गिरणे ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती कैलास पायगुडे यांनी मालाठे वाडी येथील विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना लागणारे वर्ष भराचे शैक्षणीक साहित्य केले वाटप.
गिरणे ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती कैलास पायगुडे यांनी मालाठे वाडी येथील विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना लागणारे वर्ष भराचे शैक्षणीक साहित्य केले वाटप. तळा : मा. खासदार तथा राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, महिला व बालकल्याण मंत्री महोदय कू.आदिती ताई तटकरे ,आमदार अनिकेत भाई तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मा. लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मानीय गिरणे ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती कैलास पायगुडे यांनी मालाठे वाडी येथील विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना लागणारे वर्ष भराचे शैक्षणीक साहित्य(दफ्तर, वह्या, पेन,पेन्सिल, चप्पल,)वाटप करण्यात आले.उपस्थित राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष कैलास मुकुंद पायगुडे, शहर अध्यक्ष महेंद्र दादा कजबजे साहेब, मुख्याध्यापक पठाण सर,नगर सेवक मंगेश शिगवण साहेब,पत्रकार संजय रिकामे साहेब, वाघवडी येथील अध्यक्ष बाळा भाऊ वाघमारे, व ग्रामस्थ उपस्थित होते.