रु. 65.78 कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या संदर्भात दोन व्यक्तिंना अटक
रु. 65.78 कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या संदर्भात दोन व्यक्तिंना अटक मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने रु. 165.78 कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाची रु. 27.74 कोटीच्या कर महसूलाची हानी करणाऱ्या व्यक्तींना अटक केली आहे. मे. श्री समस्ता ट्रेडींग प्रा.लि. व शरद क्लिअरिंग ॲण्ड फॉरवरडिंग प्रा.लि. या व्यापाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. सदर कार्यवाहीदरम्यान असे निदर्शनास आले की अनेक बनावट कंपन्यांची स्थापना करून बोगस बिल देण्याचे काम सुरू होते. त्यासंदर्भात वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात धडक मोहीम राबवून त्याअंतर्गत प्रमुख सूत्रधार श्री. राहुल अरविंद व्यास व श्री. विकी अशोक कंसारा यांना दि. 04/10/2023 रोजी अटक करण्यात आली असून महानगर दंडाधिकाऱ्यांनी सदर व्यापाऱ्यांस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर धडक कार्यवाही श्रीमती प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त अन्वेष