शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पंतप्रधान किसान सुविधा केंद्र- जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी गुरुवारी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पंतप्रधान किसान सुविधा केंद्र- जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी गुरुवारी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल (प्रतिनिधी) शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते.पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे.एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे, आणि या केंद्राचे लोकार्पण देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी २७ जुलै रोजी राजस्थान येथे होणाऱ्या सोहळ्यातून करणार असल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आज पत्रकारांशी संवाद करताना दिली. त्यांनी पुढे माहिती देताना पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांची उद्दिष्टे सांगितले. यामध्ये शेतक-यांना दर्जेदार बी-बियाणे, औषध