Posts

Showing posts from September 23, 2023

ट्रँकरची मोटारसायकलीस धडक ; एक ठार एक जखमी

 ट्रँकरची मोटारसायकलीस धडक ; एक ठार एक जखमी पनवेल ( वार्ताहर ) : भरधाव पाण्याच्या ट्रॅकरने मोटारसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणीचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे . तर मोटारसायकल चालक जखमी झाला आहे . या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .                  शहराजवळील वडघर खाडी पुलाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी पाण्याचा ट्रॅकर भरधाव वेगाने जात असतांना त्यावरील चालकाने मोटारसायकलीस जोरात धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणीचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे . तर मोटारसायकल चालक जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन झाले सुरळीत

Image
  शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन झाले सुरळीत पनवेल (संजय कदम) : दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जनवेळेस नागरिकांना वीज व बेशिस्त पार्किंग यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आज होणाऱ्या शहरातील वडाळे तलाव परिसरातील पाच दिवसाच्या गणरायाचे विसर्जनासंदभार्त नागरिकांना अडी-अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सकाळीच शिवसेनेचे स्थानिक नेते, पोलीस मित्र चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पनवेल शहर पोलीस निरीक्षक अंजुम बागवान तसेच एमएसईबी अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरून आज होणाऱ्या विसर्जना संदर्भात आवश्यक बाबींची पूर्तता केली. यावेळी शिवसेना शहर संघटक अभिजित साखरे उपस्थित होते. यासर्वांच्या प्रयत्नामुळे भाविकांच्या लाडक्या गणरायाचे विसर्जन सुरळीत झाले.                    दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन वेळेस पनवेल शहरात तब्बल दोन ते तीन तास वीस गायब होती. तसेच पोलीस व वाहतूक पोलीस यांनी नियोजन चांगले केले परंतु तरीही काही नागरिकांनाच्या बेशिस्त पार्किंग