सावधान! रायगड जिल्हा, मुबंई तसेच संपूर्ण महाराष्ट्र पावसाने उडवले हाहाकार, शाळा कॉलेज बंध ठेवण्याचे आदेश.
सावधान! रायगड जिल्हा, मुबंई तसेच संपूर्ण महाराष्ट्र पावसाने उडवले हाहाकार, शाळा कॉलेज बंध ठेवण्याचे आदेश. रायगड मत : रायगड जिल्ह्यात प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. प्रचंड वेगाने पडणाऱ्या पावसाची भीती आता जिल्ह्यातील नागरिकांना वाटू लागली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 6 पैकी तब्बल 4 नद्यांच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विशेष म्हणजे पाऊस अजूनही धुवांधारपणे कोसळत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. रायगड जिल्हा माहिती कार्यालयाकडून ट्विटरवर याबाबतची सविस्तर माहिती जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याशिवाय पाऊस असाच पडत राहिला तर उल्हास नदीदेखील इशारा पातळी ओलांडू शकते.