Posts

Showing posts from September 6, 2023

जिज्ञासाच्या जिद्दीला सलाम, आई-वडिलांच्या कष्टाला सलाम, अखेर पूर्ण केले MBBS.

Image
जिज्ञासाच्या जिद्दीला सलाम, आई-वडिलांच्या कष्टाला सलाम,  अखेर पूर्ण केले MBBS.  पत्रकाराची मुलगी झाली एमबीबीएस; पत्रकारांकडून डॉ. जिज्ञासा कडू हिच्यावर कौतुकाचा वर्षाव  पनवेल(प्रतिनिधी ) : दैनिक वादळवाराचे संस्थापक दा.चां.कडू गुरुजी यांची नात आणि संपादक विजय कडू यांची सुकन्या कुमारी जिज्ञासा विजय कडू हिने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन इंटर्नशिप पूर्ण केली. ही बाब अभिमानास्पद असून जिज्ञासा चे यश हे भावी डॉक्टरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर यांनी आज येथे केले.  पनवेलमधील पत्रकारांनी पत्रकाराच्या मुलीच्या यशाबाबत अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.         पत्रकारिता क्षेत्र हे इतर क्षेत्रांमध्ये निराळेच क्षेत्र आहे. आजच्या परिस्थितीत डॉक्टर होण्यासाठी पैसा हाच महत्वाचा भाग आहे, आणि पत्रकारिता करून आपल्या मुलांना डॉक्टर करणे ही तारेवरची कसरत आहे. गरीब कुटुंबात जन्मलेले विजय कडू यांनी आर्थिक कठीण दिवस पार करताना मुलांना उच्च शिक्षण देण्याचे काम केले. आणि त्यांच्या मुलांनीही त्यांच्या अपेक्षा प्रत्यक्षात

वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा

Image
आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन  वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा पेण, कर्जत, नेरळ, नागोटणे, सुधागड पाली, पनवेल वसतीगृह प्रवेश प्रक्रियेपासून अनेक विद्यार्थी लाभ ; ६२% गुण असूनही स्थानिक विद्यार्थी मिरीड लिस्टमध्ये नाहीत? विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी ----–-------------- मागणी योग्य आहे, हे निवेदन वरिष्ठांकडे तात्काळ पाठवू आणि आमच्या स्तरावर शक्य होईल तेवढं वसतीगृहातील प्रवेशसंदर्भात कार्यवाही करू - शशिकला आहिरराव ------------------ पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती होण्यासाठी व उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आदिवासी वसतिगृहाची निर्मिती केली गेली. या आदिवासी वसतीगृहात शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठं मोठ्या पदावर कार्यरत आहेत. वसतीगृहात शिक्षण घेण्याची शासनाने व्यवस्था केल्याने अनेक गरीब आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या पालकांचा आर्थिक बोजा कमी होत असतो.        माञ, इयत्ता १० वी पास झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थींनी इयत्ता ११

न्यू केअर प्लस रुग्णालयाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन

Image
  न्यू केअर प्लस रुग्णालयाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन  पनवेल : नवीन पनवेल येथे राजेश जंगम, श्री.शार्दूल चव्हाण, श्री.सौरभ जंगम आणि श्री.संकेत जंगम यांनी सुरू केलेल्या न्यू केअर प्लस रुग्णालयाचे  उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.      या उदघाटन सोहळ्याला माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह शेकाप पनवेल मनपा जिल्हा चिटणीस .गणेश कडू, माजी.नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल कृ बा समिती संचालक श्री.देवेंद्र मढवी माजी.नगरसेवक श्री.प्रवीण पाटील, उद्योजक श्री.राकेश श्रीवास्तव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.