Posts

Showing posts from October 3, 2023

गांधी जयंती सप्ताह निमित्त भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे स्वच्छता अभियान

Image
गांधी जयंती सप्ताह निमित्त भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे स्वच्छता अभियान पनवेल /प्रतिनिधी :-    गांधी जयंती सप्ताह निमित्ताने भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने पनवेलच्या हजरत पीर करम अली शाह दर्गावर स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवण्यात आला.     भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर आणि प्रदेश सचिव बबलू सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पनवेल महानगर पालिका उद्यानातील महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दर्गावर चादर अर्पण करून दुवा मागण्यात आली. या प्रसंगी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त झालेल्या मन्सूर पटेल यांचा सय्यद अकबर यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.    महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता अभियान संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. या राष्ट्रीय अभियानामध्ये मुस्लिम समाज देखील मनःपूर्वक सहभागी झाला आहे. मोदींच्या देशासाठीच्या विकासाच्या प्रक्रियेत मुस्लिम स्त्री-पुरुष यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद आता लाभत

करंजाडे येथील जन माणसात मिसळणारे सरपंच मंगेश शेलार यांचा सत्कार करून मानले जनतेने आभार

Image
करंजाडे येथील जन माणसात मिसळणारे सरपंच मंगेश शेलार यांचा सत्कार करून मानले जनतेने आभार  पनवेल : करंजाडे सेक्टर 5 सेक्टर 6 मधील सोसायट्यांच्या पाणी प्रश्न मार्गी लागल्यामुळे, सरपंच मंगेश शेलार व भाजप करंजाडे शहराध्यक्ष मिरेंद्र शहाणे, यांचा सेक्टर 5 व 6 च्या रहिवाशांनच्या वतीने सत्कार करण्यात आला.  सोमवार दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सेक्टर 6 येथे मंगेश शेलार यांच्या टीमचा सत्कार करून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.  या मिरवणुकी दरम्यान सेक्टर 5 व 6मधील सोसायटी कमिटीनी सरपंच मंगेश शेलार व उपसरपंच सागर आंग्रे, मा. सरपंच बळीराम म्हात्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील भाईर,अतिष साबळे, नंदकुमार भोईर सदस्य प्रिया फडके, शिल्फा नागे आदी उपस्थित टीमचा सत्कार करण्यात आला.

पनवेलचे स्वच्छ प्रतिमेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः हाती झाडू घेऊन पनवेल शहरातील कृष्णाळे तलाव केले स्वच्छ. # स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग

Image
पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग पनवेल(प्रतिनिधी) स्वच्छतेला प्राधान्य देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पनवेल परिसरातही रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः हाती झाडू घेऊन पनवेल शहरातील कृष्णाळे तलाव येथे या मोहिमेत सहभाग घेतला.            महापालिका तसेच भाजपच्या वतीने एक तारीख एक तास ही स्वच्छता मोहीम लोकसहभागातून मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी घेण्यात आली. कृष्णाळे तलाव येथील मोहिमेत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, शहराध्यक्ष अनिल भगत, महापालिका प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे, आयुक्त गणेश देशमुख, सुधाकर देशमुख, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, यतीन देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत जाधव, स्वप्नील मोरे, नितीन बानुगडे-पाटील, महावीर गुप्ता, मनपा उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे, लायन्स क्लब सरगमचे सदस्य, इनरव्हिल क्लबच्या महिला सदस्य,

उरण शहर व तालुका काँग्रेसतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

Image
उरण शहर व तालुका काँग्रेसतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार उरण  (विठ्ठल ममताबादे ) कोरोना काळात सफाई कामागारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोना काळातही आणि आताही आपले जीव धोक्यात घालून नागरिकांची, जनतेची रांत्रदिवस सेवा करणारे स्वच्छता कर्मचारी हे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा आहेत. स्वच्छता दूत आहेत. त्यांचा सर्वांना अभिमान आहे असे गौरवोदगार काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी काढले. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता उरण तालुका काँग्रेस कार्यालयात उरण तालुका व उरण शहर काँग्रेस तर्फे महात्मा गांधी वा लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर लगेचच सफाई कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रकाश पाटील यांच्या विशेष पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सफाई कामगाराना स्त्रियांना साडी तर पुरुषांना शर्ट,पॅन्ट पीस तसेच गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील यांनी स

पनवेल तालुका पोलिसांनी गणेश विसर्जनावेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक लावून केली जनजागृती

Image
 पनवेल तालुका पोलिसांनी गणेश विसर्जनावेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक लावून केली जनजागृती पनवेल,  (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील गणेशाचे विसर्जन आज अत्यंत धार्मिकतेने व सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रितपणे येवून ढोल ताशाच्या गजरात नृत्य करत करण्यात आले. यावेेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेशही जनजागृती फलक लावून यावेेळी देण्यात आले. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या सहभागाने वपोेनि अनिल पाटील, वपोनि जगदीश शेलकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विराजमान झालेेल्या गणेशाची आरती करून शहरातील बल्लाळेश्‍वर मंदिर येथे विसर्जनासाठी मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणूूक काढताना सुद्धा पोलिसांनी प्रथम नागरिकांचा विचार केला. या मिरवणुकीच्या माध्यमातून चांगला संदेश जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याांनी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक गाड्यांना लावून त्याद्वारे जनजागृती केली. यावेळी या विसर्जनात सर्व पोलीस बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. गेले 12 दिवस बंदोबस्तामुळे दमलेले

भाजप कामगार मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी संजय वासुदेव पवार यांची नियुक्ती

Image
 भाजप कामगार मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी संजय वासुदेव पवार यांची नियुक्ती पनवेल,  (संजय कदम) ः भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांच्या आदेशानुसार कामगार नेते संजय वासुदेव पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात आली. कामगारांचा साठी आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कार्य देशाबाहेर अडकलेली हजारो कामगारांना देशात सुखरूप परत आणण्याचे कार्य शिपिंग जहाजावर काम करणार्‍या कामगारांचा न्यायहक्कांसाठी लढा, जल प्रदूषण, मच्छीमार समाजासाठी देखील कार्य या कार्याचा गौरव करण्यामध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झालेले संजय पवार यांची त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. फोटो ः संजय पवार

मालगाडीचे घसरलेले डबे पूर्वपदावर करण्यासाठी गेली २४ तास रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु; पोलिसांसह विविध सामाजिक संस्थांचा प्रवाशांना मदतीचा हात

Image
मालगाडीचे घसरलेले डबे पूर्वपदावर करण्यासाठी गेली २४ तास रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु; पोलिसांसह विविध सामाजिक संस्थांचा प्रवाशांना मदतीचा हात  पनवेल ( संजय कदम ) : पनवेल रेल्वे स्थानक परिसरात जे एस डब्ल्यू मधून स्टील कोर रोल घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे काल पाच ते सहा डबे रुळावरून घसरले होते . यामुळे कोकण रेल्वे वरील पनवेल स्थानकातून होणारी वाहतूक जवळपास थांबली होती . तसेच लांब पल्ल्याच्या गाडयांना सुद्धा खोळंबा झाला होता . त्यानंतर मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाची फौज या ठिकाणी दाखल झाली व गेले २४ तास त्यांनी युद्धपातळीवर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत . परंतु त्यामुळे पनवेल स्थानक व परिसरात लांब पाल्यांच्या गाडयांना थांबविण्यात आल्याने रेल्वे प्रवासाचे चांगलेच हाल झाले होते . यावेळी रेल्वे प्रशासनासह पनवेल शहर पोलीस ,रेल्वे पोलीस व विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन प्रवाशांच्या अल्पोपहाराची सोय केली होती .                       जे एस डब्ल्यू मधून स्टील कोर रोल घेऊन जाणाऱ्या मालगाडीला पनवेल रेल्वे स्थानक परिसरात काल द

बबन बारगजे यांना नियुक्ती पत्र प्रदान*

Image
*बबन बारगजे यांना नियुक्ती पत्र प्रदान* भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते श्री बबन बारगजे यांची भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली . आज पनवेलच्या मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले . योग्य पदाला योग्य न्याय देणारी व्यक्ती म्हणून बबन बारगजे यांची ओळख आहे . त्याचमुळे सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड झाली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले . यावेळी पनवेल चे आमदार माननीय प्रशांत ठाकूर , पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड निरंजन डावखरे , शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोकण प्रभारी श्री अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व अनेक मान्यवर उपस्थित होते .

पोद्दार जम्बो किडस शाळेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

Image
पोद्दार जम्बो किडस शाळेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी  पनवेल, द(वार्ताहर) ः पनवेलमधील पोदार जम्बो किडस शाळेत लहान मुलांच्या सहभागाने महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील अनेक घटनांना उजाळा देत त्यांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. पनवेल मध्ये पोदार जंबो किड्सची सुरुवात फेब्रुवारी 2023 मध्ये झाली.आज दिनांक २ ऑक्टोबार रोजी देशाचे राष्ट्रपिता म्हणून ज्यांची ओळख आहे ते महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांनी जयंती देशभरात साजरी होत असते. लहान लहान बालकांना, विद्यार्थ्यांना या दोन्ही महान व्यक्तींची माहिती व्हावी या उद्देशाने पोदार जम्बो किड्सच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेमध्ये बापूंचे जीवन आणि शास्त्री यांचे जीवन उलगडण्याचा प्रयत्न करणे हा उपक्रमाचा भाग होता. यामध्ये गांधींनी काढलेली दांडी यात्रा, , मीठाचा सत्याग्रह , बापूंची वाटिका, कुटी, चरखा बनविणे, गांधीजींच्या प

पश्‍चिम महाराष्ट्र करंजाडे पनवेल यांच्यातर्फे आयोजित भव्य रक्तदान आणि महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
पश्‍चिम महाराष्ट्र करंजाडे पनवेल यांच्यातर्फे आयोजित भव्य रक्तदान आणि महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल,  (संजय कदम) ः पश्‍चिम महाराष्ट्र करंजाडे पनवेल यांच्यातर्फे आयोेजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान आणि महाआरोेग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जवळपास 75 जणांनी रक्तदान केले आहे. करंजाडे ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात सदर रक्तदान आणि महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत नेत्र तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, शुुगर तपासणी, हृदयाची ईजीसी तपासणी, हाडाची ग्रंथा, सीबीसी तपासणी व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला यावेळी देण्यात आला होता. यासाठी सनराईज हॉस्पिटल करंजाडे, सीमीरा डायग्नोस्टीक्स करंजाडे, तेरणा मल्टीस्पेशालिटी आणि रिसर्च सेंटर नेरुळ, साई ब्लड बँक पनवेल यांनी विशेष सहभाग घेवून नियोजन केले होते. याचा लाभ मोठ्या प्रमाणात पश्‍चिम महाराष्ट्रातील करंजाडे येथे राहत असलेल्या नागरिकांनी घेतला. यासाठी डॉ.विक्रम पाटील, रामचंद्र महाडिक, ज्वालासिंग देेशमुख, सचिन गोरड, अमित कांबीरे, अजित कदम आदींनी विशेष मेहनत घेतली होती. फोटो ः रक्तदान शिबीर

मारुती ट्रु व्हॅल्यू कंपनीला 50 लाखाचा अपहार करणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोेलिसांनी केले गजाआड

Image
मारुती ट्रु व्हॅल्यू कंपनीला 50 लाखाचा अपहार करणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोेलिसांनी केले गजाआड पनवेल,  (संजय कदम) ः पनवेल जवळील पळस्पे येथील मारुती ट्रु व्हॅल्यू या कंपनीत कॅशिअर म्हणून काम करणार्‍या एका इसमाने कंपनीच्या व्यवहारात फेरफार करून ग्राहकांच्या नावे चुकीच्या आर्थिक नोंदी घेवून कंपनीच्या व्यवहारातील 50 लाख 70 हजार 178 रुपयाचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून सदर रकमेचा अपहार करणार्‍या इसमास पनवेल शहर पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. अनिकेत पंडित (32) हा पळस्पे येथील मारुती ट्रु व्हॅल्यू कंपनीत कॅशिअर म्हणून काम पाहत असताना त्याने कंपनीच्या व्यवहारात फेरफार करून ग्राहकांच्या नावे चुकीच्या आर्थिक नोंदी घेवून कंपनीच्या व्यवहारातील 50 लाख 70 हजार 178 रुपयाचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून सदर रकमेचा अपहार करून तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेेंद्र जगदाळे व पोलीस हवालदार परेेश म्हात्रे हे अधिक त