच क्रमांकाचे आज दि ०८ ऑक्टोबर रोजी पनवेल येथे पारितोषिक वितरण करण्यात आले. यामधील विजेते पुढील प्रमाणे 1)रानंद सातारा, शिवाजी शिंदे  2) गोंदवले खुर्द सातारा, सौ प्राची तुषार पोळ 3)नांदगाव पनवेल, अशोक खुटले 4) का