#आमदार अपात्रतेचा निर्णय जून 2024 पर्यंत होईल. #अरे, तोपर्यंत इलेक्शन येईल. यालाच तर म्हणतात राजकारण.... मुंबई (रायगड मत) ४ महिने उलट तपासणी, ४ महिने साक्ष अन् आठवड्यातून दोनदाच…”, परबांनी सांगितला नार्वेकरांचा ‘तो’ डावपेच ठाकरे गटाचा आक्षेप : आमदार अपात्र सुनावणीसंर्दभात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेले वेळापत्रक हे केवळ वेळकाढूपणा असल्याची टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांनी केली आहे. विलंब होऊ नये, म्हणूनच सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणीची मागणी आम्ही केली आहे. सर्व कागदपत्रे समोर असताना अंतिम सुनावणीसाठी इतका वेळ का लागत आहे, असा सवालही परब यांनी केला. स्वतंत्रपणे सुनावणी घ्यायची की एकत्रित घ्यायची, याबाबत नार्वेकर १३ ऑक्टोबरला निर्णय देणार आहेत. या याचिकांमध्ये समाविष्ट बाबींसंदर्भातील निर्णय, घटना आणि अन्य बाबी जाहीरपणे घडल्याने आणि कागदोपत्री तपशील उपलब्ध असल्याने त्या उभयपक्षी मान्य आहेत. त्यामुळे साक्षीपुरावे नोंदविण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी केला होता. तो नार्वेकर यांनी फेटाळला. आमदार