Posts

Showing posts from September 26, 2023

पनवेल महानगर पालिकेला मिळणार सहा वर्षाचे GST अनुदान १६५० कोटी रुपये - परेश ठाकूर

Image
पनवेल महानगर पालिकेला मिळणार सहा वर्षाचे GST अनुदान १६५० कोटी रुपये - परेश ठाकूर  जनता सुज्ञ त्यामुळे विरोधकांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये- माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचा विरोधकांना सल्ला  पनवेल (प्रतिनिधी ) महापालिका क्षेत्रातील कळंबोली शहराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी व त्या संदर्भातील पाठपुरावा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केला होता.  त्या अनुषंगाने कळंबोलीतील विकासकामांसाठी सदरच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय भाजपच्या लोकप्रतिनिधींचे असून जनता सुज्ञ आहे त्यामुळे विरोधकांनी याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असा सल्ला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. २६ सप्टेंबर) कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला.           या पत्रकार परिषदेस महानगरपालिकेचे भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल भगत, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, भाजपचे कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजेंद्र
Image
पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या तीन महिन्यात विशेष मोहिमे अंतर्गत तीन खुनाचे गुन्हे आणले उघडकीस पनवेल ( संजय कदम ) : पनवेल शहर ठाण्याच्या हद्दीत ३० वर्षा पूर्वीच्या तीन खुनाचे गुन्हे अवघ्या तीन महिन्यात विशेष मोहिमे अंतर्गत उघडकीस आणले आहे . त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून पनवेल शहर पोलिसांचे कौतुक होत आहे .                     पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०२ पंकज डहाणे यांनी खुना व इतर गंभीर गुन्हयातील अभिलेखावरील फरारी व पाहिजे आरोपीतांचा शोध घेवून त्यांच्यावर कार्यवाही करण्याकरिता विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस पथक तयार करण्यात आले होते. पोलीस पथकांनी पोलीस ठाणेचे ३० वर्षे जुने अभिलेख पडताळले. असता खून या शिर्षकाखाली दाखल असलेले गुन्हा रजि. नं. ११८/ २०१६ भादवि कलम ३०२, ३४, गुन्हा रजि. नं. २१४ / २०१६ भादवि कलम ३०२, २०१, ३४ व  गुन्हा रजि. नं. २१२/१९९४ भादवि कलम ३०२, २०१ ३४ या गुन्हयातील पाहिजे आरोपीचे शोध घेणेकामी स्थानिक बातमीदार व तांत्रिक तपास केला. सदर तपासामध्ये नमुद तिन्ही गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी मिर्झापूर (उ

शिवसेना महिला आघाडी पनवेल तालुका प्रमुख संध्याताई पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे तसेच महिला जिल्हा प्रमुख कुंदा गोळे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे जाहीर महिला पक्ष प्रवेश पार पडला,यावेळी पनवेल परिसरात होत असलेल्या जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या कर्तुत्वावर व सवेंदनशिल मुख्यमंत्री मा. श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवत महिलांनी शिवबंधन बांधत भगवा हाती घेतला.

Image
शिवसेना महिला आघाडी पनवेल तालुका प्रमुख संध्याताई पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे तसेच महिला जिल्हा प्रमुख कुंदा गोळे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे जाहीर महिला पक्ष प्रवेश पार पडला,यावेळी पनवेल परिसरात होत असलेल्या जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या कर्तुत्वावर व सवेंदनशिल मुख्यमंत्री मा. श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवत महिलांनी शिवबंधन बांधत भगवा हाती घेतला. यावेळी, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, शहर संघटीका सौ. ज्योती पाटिल शहर संघटक आनंदा माने व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी महिलांना संघटने चे महत्व सांगितले तसेच संघटित राहून महिलांचे प्रश्न सोडवावे असे ही सांगितले. तसेच महिलांसाठी महिला बचत गट व इतर सरकारी अनुदानासाठी देखील मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.

शिवसेनेचे पनवेलचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांची उपजिल्हा रुग्णालयालावर धडाक!

Image
शिवसेनेचे पनवेलचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांची उपजिल्हा रुग्णालयालावर धडक! *आवश्यक पाठपुरावा करून ५३ थकीत कामगारांचे वेतनही झाले जमा.* जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मधुकर पांचाळ आणि श्री. चंद्रशेखर सोमण यांच्यामध्ये अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा.  याबाबतीचे सविस्तर वृत्त असे की, शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी शिवसेनेचे पनवेलचे स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते, पोलिसमित्र चंद्रशेखर सोमण यांनी पनवेलच्या नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन अनेक गोष्टी जाणून घेतल्या.  प्रथमतः त्यांनी हिवताप आणि डेंग्यूचे पेशंट असलेल्या वॉर्ड मध्ये भेट देऊन तिथे उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांशी चर्चा करून तेथील वैद्यकीय उपचारा संदर्भात डॉ. सकपाळ यांच्याशी चर्चा केली. विशेष आनंदाची बाब म्हणजे गेल्या साधारणपणे एक महिन्यामध्ये सदर रुग्णालयात पन्नासहून अधिक डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण दाखल झाले होते. त्या सर्वांवर अतिशय चांगल्या प्रकारे उपचार करून त्या सगळ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या दोन्ही ठिकाणी आठ ते दहा रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालय पनवेल मधील गरीब

उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते कुमारी अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत(रजत पदक) आणि कु.व्यंकटेश कोनार (सुवर्णपदक)या दोन ज्युनियर पॉवरलिफ्टिंग खेळाडूंचा गौरव जागतिक स्पर्धा, रुमानिया तील पदकांबाबत नुकताच करण्यात आला.

Image
माननीय उप उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते कुमारी अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत(रजत पदक) आणि कु.व्यंकटेश कोनार (सुवर्णपदक)या दोन ज्युनियर पॉवरलिफ्टिंग खेळाडूंचा गौरव जागतिक स्पर्धा, रुमानिया तील पदकांबाबत नुकताच करण्यात आला. त्याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पदक विजेते पॉवरलिफ्टिंग खेळाडू आणि लोकप्रिय आमदार श्री. कॅप्टन तमिळ सेलवन साहेब यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव , आंतरराष्ट्रीय पंच श्री संजय प्रतापराव सरदेसाई उपस्थितीत झाला .सदर समारंभ हा सागर बंगला उपमुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानी,मुंबई आयोजित करण्यात करण्यात आला.