Posts

Showing posts from August 19, 2023

पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे हे महत्वाचे ठरणार -आ.प्रशांत ठाकूर

Image
पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे हे महत्वाचे ठरणार -आ.प्रशांत ठाकूर* पनवेल  (संजय कदम): पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरामध्ये गर्दीच्या व महत्वाच्या ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बाजवणार असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी करते वेळी केले. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांचे वपोनि नितीन ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांच्यासोबत उमेश इनामदार व प्रकाश खैरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.        पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी सद्य स्थितीत बसवण्यात आलेल्या ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आणि त्यांचा कंट्रोल रूम पनवेल शहर पोलीस ठाण्यात नैमुद्दीन शेख (रिंटू) सीसीटीव्ही टेक्निशयन यांच्या माध्यमातून बसवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच आधुनिक पद्धतीने या वॉर र

सिडकोच्या अधिकाऱ्यांचा वडघर येथील आदिवासी व मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांवर अन्याय; स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सिडकोला जाब विचारणार

Image
सिडकोच्या अधिकाऱ्यांचा वडघर येथील आदिवासी व मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांवर अन्याय; स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सिडकोला जाब विचारणार* पनवेल ( वार्ताहर ) : पनवेल जवळील वडघर येथील नामदेव वाडी येथील घरे सिडकोने निष्कासित केली. त्यामध्ये महेश लक्ष्मण साळुंखे, बळीराम थप गदिर, कुरमन बारक्या वाडू व इतर जयश्री विजय पाटोळे, लक्ष्मीबाई लाडकं म्हसे यांची राहती घरे सिडकोने निष्कासित केली. त्यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुमचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तुम्हाला भूखंड वितरीत केले जातील. परंतु त्यांना सद्यस्थितीत वेगळ्याच ठिकाणी भूखंड वितरीत केल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे तरी याबाबत सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिला आहे .याबाबत त्यांनी सिडको मुख्य भूमी व भूमापन अधिकारी यांना निवेदन दिले आहे .        या निवेदनात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी म्हंटले आहे की ,पूर्वीच्या भूखंड वाटपाबाबत बोलताना सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले होते की,तुमचे वास्त

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी झोपडपट्टीवासियांच्या नागरी समस्या महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून सोडवणार

Image
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी झोपडपट्टीवासियांच्या नागरी समस्या महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून सोडवणार*   पनवेल दि. १४ ( संजय कदम ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी झोपडपट्टीवासियांच्या नागरी समस्या महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून सोडवणार अशी ग्वाही रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी एकविरा झोपडपट्टी ओ. एन. जी. सी. काळुंद्रे यांच्यातर्फे वाढदिवसानिमित्त सत्कारा प्रसंगी उत्तर देतांना दिली.                    स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या एकविरा झोपडपट्टी ओ. एन. जी. सी. काळुंद्रे यांच्यातर्फे वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी झोपडपट्टीतील सर्व महिला वर्ग उपस्थित होते . आपल्या सत्कार पर भाषणामध्ये महेश साळुंखे यांनी सांगितले की, ज्या काही समस्या या झोपडपट्टीला असतील ज्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल , रस्त्याच्या प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांसाठी महानगरपालिकेशी संपर्क साधून आपल्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील. फोटो - महेश साळुंखे यांचा सत्कार

झाडाचा वाढदिवस साजरा करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश

Image
झाडाचा वाढदिवस साजरा करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश कळंबोली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांचा केक कापून केला झाडांचा वाढदिवस साजरा. पनवेल:( प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि रक्षण आपले कर्तव्य मानून स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी  कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार परिसरात वृक्षारोपण केलेल्या झाडांचा मंगळवारी उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा केला. अनोख्या पद्धतीने केलेल्या वाढदिवसाला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण संवर्धनामध्ये विशेष रुची असलेल्या रामदास शेवाळे प्रतिष्ठान व छत्रपती एकता गृप लोखंड बाजार कळंबोली च्या अनेक पर्यावरण प्रेमीनी लोखंड पोलाद बाजार व कळंबोली परिसरात विविध वृक्षारोपण केले आहे. आठ वर्षापूर्वी रोपण केलेल्या रोपांचे मोठ्या वृक्षात रुपांतर होऊ लागले आहे. त्याचा आनंद प्रत्येक पर्यावरणप्रेमीची चेहऱ्यांवरुन ओसंडून वाहत होता. यावेळी रामदास शेवाळे यांच्याहस्ते केक कापल्यानंतर वृक्षांना सेंद्रिय खत देण्यात आले. या वेळी झाडांची निगा राखणार्यां वा