Posts

Showing posts from August 4, 2023

खरसई ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच निलेश मांदाडकर यांचा विकासासाठी भाजप मध्ये प्रवेश. #आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त चांगली गिफ्ट.

Image
#खरसई ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच निलेश मांदाडकर यांचा विकासासाठी भाजप मध्ये प्रवेश. #आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त चांगली गिफ्ट. #म्हसळा तालुक्यात आता भाजपा वाढवणार म्हसळा (रायगड मत) खरसई चे दिग्गज कार्यसम्राट सरपंच आणि समाजसेवक निलेश शेठ मांदाडकर यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला. त्यामुळे म्हसळ्यातील राजकारण तापले आहे. एक वेगळीच चर्चा एकण्यास मिळत आहे. शेकाप मधे एवढे वर्षे असताना अचानक हा बदल का झाला. मात्र विकास कामे आणण्यासाठी त्यांनी भाजपची कास धरल्याचे बोलले जातं आहे. भारतीय जनता पार्टी मध्ये काल मुंबई पक्ष कार्यालयात मा. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, धैर्यशील पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष,  रायगड संघटक सतिष धारप, युवा मोर्चाचे विक्रांत पाटील, निलेश थोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आले. म्हसळयातील जनतेने त्यांना लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांसी सम भावनेने आणि मिळून मिसळून काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे.

अंटार्क्टिकामधून ग्रीनलँडच्या आकाराचा महाकाय हिमनग गायब झाला; जगासाठी धोक्याची घंटा

Image
अंटार्क्टिकामधून ग्रीनलँडच्या आकाराचा महाकाय हिमनग गायब झाला; जगासाठी धोक्याची घंटा रायगड मत world news  अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) समुद्रात वितळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जात आहे.  जगातली बर्फाची खाण असलेल्या अंटार्टिकामधून (Antarctica) एक अतिप्रचंड हिमनग वेगळा झालाय. याचा आकार एवढा प्रचंड आहे की त्यानं जगभरातील शास्त्रज्ञांना धडकी भरवली आहे. या हमनगाचा आकार हा ग्रीनलँड बेटा इतका मोठा आहे. जगभरातील पर्यावरणप्रेमी,अभ्यासक आणि वैज्ञानिक यांची चिंता वाढली आहे.   2 महिने सदैव बर्षाच्छादित असलेला देश म्हणून ग्रीनलँड भाग माहित आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात मोठे बर्फाच्छादित बेट अशीही या ग्रीनलॅडची एक वेगळी ओळख आहे. याच ग्रीनलँडच्या आकाराचा हिमनग हा अंटार्क्टिकामधून गायब झाला आहे. हिमनग समुद्रात वितळल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामधील बर्फ झपाट्यानं वितळतोय. अंटार्क्टिकामधील पश्चिम भागातील रोन्ने आईस सेल्फमध्ये असणारा हा महाकाय हिमनग वितळला आहे. हा महाकाय हिमनग वितळल्याने चिं