Posts

Showing posts from September 22, 2023

पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्षमीकरणाचा निर्धार

Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्षमीकरणाचा निर्धार पनवेल : दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शेहबाज पटेल यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिका क्षेत्रातील युवकांनी पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक मजबूत व सक्षम करण्याचा निर्धार केला. या प्रसंगी महेबूब भाई यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील युवकांशी संवाद साधला व विविध विषयांवर मार्गदर्शन केले आणि नियुक्ती पत्रं दिली. यावेळी पनवेल मधील सर्व युवकांच्या वतीने शेहबाज पटेल यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून संघटन उभे करणार असल्याचे सांगितले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस भावना ताई घाणेकर, प्रभारी शहर अध्यक्ष प्रमोद बागल, नवी मुंबई युवक अध्यक्ष अन्नु आंग्रे, अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष फारुक भाई, प्रदेश सरचिटणीस उमेश आग्रवाल, प्रदेश सचिव गुरुज्योत सिंग,

मदन कोळी यांच्या निवासस्थानी श्रीस्वामी समर्थ देखाव्याने भक्तिमय वातावरण

Image
मदन कोळी यांच्या निवासस्थानी श्रीस्वामी समर्थ देखाव्याने भक्तिमय वातावरण पनवेल  : लोकमान्य टिळक यांना अभिप्रत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे पनवेल मधील गेली ६२ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे मदन कोळी, परिवार यांनी या वर्षीच " असे प्रकटले श्रीस्वामी समर्थ " या देखाव्यात रंगत आणलेली आहे.                      हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. कोळी परिवार यांच्या श्री गणपतीची सजावट राहुल भोईर, भुषण भोईर, विजय भोईर, वैभव चौगुले, यांची आहे. तसेच पडदा पेंटींग श्री. रमेश डुकरे, निवेदक अर्थव गोडबोले, तर विद्युत रोषणाई जनार्दन केणी, नवीन पनवेल यांनी साकारलेली आहे. सदर देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. फोटो: स्वामी समर्थ देखावा

पनवेल ओरियन मॉलच्या वतीने मोदक स्पर्धा

Image
पनवेल ओरियन मॉलच्या वतीने मोदक स्पर्धा* पनवेल :  पनवेल मधील ओरियन मॉल मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोदक मेकिंग स्पर्धेचे आयोजन दि.24 रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणुन प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुळे या उपस्थित राहणार आहेत.        गणेशोत्सव म्हटले कि महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाप्पाचा आवडता असलेले मोदक बनवण्याची आगळी वेगळी स्पर्धा ओरियन मॉलने आयोजित केली आहे.या स्पर्धेतील प्रमुख तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देखील दिली जाणार आहेत.दरवर्षी हि स्पर्धा आयोजित करून महिला वर्गातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हि स्पर्श ओरियन मॉल आयोजित करीत असतो.त्यामुळे यावर्षी देखील जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी या मोदक मेकिंग स्पर्धेत सहभागी होण्याचे अवाहन ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर यांनी केले आहे. फोटो - मोदक स्पर्धा