#23 ऑगस्ट उद्यापासून राजपुत्र अमित ठाकरे यांचा झंजावात #मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार! #भाजप x विरुद्ध मनसे गणपतीमध्ये बारी रंगणार
#23 ऑगस्ट उद्यापासून राजपुत्र अमित ठाकरे यांचा झंजावात #मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार! #भाजप x विरुद्ध मनसे गणपतीमध्ये बारी रंगणार मुंबई : राज ठाकरे यांनी दिला होता इशारामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. तसेच या मुद्द्यावरुन विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा हायवे साठी मनसेकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे. २३ ते ३० ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर मनसेची ही पदयात्रा निघणार आहे. मनसे नेते राजपूत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा असणार आहे. नुकत्याच पनवेल येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या आंदोलनातून मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा लावून धरण्या