Posts

Showing posts from July 29, 2023

यंदाचा शेकापचा वर्धापन दिन कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारा - प्रितम म्हात्रे खा.संभाजीराजे यांच्या उपस्थितीत २ ऑगस्ट रोजी सुधागड पाली येथे भव्य वर्धापन मेळावा

Image
यंदाचा शेकापचा वर्धापन दिन कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारा - प्रितम म्हात्रे खा.संभाजीराजे यांच्या उपस्थितीत २ ऑगस्ट रोजी सुधागड पाली येथे भव्य वर्धापन मेळावा पनवेल दि २९ (वार्ताहर) : शेतकरी कामगार पक्षाचा येत्या २ ऑगस्ट रोजी साजरा होणारा वर्धापन दिन हा शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसाठी नवीन स्फूर्ती घेऊन येणारा वर्धापन दिन असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले.                  यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण पुढच्या वर्षाची वाटचाल करत असतो आणि दोन ऑगस्ट रोजी कितीही पाऊस असला, कितीही संकटे असली तरीसुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा वर्धापन दिन जिथे असेल तिथे कुठल्याही परिस्थितीत पोहोचतो. आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथून नवीन वाटचाल सुरू करतो. यावर्षीच्या वर्धापन दिनानमित्त खास बाब अनुभवण्यास मिळणार आहे. कारण छत्रपती संभाजीराजे हे शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनासाठी आपली हजेरी लावणार आहेत, तसेच ते शेकापच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्य

नैना प्रकल्प कायमचा हद्दपार करण्यासाठी प्रकल्प बाधितांचा विधिमंडळावर पायी धडक मोर्चा

Image
नैना प्रकल्प कायमचा हद्दपार करण्यासाठी प्रकल्प बाधितांचा विधिमंडळावर पायी धडक मोर्चा पनवेल / प्रतिनिधी. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा नैना प्रकल्प हा बिल्डर्स धार्जिणा आहे. स्वतःची तसूभर जमीन नसताना देखील सिडको प्रशासनाची ही एजन्सी शेतकऱ्यांच्या जमिनीपैकी ६० टक्के जमिनीवर कब्जा करणार आहे.इतकेच नव्हे तर यापूर्वी ग्रामपंचायतीकडून रीतसर परवानगी घेतलेली घरे देखील अनियमित ठरवत नैना प्राधिकरणाने अक्षरशः जुलूम सुरू केलेला आहे. शेतकऱ्यांच्या भावना अधिवेशनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडी आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीने पनवेल ते विधिमंडळ अशा पायी लॉन्ग मोर्चाचे नियोजन केले आहे. येत्या तीन ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चा बाबत प्रसिद्धी माध्यमांना अवगत करण्यासाठी पनवेलच्या शेतकरी कामगार पक्ष कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांना अवगत करताना माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की लाँग मार्चच्या माध्यमातून सरकारपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या भावना पोहोचविणार आहोत. शेतकऱ्यांचा पराकोटीचा विरोध होत असताना देखील नैना या एजन्सीने भूखंड वाटपाबाबत बिल्डर मंडळी स