"माय मराठी खाद्य महोत्सव", पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम
"माय मराठी खाद्य महोत्सव", पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस, रसायनी येथे "माय मराठी" या शीर्षका अंतर्गत अस्सल मराठमोळ्या खाद्य पदार्थांचा फूड फेस्टिवल अर्थात खाद्य महोत्सव नुकताच संपन्न झाला. पिल्लई कॉलेज रसायनीच्या हॉटेल मॅनेजमेंट शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या खाद्य महोत्सवाचे अतिशय उत्तम आयोजन केले होते. उकडीच्या मोदकापासून ते थेट कोल्हापुरी तांबडा रस्स्या पर्यंत कित्येक अस्सल मराठमोळे पदार्थ तयार करून यावेळी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना त्याची चव चाखण्याची संधी दिली. या महोत्सवासाठी दिग्ग्ज मान्यवरांची उपस्थितीत लाभली. यावेळी हॉटेल रॅडिसनचे जनरल मॅनेजर जी. शंतनू तसेच एच. आर. मॅनेजर आशिष सर त्याच प्रमाणे हॉटेल व्यवसायातील बरेच शेफ्स आणि संचालक मंडळी आवर्जून उपस्थित होते. या महोत्सवात उपस्थित पाहुण्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मराठी खाद्य संस्कृती इतकी वैविध्यपूर्ण आहे. परंतु दुर्दैवाने तारांकित हॉटेलात आणि आंतरराष्टीय स्तरावर त्याची हवी तशी दखल घेतली जात नाही अशी खंत देखील त्यांनी याव