Posts

Showing posts from August 5, 2023
Image
रायगड जिल्ह्यासाठी एकूण 1,10,00,00,616.09 रुपये मंजूर - अदिती तटकरे  मग एवढा पैसा जातो कुठे? जनतेला नेहमी पडणारा प्रश्न? 🫢 #आपत्ती विभाग रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 10 कोटी रुपये. #जून 2023 अखेर झालेल्या 187.77 कोटीच्या खर्चास तसेच 68.32 कोटी रकमेच्या पूनर्विनियोजनास मान्यता. # 2023-24 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी अर्थसंकल्पिय तरतूद 360.00 कोटी रुपये.  रायगड मत विशेष बातमी  अलिबाग येथे पालकमंत्री मा.ना.उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थित राहिले.यावेळी खा.श्री.सुनिल तटकरे साहेब, आ.श्री.जयंतभाई पाटील, आ.श्री.अनिकेत तटकरे,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.श्री.रविंद्र पाटील, आ.श्री.भरत गोगावले,आ.श्री.प्रशांत ठाकूर, आ.श्री.महेंद्र दळवी,आ.महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी,पनवेल महानगरपालिका आयुक्त,जिल्हा नियोजन अधिकारी तसेच शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.          यावेळी बैठकीत रायगड जिल्हा वार्षिक योजना 2022-23 या आर्थिक वर्षातील जून 2023 अखेर झालेल्या 1

शनिवारी पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

Image
आज पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य  पनवेल (प्रतिनिधी) कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नाद्ब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेलच्या विद्यमाने शनिवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०५ वाजता पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.           मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, भजनसम्राट रायगड भूषण ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, सिडको युनियनचे सेक्रेटरी जे. टी. पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, ह. भ. प. नंदकुमार कर्वे यांची उपस्थिती लाभणार आहे.           या कार्यक्रमात प्रख्यात गायक रायगड भूषण उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्