Posts

Showing posts from September 30, 2023

डॉ. मुनीर तांबोळी यांची केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड

Image
डॉ. मुनीर तांबोळी यांची केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड पनवेल, : केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी डॉ. मुनीर तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी, राष्ट्रीय सचिव गोविंद मोरे यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे. गुणवत्ता व कार्यक्षमता पाहून डॉ. मुनीर तांबोळी यांची नियुक्ती राजू दळवी यांनी केली असून कायदे व नियमांचे सदैव पालन करून संघटनेच्या उद्देशानुसार पत्रकार जगताच्या हितासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. मुनीर तांबोळी यांनी आत्तापर्यंत अनेक सामाजिक विषय सोडवले आहेत, मानवी हक्कांसाठी त्यांनी लढा दिलेला आहे. अनेक दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रात पत्रकार, उपसंपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केले आहे. सध्या हिन्दुस्तान 24 तास न्युज चॅनलचे मुख्य संपादक आहेत. केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या, ग्रामीण भा

ह्यूमन राईट आणि विश्व प्रस्तुत महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड २०२३ तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न

Image
ह्यूमन राईट आणि विश्व प्रस्तुत महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड २०२३ तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न  नवी मुंबई (प्रतिनिधी )नवी मुंबई येथील कोर्ट यार्ड मेरिट या पंचतारांकित हॉटेलमध्ये ह्यूमन राईट आणि विश्व प्रस्तुत महाराष्ट्र अवॉर्ड २०२३ तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला असून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि रोशनी कपूर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.याप्रसंगी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. कौतुक हा केवळ तीन अक्षरी शब्द असला तरी त्यात दहा हत्तीचे बळ असते.कौतुक म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्याची दखल घेऊन त्याबद्दल त्याची प्रशंसा करणे, त्याला प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे त्यामुळे त्याच्यातील अत्मविश्वास वाढतो व तो करत असलेले काम अजून चांगल्या पद्धतीने करतो व सर्वस्व पणाला लावून यशस्वी होतो.बरं, कौतुक करणे ही तर किती सोपी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या हातात आहे. ह्याला काही पैसे पडत नाही. फारसे कष्ट करावे लागत नाही अथवा फार वेळही द्यावा लागत नाही. तरी स

पनवेल महानगरपालिकेचा नियोजन शून्य कारभार! विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी

Image
पनवेल महानगरपालिकेचा नियोजन शून्य कारभार! विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी पनवेल : कर्नाळा स्पोर्ट्स ते साईनगर ला जोडणारा कच्चा रस्ता विरोधी पक्ष नेते श्री प्रीतम म्हात्रे आणि स्थानिक नगरसेविका सौ सारिका भगत यांच्या पाठपुराव्याने कॉंक्रिटीकरणाचा मंजूर झाला होता. सदर काम काल पासून सुरू करण्यात आले. काम सुरू केल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून सुरू असलेल्या कामा संदर्भात योग्य माहिती मिळावी अशी मागणी जोर धरू लागली. त्यानूसार आज श्री.प्रीतम म्हात्रे यांनी नगरसेविका सौ.सारिका भगत यांच्यासोबत स्थानिक नागरिक, पनवेल महानगरपालिका अधिकारी, काम करणारे कंत्राटदार यांच्यासोबत संयुक्त कामाचा पाहणी दौरा केला.त्यावेळी त्यांना तिथे या अगोदर नागरिकांच्या टॅक्स च्या पैशातून काही वर्षांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून बांधलेले मोठे गटार तोडण्याचं काम सुरू केलं आहे हे निदर्शनास आले.       नवीन रस्ता रुंदीकरण होत असल्याने जुनी गटारे तोडण्याचे काम चालू केलं आहे तसेच रस्ता 18 मीटरचा होत असून प्रत्यक्ष दोन बिल्डिंगच्या कंपाउंड मधील अंतर हे 15 मीटर आहे ही वस्तुस्थिती त्यांनी अधिकाऱ्यांना दाखव

रविवारी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

 रविवारी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ  पनवेल(प्रतिनिधी) राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अर्थात सेवा पंधरवडा निमित्त 'स्वच्छता हि सेवा' हे ब्रीदवाक्य घेऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने रविवार दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचे उदघाटन सकाळी १० वाजता पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार असून यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे. 

एनजीएफच्या ८ व्या राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार-२०२३' सोहळ्यासाठी सन्माननीय डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी ताई प्रकाश आमटे यांसह आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील , शौर्य चक्र विजेते कमांडो मधुसुधन सुर्वे विशेष पाहुणे

Image
एनजीएफच्या ८ व्या राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार-२०२३' सोहळ्यासाठी सन्माननीय डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी ताई प्रकाश आमटे यांसह आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील , शौर्य चक्र विजेते कमांडो मधुसुधन सुर्वे विशेष पाहुणे मुंबई, : शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी गेल्या एका तपाहून अधिक काळ सातत्याने कार्यरत असलेली 'नूतन गुळगुळे फाउंडेशन' (एनजीएफ) ही मुंबईतील प्रख्यात संस्था असून या संस्थेचा ८-वा राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार - २०२३ सोहळा" शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी, संध्याकाळी ५:३० वा., पु.ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिर, विले पार्ले (पूर्व ), मुंबई येथे संपन्न होणार आहे.   या खास सोहळ्यासाठी जंगलात वास्तव्य करणाऱ्या ‘माडिया गोंड’ आदिवासी जमातीतील लोकांना भूक, रोगराई, अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे, बाबांचे स्वप्न हेमलकशात प्रत्यक्षात उतरवणारे ‘मॅगसेसे’ पारितोषिक विजेते डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉ. मंदाकिनी ताई आमटे, तसेच द

सीकेटी स्वायत्त महाविद्यालयात “रिसर्च मेथडोलॉजी” याविषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

Image
सीकेटी स्वायत्त महाविद्यालयात “रिसर्च मेथडोलॉजी” याविषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे “रिसर्च मेथडोलॉजी” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आज (दि. ३० सप्टेंबर) सूक्ष्मजीवशास्त्र विभाग ,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना अंतर्गत पदव्युतर विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी संपन्न झाली.               या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईचे प्रा.(डॉ.) उल्हास पाटील, कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक प्रा. डॉ.नवीन दंदी, व्ही.ई.एस. कॉलेज, चेंबूरचे सहाय्यक प्राध्यापक, प्रा.श्री. सुमन गांगर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी.आघाव, विज्ञान विद्याशाखा प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर , कार्यशाळेचे समन्वयक व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश वडनेरे आदी उपस्थित होते.    प्राचार्य डॉ.एस.के.पाटील यांनी प्र

मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर'; सोमवारी नियोजन आढावा बैठक

Image
मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर'; सोमवारी नियोजन आढावा बैठक  पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी म्हणून पनवेल तालुका व शहरातील गरिब व गरजू जनतेसाठी 'मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर'चे आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भातील नियोजन आढावा बैठक सोमवार दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३ वाजता खांदा कॉलनी येथील सिकेटी महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.         महाशिबिरात आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच औषधोपचार मोफत केले जाते. याचा १५ हजारहून अधिक नागरिक लाभ घेत असतात, त्यामुळे सर्व रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी नियोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी या नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे. 

१ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पसार झालेले दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलीसांनी केले गजाआड

Image
१ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पसार झालेले दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलीसांनी केले गजाआड पनवेल (संजय कदम): पनवेल जवळील शिरढोण गावाच्या हद्दीत एका विवाहित महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पसार झालेले दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलीसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे इतरही चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.       या घटने नंतर सदर महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नितीन लभडे, पोउपनि हर्षद जुईकर, पोहवा वायकर, पोहवा कुडावकर, पोहवा झाजम, पोना भोसले व पोना पारधी आदींच्या पथकाने तांत्रिक व गुप्तबातमीदाराच्या आधारे तपास सुरु केला असता ते दोन गुन्हेगार नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून आरोपी लहू बबन उर्फ बबलू काळे (वय २२) आणि विनोद गोविंद पिंपळे (वय ३८) यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फोटो: चैन स्नॅचिंग आ

तीन चाकी पॅजो ऍपे टेम्पोची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हेशाखा कक्ष २ पनवेलने केले गजाआड; १४ गुन्हे आणले उघडकीस

Image
तीन चाकी पॅजो ऍपे टेम्पोची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हेशाखा कक्ष २ पनवेलने केले गजाआड; १४ गुन्हे आणले उघडकीस पनवेल (संजय कदम): नवी मुंबई, ठाणे तसेच इतर जिल्हयातून तीन चाकी पॅजो ऍपे टेम्पो चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हेशाखा कक्ष २ पनवेल कडुन अटक करून १४ गुन्हे उघडकीस आण्यात यश आले आहे. तसेच या आरोपींकडून नवी मुंबई, ठाणे व इतर जिल्हयातील १० ऍपे टेम्पो, एक मोटर सायकल व एक टेम्पोचे इंजिन हस्तगत करून एकुण ८ लाख ४४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.        मागील काही दिवसांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हदिदमध्ये अपे टेम्पो चोरीचे गुन्हयांत झालेली वाढ लक्षात घेता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह. पोलीस आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे यांनी ऍपे टेम्पो चोरीतील गुन्हयांना आळा घालणेकामी व घडलेले गुन्हे उघडकीस आणन्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) गजानन राठोड यांच्या सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी 'यांनी विशेष पथक स
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व TSO -सामान्य राज्य सेवा गट-B साठी पात्र ठरल्याबद्दल विद्यार्थ्याचा केला सत्कार पनवेल (संजय कदम): शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे अतुल बाळाराम फडके (देवीचापाडा-पनवेल)यांची महाराष्ट्रामध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण तसेच TSO -सामान्य राज्य सेवा गट-B साठी पात्र ठरल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांचा विशेष सत्कार केला आहे.         यावेळी पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, उपशहर प्रमुख तळोजा हरेश पाटील, विभाग प्रमुख प्रभाग क्र.2 प्रमोद अनंत पाटील, युवासेना विभाग अधिकारी मनोज कुंभारक, युवासेना विभाग अधिकारी जीवन पाटील, उपशाखाप्रमुख तोंडरे वासुदेव पाटील, गट प्रमुख तोंडरे पिंटू पाटील, BLA तोंडरे किरण पाटील, भालचंद्र पाटील, अभिमन्यू धोंडू पाटील, कृष्णा दिनकर पाटील, माणिक पाटील, पत्नी श्रद्धा अतुल फडके, वडील बाळाराम हिराजी फडके, आई पार्वती बाळाराम फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतुल फडके यांच्या पत्नीसह आई वडलांचा विशेष सत्कार करण्यात आला. फोटो : अतुल फडके सत्कार

पनवेल शहर पोलिसांनी गणेशमूर्ती दान करून पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

Image
पनवेल शहर पोलिसांनी गणेशमूर्ती दान करून पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश पनवेल (संजय कदम): पनवेल महानगपालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल शहर पोलिसांनी स्थापन केलेल्या गणेशाचे विसर्जन न करता सदर गणेश मूर्ती दान केल्याने एक आगळा वेगळा संदेश पनवेलकरांना त्यांच्या मार्फत गेला आहे.       पनवेल महापालिकेच्या गणेश मूर्ती दान आवाहनानंतर पनवेल शहर पोलीसांनी पोलीस ठाण्यातील गणेशमूर्ती अनंत चतुर्दशीच्या दूसऱ्या दिवशी पालिकेला दान करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे हे उपस्थित होते. पनवेल महापालिकेने मूर्ती दान करणाऱ्या कुटूंबियांना ‘पर्यावरण दूत’ या पदवीने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. त्यामूळे मूर्तीदानाच्या या भूमिकेमुळे पनवेल शहर पोलीस यापूढे ‘पर्यावरण दूत’ म्हणून ओळखले जाणार आहेत.   पनवेल महापालिका प्रशासनाने यंदा जास्तीत जास्त गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. नैसर्गिक तलावांमधील जलप्रदूषण रोखून पर्यावरण रक्षण करण्यासाठी हा उपक्रम पालिकेने हाती घेतला होता. अनंत चतुर्दशीपर्यंत ३२१ गणे

महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक गौरागणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीर

Image
महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक गौरागणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीर पनवेल (संजय कदम): पनवेल शहरातील भाजी मार्केट येथील सुप्रसिद्ध अश्या महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक गौरागणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबराचे आयोजन सोमवार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले आहे.   के.गो.लिमये वाचनालय आणि ग्रंथालय, भाजी मार्केट पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथे जमा होणारे रक्त हे कॅन्सरग्रस्त व थैलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या मदतीकरीता टाटा मेमोरीअल सेंटर, खारघर यांच्या सहकार्याने जमा करण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी महादेव खराते मो. ९३२२३७९४१४ व अमोल साखरे मो.९३२४३७२१६६ येथे संपर्क साधावा. यावेळी प्रत्येक रक्दात्यास मार्केटच्या राजाची प्रतिमा व त्वरित दर्शन देण्यात येणार असल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.  फोटो: रक्तदान शिबीर बॅनर

तालुका विधी सेवा समिती, पनवेल यांच्या वतीने तळोजा मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

Image
तालुका विधी सेवा समिती, पनवेल यांच्या वतीने तळोजा मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . पनवेल (रायगड मत) तालुका विधी सेवा समिती, पनवेल यांच्या वतीने दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 : 00 वाजता, तळोजा मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पनवेल तालुका विधी सेवा समिती, अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश माननीय श्री. जयराज वडणे साहेब यांनी या शिबिराचे अध्यक्षस्थान भूषविले या शिबिरात पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ, खजिनदार ॲड. धनराज तोकडे,ऑडिटर ॲड. विशाल मुंडकर,सदस्य ॲड.भूषण म्हात्रे, सदस्य ॲड.अमित पाटील, सदस्या ॲड. छाया म्हात्रे उपस्थित होते. या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गांवर आपण चालले पाहिजे. कर्तव्य बजावणारा एक सुजाण नागरिक म्हणून आपण यापुढे कार्यरत राहण्यासाठी सक्रिय असायला हवे. राष्ट्र पुढे नेणाऱ्या आदर्शांचे आपण पाईक झालो पाहिजे या अशयाचे मनोगत व्यक्त केले, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ यांनी देश सुजाण नागरिकांच्या ज