Posts

Showing posts from July 17, 2023

पनवेल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांंची निवड

Image
पनवेल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांंची निवड पनवेेल । पनवेल तालुक्यातील पत्रकारांचे संघटन होवून पत्रकारांच्या विविध प्रश्‍नासाठी आणि लोकहिताच्या निर्णयासाठी पत्रकार एकत्र येवून पनवेल पत्रकार संघ नव्याने स्थापन करून त्या संघाच्या अध्यक्षपदी ज्येेष्ठ पत्रकार आणि दैै.रायगड नगरीचे मुख्य संपादक सुनील पोेतदार यांची एकमताने निवड करण्यात आली. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवार दि.13 जुलै 2023 रोेजी पनवेलमधील पत्रकारांची एक बैठक आयोेजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांच्यावर विश्वास ठेवून पनवेलमधील पत्रकारांनी त्यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली. सुनील पोतदार हे अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व असून ते पत्रकार क्षेत्रात येण्यापूर्वी पुर्वाश्रमीच्या समाजवादी पक्षाचे व त्यानंतर जनता दलाचेे तालुकाध्यक्ष, सचिव तसेेच जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्या काळात त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांसाठी संघटन बांधून शेेतकरी, कामगार आदी क्षेेत्रात भरीव असे काम केले आहे. त्यांच्या काळात त्यांनी जिल्हाभर अनेक ठिकाणी मोर्च

राष्ट्रीय मास्टर क्लासिक आणि एक्विप "पॉवरलिफ्टिग स्पर्धा आंध्र प्रदेश - राजम्म"या ठिकाणी

Image
राष्ट्रीय मास्टर क्लासिक आणि एक्विप "पॉवरलिफ्टिग स्पर्धा आंध्र प्रदेश - राजम्म"या ठिकाणी राष्ट्रीय मास्टर क्लासिक आणि एक्विप "पॉवरलिफ्टिग स्पर्धा आंध्र प्रदेश - राजम्म"या ठिकाणी स्पर्धा दिंनांक "१२/७/२०२३ ते १६/७/२०२३"या कालावधीत संपन्न झाली . या स्पर्धेत," रायगडचे"खेळाडूंनी २सुवर्ण,१ रौप्य, आणि १कांस्य पदक प्राप्त केले आहे. डावीकडून संतोष गावडे(आलिबा,गरौप्य पदक) महेश पाटील(खोपोली २सुवर्णपदक, वलासिक आणि एक्विप स्पर्धा), राजेश अंगद,आणि शेवटी मयुरा आंगद(पेण,कांस्य पदक) .अशा प्रकारे या खेळाडूंनी यश मिळवून रायगड जिल्हाच नाव रोशन केले .त्याबद्दल या सर्व खेळाडूंचे "पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन ,रायगड"चे वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

अक्षय आणि दिनेश यांचा गौरव

Image
अक्षय आणि दिनेश यांचा गौरव. हाँगकाँग येथे क्लासिकआ शियाई - पॅसिफिक बेंचप्रेस आणिपॉवर - लिफ्टीगची पुरुष व महिला यांची स्पर्धा २४/६/२०२३ते३०/६/२०२३या कालावधीत झाली .यामध्ये बेंचप्रेस क्लासिक स्पर्धेचे पदक विजेते रायगडचे खेळाडू दिनेश पवार(मास्टर स्पर्धा,७४किलो वजनी गट सुवर्ण पदक विजेता) आणि अक्षय शनमुगंम(खुला गट ७४किलो वजनी गट,रौप्य पदक विजेता) यांचें आज दिंनाक ११/०७/२०२३रोजी त्यांचे निवास स्थानी जाऊन त्यांचे कामगिरी बाबत गौरव करण्यात आला. या घरगुतीगौरव प्रसंगी"पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड" चे अध्यक्ष गिरीष शरद वेदक,कार्याध्यक्ष यशवंतअंबाजी मोकल, खजिनदार राहुल विजय गजरमल,सदस्य सुभाष टेंबे. आज जिल्हा संघटने चे वतीने गौरव झाला त्याबद्दल दोन्ही खेळाडूंनी समाधान व्यक्त करून संघटनेचे आभार मानले.

नविन पनवेल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहरसमन्वयकपदी शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती

Image
नविन पनवेल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहरसमन्वयकपदी शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती पनवेल ( संजय कदम) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या हस्ते पक्षाच्या नविन पनवेल शहरसमन्वयकपदी शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती पत्र देत नियुक्ती करण्यात आली .                    यावेळी बोलताना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांनी सांगितले की ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते ,संपर्क नेते कोकण विभाग सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून संघटनात्मक कार्य करतांना ,संघटनेच्या हिताची जपणूक करणे ,संघटनेच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे संघटनेला व संघटनेच्या प्रतिष्ठेला आपणामुळे डाग लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे . यावेळी नवीन पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख , उपमहानगर प्रमुख किरण तावदारे , विभाग प्रमुख किरण सोनावणे तसेच सिद्धेश बने उपस्थित होते .    फोटो - शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती

कै. कमळु पाटील यांचा 31 वा स्मृतीदिनानिमित्त तळोजा पंचानंद येथे बस थांबा व शेड चा शुभारंभ

Image
कै. कमळु पाटील यांचा 31 वा स्मृतीदिनानिमित्त तळोजा पंचानंद येथे बस थांबा व शेड चा शुभारंभ  पनवेल ( संजय कदम) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांचे वडिल कै,कमळु पाटील यांचा 31 वा स्मृतीदिनानिमित्त, तालुक्यातील तळोजा पंचानंद येथे बस थांबा व शेड चा शुभारंभ आजच्‍या दिवशी करण्यात आला.                   या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वास्तव्यास आले आहेत त्यांना बस साठी रस्तावर भर उन्हात व पावसाळ्यात उभे रहावे लागत होते ही येथील रहिवासांची गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी येथे थांबा व शेड उभारली आहे . सदर बस थांबा व शेड चे उदघाटन उपजिल्हा प्रमुख रामदासदादा पाटील, शिवसेना पनवेल म.न.पा 3 चे अध्यक्ष मिथुन मढवी , शिवसेना तळोजा शहर समन्वयक अभिमन्यू अर्जुन गोरे, तळोजा युवासेनेचे तेजस पाटील आदींच्या उपस्थितीत करण्यात आले .   फोटो - बस थांबा व शेड चा शुभारंभ

टोयाटो शोरूम मधून राउटर ची चोरी

Image
टोयाटो शोरूम मधून राउटर ची चोरी   पनवेल, ( संजय कदम) : तालुकयातील कोळखे गाव येथील टोयाटो शोरूम मधून राउटर ची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे.              कोळखे गाव येथील टोयाटो शोरूम मधून चाळीस हजार रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाचा जिओ कंपनीचा राउटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.

पैशांच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेगळे करुन खुन करणार्‍या आरोपीला पनवेल शहर पोलीसांबी ठोकल्या बेड्या

Image
पैशांच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेगळे करुन खुन करणार्‍या आरोपीला पनवेल शहर पोलीसांबी ठोकल्या बेड्या पनवेल,  (संजय कदम) ः पनवेल शहरात पैशाच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेेगळे करून त्याचा खुन केल्याप्र्रकरणी एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांंनी अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यास दिनांक 28/06/2023 रोजी पासुन पनवेल येथुन इसम नामे महंमद अस्लम हाश्मद वय 42 वर्षे, राह- आशीयाना अपार्टमेंट, रु.नं. 01, जुने कोर्टजवळ, पनवेल हा मिसींग असलेबाबत मुक्कर्रम कसार रा. नेरुळ यांनी पोलीस ठाणे येथे दिलेल्या खबरीवरुन मोठे मनुष्य मिसींग नं. 68/2023 अन्वये दाखल होती. सदर मिसींगच्या तपासकामी मिलींद भारंबे, मा. पोलीस आयुक्त सो, नवी मुंबई, संजय मोहीते, मा. पोलीस सह आयुक्त सो, नवी मुंबई, पंकज डहाणे मा. पोलीस उपायुक्त सो, परि 02, पनवेल, नवी मुंबई. अशोक राजपुत, सहा. पोलीस आयुक्त सो, पनवेल विभाग, नवी मुंबई, नितीन ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई, अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक, प्रमोद पवार, पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्याकडुन प्राप्त सुचना व मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस

स्थानिक भूमिपुत्रांना विमानतळसेवा प्रशिक्षण देण्यासाठी पनवेल काँग्रेसचा पुढाकार

Image
स्थानिक भूमिपुत्रांना विमानतळसेवा प्रशिक्षण देण्यासाठी पनवेल काँग्रेसचा पुढाकार जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पनवेल काँग्रेस भवन येथे तरुणांना विमानतळ रोजगाराचे प्रशिक्षण पनवेल:  पनवेलमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येऊन पनवेलच्या समृद्धीत कमालीची भर पडणार आहे. या अनुषंगाने येथील स्थानिक भूमिपुत्रांना विमानतळ प्रकल्पात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून आज (शनिवार दि.१५ जुलै) शहरातील काँग्रेस भवन येथे पनवेल काँग्रेसच्यावतीने युवकांसाठी विमानतळसेवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पनवेलमधील व परिसरातील असंख्य तरुणांचा प्रतिसाद लाभला.               काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी आर पाटील यांच्या संकल्पनेतून,पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या पुढाकाराने व बोल्ड विंग प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये एअरहॉस्टेस व विमानतळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तंत्रज्ञान व कौशल्य विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश यादव, पनवेल काँग्रेस जिल्हाध्य

गाढेश्वर धरणात वाहून जाणाऱ्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलिस ठरले देवदूत

Image
https://youtu.be/T75z3_uCmL0 पनवेल पोलीस ठरले देवदूत वाचवले प्राण गाढेश्वर धरणात वाहून जाणाऱ्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलिस ठरले देवदूत पनवेल  (वार्ताहर) : गाढेश्वर धरणाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या व पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चाललेल्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलीस देवदूत ठरले असून पनवेल तालुका पोलिसांनी प्रसंगावधान राखत मृत्यूच्या दाढेतून या दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे.             पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरणाच्या परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात मजा लुटण्यासाठी पर्यटकांच्या झुंडी शनिवार व रविवारी येत असतात. अतिउत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात. त्यामुळे गाढेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, तरीदेखील काही उत्साही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून धरणाकडे जातात. पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीतील नेरे बीटमध्ये पोलिस गस्त घालत असताना गाढेश्वर नदीपात्रात सोहेल खावजौद्दिन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे हे दोघेजण पाण्याच्या जोरदार प्रवाहातवाहत जाऊन पाण्यात अडकल्याच

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण "प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते उपक्रमाची सुरुवात"

Image
 सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण "प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते उपक्रमाची सुरुवात" सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक  संघातर्फे वृक्षारोपण रविवार दिनांक १६.०७.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता नवनाथ मंदिरा समोरील रस्ता, पनवेल रेल्वे स्टेशन(पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी फक्त वृक्षारोपण न करता त्याची देखभाल संस्थेमार्फत केली जाणार आहे जेणेकरून निसर्गाचे संवर्धन करण्याच्या कार्यात संस्थेचा सुद्धा हातभार असेल. मा.विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून उपक्रमास सुरूवात करण्यात आली.पनवेल रेल्वे स्टेशन ते पनवेल एस टी स्टॅन्ड पर्यंतच्या रस्ता दुभाजकावर कादंब, कन्हेरे,कांचन, कडुलिंब, बदाम व इतर देशी पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न झाला . मंडळाचे कार्यकारणी सदस्य, कार्यकर्ते, तसेच पर्यवरणप्रेमी हितचिंतक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन १०० वृक्षांची लागवड केली, सदर वृक्षांची देखभाल सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ करणार आहे, मंडळाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष श्री संतोष चव्हाण, उपाध्यक्ष सौ प्रिया खोब