आमच्या पाठपुराव्यामुळेच नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाच्या हालचालींना सुरूवात एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांचा दावा

आमच्या पाठपुराव्यामुळेच नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाच्या हालचालींना सुरूवात एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांचा दावा नवी मुंबई : इतकी दिवस भिजत घोंगडे पडलेल्या नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाच्या हालचालींना अचानक गती आली असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आम्ही उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे तसेच प्रतिकात्मक उद्घाटन करण्याचा इशारा दिल्यावरच मेट्रोच्या लोकार्पण हालचालींना सुरूवात झाली असल्याचा दावा एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव आणि नवी मुंबई-रायगडचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी केला आहे. नवी मुंबई मेट्रोचे दिवाळीपूर्वी १४ नोव्हेंबरपयंत उद्घाटन व लोकार्पण न झाल्यास पाडव्याला एमआयएमच्या वतीने प्रतिकात्मक उद्घाटन करण्याचा इशारा एमआयएमच्या हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदनातून दिला होता. या निवेदनात त्यांनी नवी मुंबई मेट्रोचे बेलापुर ते पेंधर तळोजादरम्यानचे काम चार-सहा महिन्यापूर्वीच काम पूर्ण झालेले आहे. दीड महिन्यापूर्वीच रेल्वेन...