Posts

Showing posts from July 25, 2023

पनवेलच्या सुकन्यांचे भविष्य होणार समृद्ध! # मनपा क्षेत्रातील 1000 मुलींच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळणार # आमदार प्रशांत ठाकूर स्वखर्चाने खाते उघडणार

Image
  पनवेलच्या सुकन्यांचे भविष्य होणार समृद्ध! मनपा क्षेत्रातील 1000 मुलींच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळणार आमदार प्रशांत ठाकूर स्वखर्चाने खाते उघडणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची अनोखी भेट पनवेल( प्रतिनिधी) कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 2023 मध्ये जन्मलेल्या 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे ते स्वखर्चाने एक हजार रुपये भरून या बालिकांचे नवीन खाते उघडणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.         सुकन्या समृद्धी खाते ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जा

श्रीवर्धन -बोर्ली रोड वाहतुकीसाठी धोकादायक

Image
श्रीवर्धन -बोर्ली रोड वाहतुकीसाठी धोकादायक*  श्रीवर्धन प्रतिनिधी संदीप लाड)  :-तालुक्यातील श्रीवर्धन बोर्ली रोड हा वाहतुकीच्या दृष्टिने खूप वर्दीळीचा रोड मानला जातो. दांडगुरी असुफ पासुन बोर्ली पर्यंतचा रोड खुप अरुंद असून,दोन वाहन मुश्किलीने पास होत असतात,त्यात मे महिन्यात रस्त्यालगत साईड पट्टया खोदून खाजगी (एअरटेल) मोबाईल कंपनीने भूमिगत केबल टाकण्याच काम केल आहे.त्याच खोदलेल्या  साईडपट्ट्या ठेकेदाराकडून व्यवस्थित पद्धतीने न भरल्या कारणाने पावसाचे पाणी साचुन त्या खचत चालल्या आहेत.त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना होत आहे.बोर्ली ते दांडगुरी मध्यभागी असलेल्या आसुफ गावाजवळ पिकअप टेम्पो ट्रॅक्टर ला ओव्हरटेक करत असताना साइड पट्टी ला उतरला असता दोनी टायर मातीत रुतून अडकून बसला.रात्रीच्या वेळीस पण खचलेल्या साईड पट्टीचा अंदाज येत नसल्या कारणाने खूप मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही .संबंधित विभागाने व ठेकेदाराने या गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे. असा सवाल वाहन चालक व नागरिक उपस्थित करत आहेत.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंड उपलब्ध करून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी आग्रही

Image
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंड उपलब्ध करून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी आग्रही  पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंड उपलब्ध करून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे वेधले.             पनवेल तालुक्यातील ७१ ग्रामपंचायत हद्दीतील वाढते नागरिकरण लक्षात घेता कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी डंपिंग ग्राऊंड उपलब्ध नसल्यामुळे मोठया प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले असून तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींनी सिडको प्रशासन, वन विभाग, पंचायत समिती, एमआयडीसी व जिल्हाधिकारी कार्यालयांकडे डंपिंग ग्राउंडसाठी जागेची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राऊंड उपलब्ध करुन देण्याबाबत किंवा कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आह

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेची इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत

Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेची इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत पनवेल (संजय कदम) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खालापूर येथील इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्त लोकांची भेट घेत त्यांना अन्नधान्य व दैनंदिन आवश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच आणि त्याची डॉक्टरांकडून स्वैच्छिक वैद्यकीय तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले.                शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवआरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ किशोर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉक्टर जयवंत गाडे, महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ, उपसभापती श्याम साळवी, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उपसरपंच सचिन मते, युवासेना तालुका संघटक निखिल मालुसरे यांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने खालापूर येथील इर्शाल वाडी दुर्घटनाग्रस्त लोकांची शिवआरोग्य सेना पनवेल रायगड जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना वस्तू रुपी दैनंदिन आवश्यक साहित्य, कपडे, चादर, साड्या, टॉवेल, पाणी, सूके खाद्यपदार्थ, बिस्किट्स, महिलांच्या आवश्यक वस्तू, तेल, धान्य यांचे वाटप केले. तसेच तज्ञ डॉक्टरांकडून त्यांची स्वैच्छिक

आझाद कामगार संघटनेचा २६ जुलैला सिडको भवनावर आक्रोश मोर्चा

Image
आझाद कामगार संघटनेचा २६ जुलैला सिडको भवनावर आक्रोश मोर्चा पनवेल  (वार्ताहर) : सिडको मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांच्या वारसांना कामावर घेण्यास प्राधिकरणाकडून टाळाटाळ केली जात आहे. सिडकोच्याच प्रथेला सिडकोच बगल देत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून आझाद कामगार संघटना विशेष रेल्वे प्रकल्प सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय न झाल्यास 26 जुलै रोजी सिडको भवनावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे.                 गेल्या तीन दशकांपासून सिडको महामंडळाकडे हे सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. वास्तविक पाहता त्यांना कायम करून घेणे आवश्यक होते परंतु त्याकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. त्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. महामंडळाकडे आरोग्य, अभियांत्रिकी, सिडको रेल्वे प्रकल्प या विभागाकडे जवळ जवळ 700 कामगार काम करतात. मात्र ज्यांचे 60 वर्षे वय पूर्ण झाले आहे. त्यांना कामावर न घेण्याचे आदेश ठेकेदाराला सिडकोच्या विशेष रेल्वे प्रकल्प विभागाकडून द

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत कार्यकर्त्यांना टी शर्ट व छत्र्यांचे वाटप*

Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत कार्यकर्त्यांना टी शर्ट व छत्र्यांचे वाटप*   पनवेल  (संजय कदम) : स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वतीने महाराष्ट्राच्या कोर कमिटीची बैठक शासकीय निवासस्थान पनवेल येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष सागर संसारे, पक्षाचे युवा नेते अनिकेत संसारे उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांना टी शर्ट व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.                      महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाळाराम जाधव, मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित हिरवे, पक्षाचे संघटक भगवान गरूड, मुंबईचे नेते विजय जाधव, महाराष्ट्र सचिव अशोक वाघमारे पक्षाचे नेते सुमित संसारे मराठवाड्याचे पक्षाचे नेते व नगरसेवक विजय साळवे अनेक मान्यवर नेत्यांसह महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्याचे व तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पनवेलचे डॉक्टर गिरीश गुणे व उद्योगपती राहुल पाटील यांच्या हस्ते उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना टी शर्ट व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आ

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अमोल ऑटो येथे इन अँड आउट स्टोअरचे उद्घाटन

Image
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अमोल ऑटो येथे इन अँड आउट स्टोअरचे उद्घाटन* पनवेल: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्राहकांच्या किरकोळ विक्रीवर लक्ष केंद्रित करण्याच्या BPCL च्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, BPCL च्या रिटेल आउटलेट M/S अमोल ऑटो येथे इन अँड आउट स्टोअरचे पनवेल तालुक्यातील शेडूंग येथे उद्घाटन करण्यात आले.  यामध्ये लोकांना आणि ग्रामीण भागातील लोकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार ब्रँडेड घरगुती वस्तू उपलब्ध करून देणे या हेतूने भारत पेट्रोलियमने ग्रामीण भागात तालुका स्तरावर अमोल ऑटो शेडूंग येथे रिटेल आउटलेट दुकाने उघडले आहे. ज्यामध्ये उर्जा देवी यांचीही गावपातळीवर नियुक्ती करण्यात आल्या आहे.   या उद्धाटन प्रसंगी भारत पेट्रोलियमचे पी.एस. रवी ईडी [कॉर्पोरेट संस्था], अनिल कुमार पी ईडी [GAS], शुभंकर सेन, हेड [रिटेल] वेस्ट, बिजू गोपीनाथ, प्रमुख [नवीन व्यवसाय], राकेश के. सिन्हा, राज्य प्रमुख [रिटेल] महाराष्ट्र आणि गोवा, उमेश कुलकर्णी, टेरिटरी मॅनेजर [रिटेल] मुंबई, हजर होते तसेच भारत पेट्रोलियमचे कर्मचारी व पनवेल परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने ओपन एज्युकेशनच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Image
रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने ओपन एज्युकेशनच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप * पनवेल : पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना कळंबोली शहर तसेच रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्त्या संध्याराणी पाटील यांच्या पुढाकाराने कळंबोली येथील एक्स्प्रेसवे उड्डाणपुलाखाली शिक्षण घेत असलेल्या ओपन एज्युकेशनच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.               या कार्यक्रमात रामदास शेवाळे, संध्याराणी पाटील, वनिता रिटे, संजीवनी सोनवणे, आनंद माने, विराट पवार, सुभाष घाडगे, दीपक कारंडे, वैभव लोंढे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गरीब-गरजू विद्यार्थ्यांना खडतर परिस्थितीमध्ये शिक्षणाचे पाठ देणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भविष्यात शिक्षणासाठी कोणतीही अडचण आल्यास रामदास शेवाळे प्रतिष्ठान विद्यार्थी व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. शिक्षणाचा सर्वांना समान अधिकार आहे. मात्र काहींना परिस्थितीअभावी शिक्षणा

श्रीवर्धन तालुका प्रशासनाकडून दरड प्रवण क्षेत्राची पाहणी

Image
श्रीवर्धन तालुका प्रशासनाकडून दरड प्रवण क्षेत्राची पाहणी   श्रीवर्धन तालुका प्रशासनाकडून दरड प्रवण क्षेत्राची पाहणी   प्रतिनिधी राजू रिकामे        सद्यस्थितीत पावसाने सर्वत्र जोर पकडला आहे. अशाप्रसंगी श्रीवर्धन तालुका प्रशासनाने शहरातील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केली आहे. धोंड गल्ली, रोहिदास नगर या ठिकाणी जाऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे, महसूल नायब तहसीलदार विपुल ढुमे , मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे . सबंध रायगड जिल्ह्यात विविध तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गंभीर्य लक्षात घेऊन श्रीवर्धन तालुका प्रशासनाने नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. तसेच कोणत्याही स्वरूपाची आपत्ती निर्माण झाल्यास तात्काळ आपत्ती कक्षाशी संवाद संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शहरातील धोंड गल्ली हे अतिशय उंचावर वसलेली वस्ती आहे. तसेच रोहिदास नगर मध्ये संरक्षक बंधाऱ्याच्या भिंतीला तडे गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने संबंधित जागेची

श्रीवर्धन तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर

Image
श्रीवर्धन तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर                              श्रीवर्धन प्रतिनिधी राजू रिकामे जुलै महिन्यात सबंध रायगड मध्ये पावसाने जोर पकडला आहे . जुलै महिना भात शेतीसाठी पूरक ठरत आहे. अशा प्रसंगी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी उपक्रम सर्वत्र जोरात राबवला जात आहे . श्रीवर्धन तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी तालुक्यातील प्रगत शेतकरी इफ्तिकार चरफरे यांच्या शेतात बांधावर जाऊन ई पीक पाहणी केलेली आहे . सदरच्या उपक्रम प्रसंगी महसूल नायब तहसीलदार विपुल ढुमे , मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर , तलाठी सुदर्शन पालवे , यांच्या समवेत ई पीक पाहणी प्रसंगी उपस्थित होते . सन 2023 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप द्वारे ई पीक पाहणी करण्यासंदर्भात तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे . श्रीवर्धन तालुक्यात जवळपास लहान व मोठे 72 गावे आहेत. सद्यस्थितीत तालुक्याची लोकसंख्या 85000 च्या जवळपास आहे. मोबाईल ॲप द्वारे ई पीक पाहणी केल्यास शेतकऱ्याचा वेळ वाचणार आहे . तसेच महसूल प्रशासनाला शेतसारा गोळा करणे सोपे जाणार आहे .

माळी समाज श्रीवर्धन व अलिबाग शासकीय रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन येथे रक्तदान शिबिर

Image
माळी समाज श्रीवर्धन व अलिबाग शासकीय रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन येथे रक्तदान शिबिर श्रीवर्धन प्रतिनिधी राजू रिकामे श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालय येथे माळी समाज श्रीवर्धन व अलिबाग शासकीय रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोरे मॅडम व डॉ. मधुकर ढवळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले . श्री संत सावता माळी हे माळी समाज यांचे दैवत असून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक २४ रोजी अलिबाग शासकीय रक्त केंद्र यांच्यासह उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन यांच्या सहकार्याने माळी समाज श्रीवर्धन याने अतिशय उत्तम प्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात १११ रक्तदात्यांनी आपलं रक्तदान करून "रक्तदान हे श्रेष्ठदान" आहे हे दाखवून दिले.  शिबिरामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावातून हरिहरेश्वर, दिवेआगर तसेच श्रीवर्धन शहरातील प्रत्येक पाखाडी, आळी मधून बरेच असे रक्तदाते, माळी समाजातील तरुण-तरुणी तसेच व्यापारी मित्र मंडळ श्रीवर्धन यांनी शिबिरात उस्फूर्त