Posts

Showing posts from August 11, 2023

श्रीवर्धन युवा प्रतिष्ठानचे कौतुकास्पद समाज कार्य

Image
श्रीवर्धन युवा प्रतिष्ठानचे कौतुकास्पद समाज कार्य  श्रीवर्धन प्रतिनिधी; राजू रिकामे                 श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावातील कु.रिया मंगेश कातकर वय वर्ष १६ हिला कायम स्वरुपी मोठ्या आजार असल्याने रियाला दर महिनाला औषधे चालू असून त्यासाठी मोठया प्रमाणात खर्च होत असतो, तिच्या आईच्या व्यतिरिक्त घरी कोणी नसून आईला सुद्धा दोन्ही किडनीचा आजार आहे त्यामुळे तिची आई जड कामे करू शकत नाही, तरीही रियाच्या औषध उपचारासाठी आणि नित्यक्रमासाठी मोलमजुरी करून घर चालवत आहे. रियाच्या घरी आई शिवाय कमवणारे इतर कोणीही नसल्यामुळे गरीब परिस्थितीमुळे वेळेवर औषधे उपचार करू शकत नाही. ही परिस्थिती कुणबी युवा प्रतिष्ठान यांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर मुलीस आर्थिक मदत प्राप्त होण्याकरिता समाज बांधवांना एका व्हाट्सएपच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले त्यामुळे समाजातील १२० समाज बांधवांनी मिळून एकूण ५० हजार रुपयाची आर्थिकदृष्ट्या मदत जमा करून, सदरची जमा झालेली मदत रक्कम कु. रिया कातकर हिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी गावातील अध्यक्ष, कमिटी सभासद व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. भविष्यात अशीच लोकोपय

नेक्सस सीवूडचा स्वातंत्र्यदिन विशेष मुलांसह - Atypical Advantage च्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम - १२ ऑगस्ट रोजी मॉलमध्ये रंगणार अनोखी मैफल

Image
नेक्सस सीवूडचा स्वातंत्र्यदिन विशेष मुलांसह - Atypical Advantage च्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम - १२ ऑगस्ट रोजी मॉलमध्ये रंगणार अनोखी मैफल प्रतिनिधी नवी मुंबई येथील नेक्सस सीवूड हा मॉल आपल्या अनोख्या उपक्रमांसाठी ओळखला जातो. सण असो वा राष्ट्रीय उत्सव, या मॉलमधील विशेष कार्यक्रम ग्राहकांचंच नाही, तर इतरांचंही लक्ष वेधतात. आता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नेक्सस सीवूड असाच एक उपक्रम राबवणार आहे. त्यासाठी त्यांना Atypical Advantage या संस्थेची मदत मिळणार आहे. १२ ऑगस्ट रोजी विशेष नेक्सस सीवूड मॉलमध्येच एक अनोखी मैफल रंगणार असून त्यात विशेषदृष्ट्या सक्षम मुलं आपलं संगीतातील कौशल्य दाखवणार आहेत.  नेक्सस सीवूड हा नवी मुंबईतील सर्वात मोठा मॉल असून दर सणाला किंवा खास प्रसंगी या मॉलमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. या हटके उपक्रमांना इथे येणाऱ्या ग्राहकांचाही प्रतिसाद मिळतो. या स्वातंत्र्य दिनासाठी त्यांना Atypical Advantage या संस्थेची साथ लाभली आहे. Atypical Advantage या संस्थेद्वारे शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तींच्या कलागुणांना आणि कौशल्यांना वाव दिला जातो. संगीत

पनवेल महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प आयोजित करण्याची माजी नगरसेवक रविंद्र भगत यांची महापालिकेकडे मागणी*

Image
पनवेल महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प आयोजित करण्याची माजी नगरसेवक रविंद्र भगत यांची महापालिकेकडे मागणी*  पनवेल दि.१० (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेच्या करासंदर्भात तसेच इतर हरकत अर्ज विषयासंदर्भात कळंबोली वॉर्ड ऑफिस ठिकाणी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत पनवेल महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प आयोजित करावी अशी मागणी माजी नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.                  यासंदर्भात रवींद्र भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कळंबोली वसाहतीच्या घरांची संख्या १ लाख असून पनवेल महानगरपालिकेने करासंदर्भात तसेच इतर हरकत अर्ज विषयासंदर्भात ९ ऑगस्ट व १० ऑगस्ट रोजी कॅम्प आयोजीत केले होते, परंतु नागरीकांपर्यंत याची जनजागृती पुर्णपणे झाली नसल्याने नागरिकांना आपल्या हरकती सादर करण्यास जमले नाही. त्यामुळे कळंबोली वॉर्ड ऑफिस या ठिकाणी पुन्हा १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत पनवेल महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प आयोजित करण्यात यावा अशी मागणी रवींद्र भगत यांनी केली आहे. फोटो : रवींद्र भगत

कवच २०२३ सायबर सिक्युरिटीचे हॅकाथॉनचे उदघाटन

Image
कवच २०२३ सायबर सिक्युरिटीचे हॅकाथॉनचे उदघाटन पनवेल दि.१०(संजय कदम): कवच 2023 सायबर सिक्युरिटी हॅकाथॉनचे उद्घाटन नोडल सेंटर नवीन पनवेल येथे महाराष्ट्र डीटीईचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्याहस्ते झाले. यावेळी एआयसीटीईचे सल्लागार डॉ. आर. उन्नीकृष्णन यावेळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्घाटन भाषणात प्रमुख पाहुण्यांनी आजच्या जगात “इनोव्हेट ऑर नाश” हा नवा मंत्र आहे यावर भर दिला. तसेच भारताच्या इनोव्हेशन ग्लोबल रँकमध्ये 2015 मधील 81 व्या क्रमांकावरून 2022 मध्ये 40 व्या क्रमांकावर आल्याची माहिती देत 2020 ते 2023 या कालावधीत सायबर गुन्ह्यांमध्ये 121% वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नवीन पनवेल यांनी यजमान म्हणून काम केले आणि 22 सहभागी संघ आणि मूल्यांकनकर्त्यांना सर्व तांत्रिक सहाय्य आणि आदरातिथ्य प्रदान केले. स्पर्धेच्या 36 तासांच्या यशस्वी पूर्ततेवर मूल्यांकनकर्त्यांनी त्यांच्या परस्परसंवादावर आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीवर आधारित विजेत्यांची निवड करण्यात आली. दरम्यान आज झालेल्या या समापन समारंभात कवच 2023 च्या विजेत्यांची घो

देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे यांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेेल्या दोघा जणांना मुुंब्रा पोलिसांनी केले गजाआड

Image
देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे यांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेेल्या दोघा जणांना मुुंब्रा पोलिसांनी केले गजाआड पनवेल, (संजय कदम) ः देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे यांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेेल्या दोघा जणांना मुुंब्रा पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे मोठ्या प्र्रमाणात इतर गुन्हेगारी उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे एन.डी.पी.एस. पथकास कौैसा पेट्रोल पंप कौसा मुंब्रा या ठिकाणी दोन इसम देशी बनावटीचेे पिस्टल विक्री करीता घेवून येणार असल्याची माहिती मिळताच वपोनि निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक नितीन भोसले, पो.अंमलदार धनंजय घोडके, प्रमोद जमदांडे, अजित येळे, सुकदेव देवकर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी इसम मोहम्मद हाशीम इस्त्राईल खान (29 रा.फत्तेहपूर) व त्याचा सहकारी मोहमद रजा मोहमद वजी खान (24 रा.फत्तेहपूर) या दोघांंना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत

मनसेनेचे दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष सुबोध जाधव यांसकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

Image
मनसेनेचे दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष सुबोध जाधव यांसकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रतिनिधी / राजू रिकामे. .श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव मधील रायगड जिल्हा परिषद शाळा येथे गुरुवार दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष मा. सुबोध शेठ जाधव साहेब यांसकडून शाळेसाठी इलेक्ट्रॉनिक बोर्ड आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वह्या) आणि छत्री वाटप केले.                                               या वेळी सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच आणि शाळा समितीचे अध्यक्ष, सरपंच, पालक व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहाच्या वातावरणात शाळेतल्या मुलांनी आणि शिक्षकांनी सहकार्य केले. सन्मा. शिक्षक वर्गाने सर्वांचे आभार मानले. मनसेचे तोंडलेकर यांनी शाळेचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांची शिस्त शाळेची स्वच्छता आणि सर्वांगीण गोष्टींवर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी देखील सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे द

म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसला दे धक्का . म्हसळा तालुक्यातील मुस्लीम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश .

Image
  म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसला दे धक्का . म्हसळा तालुक्यातील मुस्लीम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश .  जिल्हा प्रमुख अनिल नवगणे श्रीवर्धन मतदार संघाचे संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर उप जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या प्रमुख उपस्थीत शेकडो मुस्लीम कार्यकर्त्यांचा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात जाहीर प्रवेश यावेळी तालुका प्रमुख निगुडकर रवि लाड महीला आघाडी कार्यकर्त्या शिवसेना कार्यकर्ते उपस्थीत होते