Posts

Showing posts from August 1, 2023

#10 ऑगस्ट पर्यंत होणार शिंदे सरकार Discolifide. कायदेशीर रित्या अपात्र #महाराष्ट्राच्या राजकारणात होणार हडकंप

Image
#10 ऑगस्ट पर्यंत होणार शिंदे सरकार Discolifide. कायदेशीर रित्या अपात्र  #महाराष्ट्राच्या राजकारणात होणार हडकंप #शिंदेचा राजीनामा लवकरच होणार अजित पवार मुख्यमंत्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या अजित पवार यांना शुभेच्छा.... # राज्य महाराष्ट्राचे चालवतायेत गुजरातवाले # कामावर बदली कशी असते तशी बदली करत आहेत. 2019 ते 2024 पर्यंत 5 वर्षात एकूण 3 मुख्यमंत्री होतील. # महाराष्ट्राचा ऱ्हास करायचा आहे. # मुंबई वेगळी करायचे आहे. # महाराष्ट्राचे विभाजन करायचे आहे.

श्री सोमजाईमाता क्रीडा मंडळ खरसई (ट्रस्ट) यांच्या वतीने मोफत वह्या वाटप

Image
श्री सोमजाईमाता क्रीडा मंडळ खरसई (ट्रस्ट) यांच्या वतीने मोफत वह्या वाटप  म्हसळा : जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचलित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगरवाडा येथे श्री सोमजाईमाता क्रीडा मंडळ खरसई (ट्रस्ट) यांच्या वतीने मोफत वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पाटील. सोमजाईमाता क्रीडा मंडळ संस्था प्रमुख चंद्रकांत खोत,जेष्ठ कार्यकर्ते नथुराम खोत, संचालक दिलीप कांबळे सर्व शिक्षक वृंद, पालक रा जि प.शाळा आगरवाडा येथील विदयार्थी उपस्थित होते

पनवेल महापालिका क्षेत्रातील निराधार महिलांना मालमत्ता करात सवलत देण्याची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी

Image
पनवेल महापालिका क्षेत्रातील निराधार महिलांना मालमत्ता करात सवलत देण्याची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी पनवेल दि.०१ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निराधार महिलांना आधार देण्यासाठी त्यांच्या मालमत्ता करात सवलत देण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी पनवेल महापालिकेकडे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिले.               विश्वास पेटकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र शासनातर्फे निराधार वंचित महिला-पुरुष यांना आधार म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सवलत योजना दिल्या जातात. जेणेकरून त्यांना आधार मिळेल. यामध्ये रेशनमध्ये सवलत, शासकिय अनुदान दिले जातील. जोपर्यंत निराधारांची मुले २२ वर्षाची होतात. तोपर्यंत शासनातर्फे सवलत दिली जाते. कोविड व इतर काही अपघातामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावल्या कारणाने निराधारांना कोणत्याही प्रकारची आधार नाही. त्यामुळे आपण सहानुभूतिपूर्वक विचार करून निराधारांना आधार म्हणून पनवेल महानगरपालिकेतर्फे त्यांना मालमत्ता करात विशेष सवल

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागात छत्री वाटप उपक्रम*

Image
*उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागात छत्री वाटप उपक्रम* पनवेल दि.०१ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाप्रमुख संदिप तांडेल यांच्या वतीने शिवसेना शाखा विचुंबे आणि देवद येथे छत्री वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.               यावेळी पनवेल तालुका प्रमुख संदीप तांडेल, पनवेल तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे,कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, विभागप्रमुख विचुंबे विशाल भोईर, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, सुकापूर शाखाप्रमुख हनुमंत खंडागळे सचिन खरात विभाग प्रमुख धनंजय पाटील, उपविभाग प्रमुख सुमित सुळे उपविभाग प्रमुख नितीन पाटील, उपशहर प्रमुख नविन पनवेल ज्ञानेश्वर भंडारी शिवसैनिक हरिचंद्र कदम शाखा संघटीका नम्रता शिंदे यावेळी उपस्थित होत्या. फोटो : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे झाले सेवानिवृत्त

Image
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे झाले सेवानिवृत्त पनवेल दि.०१ (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्यात प्रशासकीय विभागात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक दिलीप महादेव शिंदे हे सेवा निवृत्त झाले आहेत. या निमित्ताने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्यांचा सहपत्नीक विशेष सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन पनवेल शहर पोलीस ठाण्यात वपोनि नितीन ठाकरे यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी वपोनि विजय कादबाने, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, प्रमोद पवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.               सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांचा पोलीस सेवेतील कार्यकाळ खडतर असा होता. कोकणसुपुत्र असलेले दिलीप शिंदे हे २० ऑगस्ट १९८३ रोजी पोलीस खात्यात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत त्यांनी पोलीस खात्यात कार्यरत असताना इतर पोलीस परीक्षा देत त्यांना पदोन्नती मिळाली. मुंबई येथे कार्यरत असताना ते प्रामख्याने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचे खाजगी सुरक्षारक्षक म्हणून अनक

शिवसेनेच्या पाठपुरावाला यश; कळंबोलीतील मुख्य रस्ते होणार काँक्रीट*

Image
*शिवसेनेच्या पाठपुरावाला यश; कळंबोलीतील मुख्य रस्ते होणार काँक्रीट* पनवेल दि.०१ (वार्ताहर) : कळंबोली वसाहतीतील रस्त्यांच्या दुरावस्थेवर मात्रा म्हणून या ठिकाणचे मुख्य रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. या पक्षाचे शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी केलेल्या पाठपुराव्याला अंशता यश मिळाले आहे. पावसाळ्यानंतर याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.                  कळंबोली वसाहतीमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ही कॉलनी समुद्रसपाटीपासून साडेतीन मीटर खाली असल्याने. कमी पावसातही वसाहत जलमय होते. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होते. सध्या अंतर्गत रोडची एक प्रकारे चाळण झाली आहे. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव शिवसेना शिंदे गटाचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी दिला होता. जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका क्षेत्रातील विविध प्रश्नांसंदर्भात सर्व शहर प्रमुखांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी कळंबोलीतील रस्त्यांच

६० हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग रेल्वे आरपीएफने प्रवाश्याला मिळवून दिली परत*

Image
६० हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग रेल्वे आरपीएफने प्रवाश्याला मिळवून दिली परत* पनवेल दि.०१ (संजय कदम) : खगरपूर ते पनवेल रेल्वे प्रवास करत असताना ६० हजार रुपयाचा मुद्देमाल असलेली बॅग विसरलेल्या प्रवाश्याला पनवेल रेल्वे आरपीएफने त्याची बॅग परत मिळवून दिली. बॅग मिळण्याची अत्यंत धुकट आशा असतानाही प्रवाश्याला त्याची बॅग मुद्देमालासह परत मिळाल्याने त्याने आरपीएफचे आभार मानले.   सुमन कुमार पात्रा (वय 34, रा. पश्चिम बंगाल) हे आपल्या कुटुंबासह सांतरागाछी - पुणे हमसफर एक्सप्रेसने खरगपूर ते पनवेल प्रवास करत असताना पनवेल स्थानकात त्यांची ट्रेन आल्यानंतर ते आपल्या सामान व कुटुंबासह उतरले मात्र घाईगडबडीत ते आपली सोन्याची वस्तू, महत्वाची कागदपत्रे व रोख १० हजार असे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली हॅन्डबॅग रेल्वेमध्येच विसरले. हि गोष्ट त्यांना रेल्वे पुढे गेल्यानंतर लक्षात येताच त्यांनी पनवेल रेल्वे आरपीएफकडे याबाबत सविस्तर सांगितले. तात्काळ पनवेल रेल्वे आरपीएफने कर्जत आरपीएफकडे याबाबतची सूचना देऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार सदर ट्रेन कर्जत स्थानकात पोहोचताच हेड कॉन्स्टेबल रामजीत कनोजिया

वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी नको- आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

Image
  वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी नको-  आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन  पनवेल (प्रतिनिधी) : माझ्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी करू नये, त्याऐवजी सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.  आमदार प्रशांत ठाकूर यांचा ०५ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाला हजारोंच्या संख्येने हितचिंतक शुभेच्छा देत असतात. अशावेळी पुष्पगुच्छ, भेटवस्तू त्याचबरोबर बॅनर द्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तसे न करता वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी करू नये, त्याऐवजी सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केले आहे.

#दमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन #शनिवारी पनवेलमध्ये 'गीतरामायण' #लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा #आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम

Image
 #दमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  #शनिवारी पनवेलमध्ये 'गीतरामायण' #लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा #आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम  पनवेल (प्रतिनिधी ) : कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नाद्ब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेलच्या विद्यमाने शनिवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०५ वाजता पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.           मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, भजनसम्राट रायगड भूषण ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, सिडको युनियनचे सेक्रेटरी जे. टी. पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषे

आमदार अनिकेत भाई तटकरे लक्षवेधी मांडताना झाले आक्रमक, भूमिगत विदयुत वाहिनी का होता नाहीत आणि भरमसाठ light बिले का येतात..म्हसळा शहरातील विदयुत वाहिन्या जमिनीखालून कराव्यात, सरोज मंगेश म्हशीळकर यांना लिहिले आमदारांना पत्र निसर्ग चक्रीवादळात 2 महिने विजपुरवठा बंद होता, तेव्हापासून भूमिगत विद्युत वाहिनी करणार असे ठरले होते मात्र पुढे काही झाले नाही?

Image
https://youtu.be/jSIF9ik8avI म्हसळा शहरातील विदयुत वाहिन्या जमिनीखालून कराव्यात, सरोज मंगेश म्हशीळकर यांना लिहिले आमदारांना पत्र निसर्ग चक्रीवादळात 2 महिने विजपुरवठा बंद होता, तेव्हापासून भूमिगत विद्युत वाहिनी करणार असे ठरले होते मात्र पुढे काही झाले नाही? म्हसळा (जितेंद्र नटे) म्हसळा तालुका शहर हा अत्यंत दुर्गम असा भाग आहे. एकेबाजूला नदी तर एका बाजूला डोंगराने वेढलेले हे शहर तालुका आहे. सध्या या शहराची लोकवस्ती 15 ते 20 हजाराच्या आसपास असण्याची शक्यता आहे. अनेक लोक येथे रोजगार, कामधंधा तसेच खरेदीसाठी येत असतात. यामुळे शहर तालुका अत्यंत गजबजलेले असते. मात्र या शहरात अजूनही विदयुत वाहिन्या या उभे पोल मार्फत आहेत. अनेक वेळा पोळच्या दुर्घटना घडल्या आहेत. चक्क म्हसळा नगरपंचायत च्या इमारती जवळच पोल विदयुत वाहिनन्यांचा "झूपडा" पाहायला मिळतो आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटचे अनेक प्रकार घडून अपघात झाले आहेत आणि पुढेंही होणार आहेत. म्हणूनच सरोज मंगेश म्हशीळकर यांना एक पत्र आमदार आदिती ताई तटकरे, आमदार अनिकेत भाई तटकरे यांना लिहून लक्ष वेधले आहे. याच प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत आमदार अ