Posts

Showing posts from July 14, 2023

नोकरीत पण असच असत जे जुने असतात त्यांचा 1000रु. पगार वाढतो आणी जे नवे बाहेरून येतात त्यांना पॅकेज मिळतो, 5 लाख 10 लाख. आलं का ध्यानात प्रामाणिक मतदारानो 😅 तुम्हीबी पक्ष बदला आता... लयी झाला त्योच त्योच... 🤣

Image
असेच असतं मित्रानो जो प्रामाणिक पणे काम करतो त्याला घं......आणि बाहेरून येतात त्यांना बढती नोकरीत पण असच असत जे जुने असतात त्यांचा 1000रु. पगार वाढतो आणी जे नवे बाहेरून येतात त्यांना पॅकेज मिळतो, 5 लाख 10 लाख. आलं का ध्यानात प्रामाणिक मतदारानो 😅 तुम्हीबी पक्ष बदला आता... लयी झाला त्योच त्योच... 🤣 कोणाला कोणतं खातं? अर्थ व नियोजन- अजित पवार सहकार- दिलीप वळसे पाटील कृषी- धनंजय मुंडे अन्न व नागरी- छगन भुजबळ महिला व बालविकास- आदिती तटकरे क्रीडा- संजय बनसोडे मदत व पुनर्वसन- अनिल पाटील अन्न व औषध प्रशासन- धर्मरावबाबा अत्राम वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ कुणाची खाती काढून कुठली खाती दिली? अब्दुल सत्तार - कृषी खाते काढून- अल्पसंख्याक विकास संजय राठोड- अन्न आणि औषध प्रशासन काढून मृदा आणि जलसंधारण अतुल सावे- सहकार खाते काढून - ओबीसी कल्याण अर्थ खाते दादांकडे!

करंजाडेत बेकायदेशीर अतिक्रमणावर सिडकोची कारवाई*

Image
करंजाडेत बेकायदेशीर अतिक्रमणावर सिडकोची कारवाई  पनवेल दि.१४ (संजय कदम ) : करंजाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमणात वाढ झाली होती. यासंदर्भात विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षाने सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्री भवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तोडक कारवाई करण्यात आली.           करंजाडे परिसरातील कॉलेज फाटा रोड, सेक्टर २, ३ आणि ४ या भागातील बेकायदेशीर अतिक्रमणे त्यामध्ये प्रामुख्याने झोपड्या, टपऱ्या, फळ व भाजीविक्रेते, कोंबडी व मटण विक्रेते आदींसह बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. यासाठी सिडको अतिक्रमण विभागातर्फे १ जेसीबी, २ डंपर, ३० पोलीस अधिकारी व कर्मचारी, २५ सिडकोचे अधिकारी व कर्मचारी आदींच्या सहाय्याने हि कारवाई पार पडली. या कारवाईचे करंजाडेमधील नागरिकांनी स्वागत केले असून अश्याचप्रकारे सातत्याने कारवाई करावी अशी मागणी सिडकोकडे केली आहे.  फोटो : करंजाडेत बेकायदेशीर अतिक्रमणावर सिडकोची कारवाई

वडगांव येथे एचपीसीएल कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता पंधरवडा अंतर्गत साहित्याचे वाटप

Image
वडगांव येथे एचपीसीएल कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता पंधरवडा अंतर्गत साहित्याचे वाटप*  पनवेल (संजय कदम) : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वडगांव येथे मे. एच.पी.सी.एल लि या कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता पखवाडा (स्वच्छता पंधरवडा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांतर्गत मे. एच.पी.सी.एल लि या कंपनीने ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबुट, हॅन्ड ग्लोव्हज् नोज मास्क इत्यादी साहित्य वाटप करणेत आले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीस २ मोठया डस्टबिनचे वाटप करण्यात आले.                सदर स्वच्छता पखवाडा कार्यक्रमाप्रसंगी कंपनीचे मॅनेजर श्री रोहित, हेमंत कुमार, प्रशांत सावंत, प्रविण लबडे तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ. गौरी गडगे, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, ग्रा.पं. सदस्य महादेव गडगे, राजेश पाटील, ग्रा.पं. इंजिनियर विजय चौधरी, आरोग्य कर्मचारी महेश तांबडे, गजानन बडदाडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील, संदीप शिंदे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एचपीसीएल हेमंत कुमार यांनी ग्रुप ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता विषयी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच गौरी गडगे यांनी म

पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची भेट

Image
पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची भेट पनवेल  (संजय कदम) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज पटेल व त्यांच्या युवक शिष्टमंडळाने वाय बी सेंटर मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी पनवेल विभागातील असणाऱ्या समस्याचे निवेदन शरदचंद्र पवार यांना दिले.                   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज पटेल व त्यांच्या युवक शिष्टमंडळाने वाय बी सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबई येथे हज हाऊस काम संथ गतीने सुरु आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करावा असे निवेदन शरद पवार यांना दिला. तसेच तळोजा, व्हाया पनवेल ते सी एस टी लोकल सुरु करण्यासाठीही प्रयत्न करावे अशी विनंती केली. यावेळी शरद पवार यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक सचिव चाँद मौला शेख, समशीर शेख, श्रेयश भावसर, अमीर खान, सलमान शेख, पराग लांडगे उपस्थित होते. फोटो : शरद पवार

सुरक्षा साक्षरता असणारा कामगार वर्ग निर्माण करण्यासाठी ए एन एस यू चा पुढाकार

Image
सुरक्षा साक्षरता असणारा कामगार वर्ग निर्माण करण्यासाठी ए एन एस यू चा पुढाकार पनवेल येथे सुरू केले प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केंद्र  पनवेल : ए एन एस यू च्या ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी इन्स्टिट्युट चे रविवार दिनांक ९ जुलै रोजी पनवेल येथे उद्घाटन संपन्न झाले. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील डेरवली येथील या इन्स्टिट्यूट मध्ये नैसर्गिक वायू आणि कच्चे खनिज तेल काढणाऱ्या केंद्रांवर अत्यावश्यक असणारा सुरक्षा साक्षर कामगार वर्ग निर्माण केला जाणार आहे. या क्षेत्रातील अनुभव संपन्न आणि दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या फॅकल्टीमुळे या इन्स्टिट्यूटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.          इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल निर्माण केंद्र (ऑईल रीग) यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ठिकाणी लागणारा कामगार वर्ग हा नुसताच कुशल असून चालत नाही तर अत्यंत संवेदनशील,ज्वलनशील आणि अपघात प्रवण क्षेत्र असल्यामुळे येथील कामगार वर्ग हा सुरक्षा साक्षर असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. पनवेल तालुका आणि उरण तालुका या ठिकाणी असणारे केंद्र सरकारचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प यामुळे नै

विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखणे ही महत्त्वाचे"

Image
  "विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखणे ही महत्त्वाचे" पनवेल : आज केंद्र शासनाच्या "आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वृक्षारोपण" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी NHAI चे अधिकारी श्री.अंशुमली श्रीवास्तव, श्री वाठोरे सर, श्री.डॉ.सुरेश कुमार, श्री.घोटकर सर, श्री भरत कुमार, पनवेलचे मा.आदर्श नगराध्यक्ष श्री.जे. एम. म्हात्रे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.     यावेळी बोलताना श्रीवास्तव यांनी सांगितले की, श्री.नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते विकासाची कामे करताना जेवढी वृक्षतोड केली जाते त्याच्या दुपटीने वृक्ष लागवड करून सदर रस्त्याचा प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांचे संगोपन करून निसर्गाचा समतोल राखावा हे उद्दिष्ट नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ने समोर ठेवले आहे.     यावेळी बोलताना श्री.अंशुमली श्रीवास्तव यांनी सांगितले की जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आतापर्यंत केलेल्या रस्त्याच्या कामाची गती पाहता दिलेल्या वेळेत गुणवत्ता राखून हे काम जलद गतीने पूर्ण होईल आणि कोकणवासीयांना लवकरच चांगला रस्ता प्रवासादरम्यान अनुभवास