पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने आवश्यक निधी देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने आवश्यक निधी देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तसेच प्रणाली बळकट करण्यासाठी तातडीने आवश्यक निधी देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात माहिती दिली. चार ते पाच वर्षाचा कालावधी होऊनसुध्दा पनवेलमधील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची कामे अद्याप सुरू झालेली नाही. वीज वाहिन्या भूमीगत करण्यासाठी कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेल्या प्रचंड असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने आवश्यक तो निधी उपलब्ध करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही व उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे केली