Posts

Showing posts from September 25, 2023

पनवेल Crime News विशेष. प्रतिनिधी - संजय कदम

Image
पनवेल Crime News विशेष. प्रतिनिधी - संजय कदम  मोटारसायकलीची चोरी पनवेल ( संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकीच्या बाजूला फुटपाथ वर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.                 कृष्णकांत कांबळी यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची यामाहा एस झेड आर कंपनीची लाल रंगाची मोटारसायकल क्रमांक एम एक ०२ सी व्हाय ८६०१ ही पनवेल रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकीच्या बाजूला फुटपाथ वर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ---------------------------------------------------- तलावात आढळला मृतदेह पनवेल (संजय कदम) : परिसरातील तलावाच्या पाण्यामध्ये पालथ्या स्थितीत तरंगत असलेला एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.                  सदर इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष असून अंगात पिवळ्या रंगाचा फुल बाह्यांचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट तसेच पायात तपकिरी रंगाचे बूट, पॅन्ट ला काळ्या रंगाचा बेल्ट, आत मध्ये विटकरी रंगाच

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा वडघर तालुका पनवेल येथे दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न

Image
रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा वडघर तालुका पनवेल येथे दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न पनवेल (संजय कदम) : रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा वडघर तालुका पनवेल येथे दप्तरवीना शाळा उपक्रम अंतर्गत प्लास्टिक कचरा मुक्त उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा मुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे होते.                   कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापक तसनिम मुल्ला यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी एक मोठा धोका असल्याचे सांगितले. प्लास्टिक कचरा वेळोवेळी योग्य पद्धतीने न विल्हेवाट लावल्यास तो जमिनीवर व पाण्यात साठतो आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते.यानंतर शाळेच्या शिक्षक समीर सय्यद,असलम कौचाली,परवीन खान यांनी प्लास्टिक मुक्त करण्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी एक मोठा धोका असल्याचे सांगितले. प्लास्टिक कचरा वेळोवेळी योग्य पद्धतीने न विल्हेवाट लावल्यास तो जमिनीवर व पाण्यात साठतो आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते.शाळेच्या विषय शिक्षिका अंजुम समीर सय्यद यांनी विद्यार