Posts

Showing posts from July 18, 2023

नाईक ऑप्टिकल आणि कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकचे पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन

Image
नाईक ऑप्टिकल आणि कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकचे पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन    पनवेल ( संजय कदम ) : पनवेल जवळील पुष्पक नोड-वडघर, करंजाडे येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या नाईक ऑप्टिकल आणि कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकचे पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले .                  नाईक ऑप्टिकल आणि कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक' चे अंजली मारुती नाईक व हर्षल निखिल नाईक यांनी शॉप नं. २, नामदेव रेसिडेंन्सी, प्लॉट नं. २९९, सेक्टर R3, श्रीस्मरण मेडिकल शेजारी, पुष्पक नोड-वडघर येथे सुरवात केली असून त्याचे भव्य उद्घाटन पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले .यावेळी उपसरपंच सौ. सुनंदाताई हरिभाऊ नाईक, बाळासाहेब नाईक, हरिभाऊ नाईक, संतोष नाईक, रामनाथ नाईक, चेतन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी बोलताना पारगावच्या सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांनी सांगितले की, या क्लिनिकचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार असून त्यामुळे आता नागरिकांना पनवेल किंवा नवी मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची गरज भा

*नवी मुंबई सामाजिक, शैक्षणिक संस्था समन्वय समितीची बैठक खारघर येथे संपन्न*

Image
*नवी मुंबई सामाजिक, शैक्षणिक संस्था समन्वय समितीची बैठक खारघर येथे संपन्न*  पनवेल दि. १७ ( वार्ताहर ) : नवी मुंबई सामाजिक, शैक्षणिक संस्था समन्वय समितीची बैठक शांताबाई रामराव सभ ग्रह, सत्याग्रह महाविद्यालय खारघर, येथे डॉ. जी. के. डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.                           बैठकीला पनवेल - उरण - नवी मुंबई विभागातील कार्य आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक आणि शैक्षणिक, संस्थांचे 51 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. विशेषतः सुभाष गायकवाड, महेश साळुंके, विजय गायकवाड, चंद्रकांत जाधव, अॅड. सुशिल महाडिक, अँड. हर्षल शाक्य, एन. एम. वाघमारे, राज सदावर्ते, पी. एल. गायकवाड, एम. एल. सुर्यवंशी, सुंदर वसावे, गोविंद बनसोडे, जीवन जोशी, अनिल मुळे , किशोर शिंदे-पाटील, बळीराम मोरे, चंद्रसेन कांबळे हे उपस्थित होते. यावेळी नव्या शैक्षणिक धोरणाची भारतीय समाजावर होणारे बरे-वाईट परिणाम आणि विशेषता आंबेडकरी समाजाचे शैक्षगिक भवितव्य याबाबत सांगोपांग चर्चा होऊन सामान्यातील सामान्य माणसाला नव्या शिक्षण धोरणाची जागृती व्हावी यासाठी शिक्षण परिषद् घेण्याच्या हेतूने ही बैठक आयोजित के

मा. नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने विद्युत पुरवठा झाला सुरळीत

Image
मा. नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने विद्युत पुरवठा झाला सुरळीत पनवेल ( संजय कदम ) : पनवेल महानगरपालिकेचे भाजपचे कार्यसम्राट मा. नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने शहरातील सागर हॉटेल जवळ बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे .                   शहरातील मिडल क्लास सोसायटी सागर हॉटेल जवळ एम एस ई बी ची डीपी रस्त्यावर तुटून पडली होती.त्यावेळी तेथून माजी नगरसेवक राजू सोनी जात असताना त्यांना दिसली. त्यांनी तात्काळ महावितरणचे कर्मचारी बोलून पडलेली डीपी उभी करून घेतली.व त्या डीपीला स्वखर्चाने वेल्डिंग मारून दिली.त्या नंतर त्या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला याबद्दल परिसरातील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले आहेत .  फोटो - डीपीचे काम

शालेय विद्यार्थांना देण्यात आली पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमनाची माहिती

Image
शालेय विद्यार्थांना देण्यात आली पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमनाची माहिती पनवेल  ( संजय कदम ) : शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत सध्या दुचाकी व चार चाकी वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे . या विद्यार्थ्यांना संबंधित वाहतुकीचे नियम त्याच प्रमाणे त्याचे कश्या प्रकारे काटेकोरपणे पालन करावे यासाठी आज पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सदर विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती देऊन त्यांचे प्रबोधन केले .                     नवीन पनवेल येथील के. आ. बांठिया विद्यालय येथे विध्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमयाविषयी व वाहतूक नियमाचे पालन करण्याबाबत पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील ,पोलीस उपनिरीक्षक खांडेकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रमास बांठिया विद्यालयाचे प्राचार्य माळी सर व विद्यालयाचे विद्यार्थी हजर होते . यावेळी सदर विद्यार्थ्यांच्या विविध शंका व प्रश्नांचे निराकरण यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले .  फोटो - शालेय विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व इतर मान्यवर

पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी

Image
पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी* पनवेल (वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेमध्ये नोकरभरती सुरु आहे. या मध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.        सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाची कोणत्याही प्रकारची पुर्तता केलेली नाही. सिडको हद्दीतील सर्व गावे पनवेल महानगरपालिकेत सामाविष्ट आहेत. प्रकल्पग्रस्तांची शेती सिडकोने हिसकाऊन घेवून प्रकल्पग्रस्त नागरीकांना सिडकोने वा-यावर सोडलेले आहे. त्यांचे विकासाचे कोणतेही काम आजतगायत केलेले नाही. सिडकोची विकासगंगा नोकरीची हमी आमच्या डोळयांनी आम्ही कधीही बघितलेली नाही. दरम्यान पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त नागरीकांना व स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे व कोविड- १९ मुळे गेलेली २ वर्षाची वयाची अट सुध्दा वाढवून दयावी. तसेच पनवेल