म्हसळ्यात पेटलं सुडाचं राजकारण... # भ्रष्टाचारा विरोधात आवाज उचलणारा पत्रकार सुडाच्या राजकारणाचा बळी...
म्हसळ्यात पेटलं सुडाचं राजकारण... भ्रष्टाचारा विरोधात आवाज उचलणारा पत्रकार सुडाच्या राजकारणाचा बळी... म्हसळा (मुदस्सिर पटेल) मागील काही वर्षापासून म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायती मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते व कोकण 24 न्यूज चे मुख्य संपादक अझहर धनसे यांनी या पांगळोली ग्रामपंचायती च्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठविला होता व तशी तक्रार त्यांनी कोकण अयुकतां कडे केली होती व कोकण आयुक्तांनी अझहर धनसे यांनी केलेल्या तक्रारीबाबत चौकशी करून माननीय कोकण अयुक्तांनी पांगळोली सरपंच तसेच पांगळोली गांव चे ग्राम विकास अधिकारी गणपती केसरकर यांना भ्रष्टाचारात दोषी मानून पांगळोली ग्रामपंचायती मध्ये ६० लाख एक हजार 16 रुपयांचा अपहार झाला असल्याचा निर्णय देत पांगळोली सरपंच तसेच ग्राम विकास अधिकारी यांच्या कडून सदर ची रककम वसूल करण्याचे आदेश व केलेल्या भ्रष्टाचारा बाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश माननीय कोकण आयुक्तांनी दिले होते मात्र कारवाई न करता म्हसळा गटविकास अधिकारी यांनी कोकण आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने सध्या म्हसळा तालुक्यात या विषयाचा चांगलाच गाज