Posts

Showing posts from July 15, 2023

निसर्गरम्य वातावरणात खरसई मराठी शाळेची वर्षासहल*

Image
निसर्गरम्य वातावरणात खरसई मराठी शाळेची वर्षासहल* म्हसळा - १४ जुलै २०२३ रोजी  म्हसळा तालुक्याच्या निसर्ग रम्य कुशीत वसलेल्या खरसई गावालगत केळाच्या परिसरात आय.एस. सो मानांकित रा जि प आदर्श शाळा खरसई मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्षा सहलीच्या माध्यमातून निसर्ग नदीचा आनंद घेतला.     खरसई शाळेतील १०० % बालके या सहशालेय उपक्रमात सहभागी झाले या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांनी परिसरातील नदी, नाले, झाडे , झुडपे , वेळी , फुलझाडे यांची माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक शेबांळे सर यांनी दिली. नदिलगत ओढ्यामध्ये पाण्याचा अंदाज घेऊन पोहण्याचे कौशल्य बेटकर सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पाण्याचे महत्त्व, झरयाचा उगम, ओहळ, नदी, खाडी, उपनदी, मुख्यनदी , समुद्र,   नदीचा संगम, याबाबत बेटकर सर यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. मुख्याध्यापिका शारदा कोळसे मॅडम सुनियोजित नियोजन केले आणि महत्वपूर्ण सहकार्य सहकारी शिक्षक राम थोरात सर आणि शिक्षण प्रेमी अजय पयेर यांनी केले. सर्वांनी सहलीचा चांगला आनंद घेतला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सहभागी होते.

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाहिले चंद्र मोहिमेचे प्रक्षेपण

Image
  भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाहिले चंद्र मोहिमेचे प्रक्षेपण  पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉॅलनी येथील भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी चांद्रयान-३ (चंद्र मोहिम) चे थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला.  खगोलशास्त्र प्रेमी विद्यार्थी भारताच्या या चंद्र मोहिमेचे साक्षीदार झाले, त्यामुळे त्यांच्यात वैज्ञानिक जिज्ञासा वाढली.   चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षामार्फत सहाय्यक प्राध्यापक हिमांशू मोरे यांनी प्रभारी प्राचार्या धनश्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थी व प्राध्यापक आणि खगोलशास्त्र प्रेमींना अंतराळ संशोधनाच्या विस्मयकारक जगात प्रबोधन करणे हा होता. या चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपणातून, महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना चांद्रयान-3 चे प्रक्षेपण आणि त्यानंतरच्या प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली,अंतराळ संशोधन आणि वैज्ञानिक प्रगतीमध्ये त्याचे महत्त्व याविषयी सखो