Posts

Showing posts from July 12, 2023

रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना आणि शिवसेनेकडील खाती अजित पवार यांच्या गटाला दिली जाऊ नये... - भरत गोगावले

Image
पण तिढा सूटेना, पालक /मंत्रिपद मिळेना  रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना आणि शिवसेनेकडील खाती अजित पवार यांच्या गटाला दिली जाऊ नये... - भरत गोगावले   # दादा गेले दिल्लीला.... पाया पडायला..... # दिल्ली पुढे झूकू नये पण झुकले... मराठी बाणा आता..... रायगड मत / ब्रेकिंग News  मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने बैठकांवर बैठका सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत या बैठका पार पडत आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. तसेच रायगडचं पालकमंत्रीपद आणि शिवसेनेकडील खाती अजित पवार यांच्या गटाला दिली जाऊ नये, या शिवसेनेच्या भूमिकेवरुन हा तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. त्यांना मंत्रीपद तर हवंच, त्यासोबत रायगडचं पालकमंत्रीपद हवं आहे. मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अनेक आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. त्यामुळे आता भाजपचं दिल्लीतील हायकमांड यावर काय तोडला काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठर

पनवेल भिंगारी येथे भरधाव एसटीच्या धडकेने महिलेचा मृत्यू, अंगावर काटा उभा राहील. असा अपघात St ड्राइव्हर ची chuk

Image
https://youtube.com/shorts/3uXdAUam7_4?feature=share भरधाव एसटीच्या धडकेने महिलेचा मृत्यू पनवेल (वार्ताहर) : पनवेल जवळील भिंगारी येथील ब्रिजवर एसटीने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. एसटी महामंडळाची बस खेडहून मुंबई येथे जात होती. दुपारी १२ च्या सुमारास एसटी भिंगारी येथील ब्रिज वरून पनवेलच्या दिशेने जात होती. त्यावेळी एक महिला ब्रिजवरून रस्ता ओलांडत असताना या बसची तिला धडक बसली. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच पनवेल वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीतच आढावा घेत एसटी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. https://youtube.com/shorts/3uXdAUam7_4?feature=share Subscribe करा.

मुंबई येथील प्रदेश कार्यलयात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ईद्रीस मुल्तानी यांची निवड.याप्रसंगी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना सय्यद अकबर.

Image
मुंबई येथील प्रदेश कार्यलयात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ईद्रीस मुल्तानी यांची निवड.याप्रसंगी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना सय्यद अकबर.

तळोजामधील अग्रगण्‍य उद्योग संस्‍था अजूनही जलसंकटाचा सामना करत आहेत, त्‍यांना स्थितीमध्‍ये सुधारणा होण्‍याची आशा

Image
तळोजामधील अग्रगण्‍य उद्योग संस्‍था अजूनही जलसंकटाचा सामना करत आहेत, त्‍यांना स्थितीमध्‍ये सुधारणा होण्‍याची आशा   पनवेल, वार्ताहर :  गेल्‍या काही वर्षांमध्‍ये मुंबईच्‍या जवळ असलेल्‍या तळोजामधील औद्योगिक क्षेत्राला सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विस्तीर्ण ९०० हेक्टर (900 hectares) जमिनीवर पसरलेल्या तळोजा एमआयडीसीमध्ये ९५० हून अधिक उद्योग युनिट्स (950 industry units in operation) कार्यरत आहेत, त्यापैकी बहुतांश रसायने, खते व अन्न प्रक्रिया युनिट्स आहेत. नवी मुंबई आणि मुंबई उपनगर भागाच्‍या जवळ असलेले तळोजा औद्योगिक क्षेत्र कुशल व अकुशल मनुष्‍यबळाचे केंद्र देखील आहे, ज्याचा उद्योगांसाठी वापर केला जाऊ शकतो. यासंदर्भात काही माहिती पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०२२ मध्ये, तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीएमए) अंतर्गत येणाऱ्या अनेक उद्योगांनी त्यांच्या औद्योगिक कामकाजासाठी पाण्याच्या कमतरतेबद्दल तक्रार केली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागले.  उद्योगांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) मासिक पाणी शुल्क भरूनही हे स

भाजप प्रदेश महासचिव तथा पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा

Image
भाजप प्रदेश महासचिव तथा पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा पनवेल  (संजय कदम) : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजूंना धान्यवाटप, जेष्ठ नागरिकांना आधार छडीचे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप, आदिवासी वस्तीगृहाला डस्टबिन व आवश्यक वस्तूंचे वाटप, गतिमंद मुलांच्या आश्रमाला डस्टबिन व इतर स्वच्छता साहित्याचे वाटप, अनेक मंदिरांना डस्टबिन वाटप, रुग्णांना फळांचे वाटप, अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम तसेच युवांसाठी फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच प्रमाणे अनेक मान्यवरांनी त्यांच्या पनवेल येथील जनसेवा कार्यालयात भेट देऊन त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेछया दिल्या. तर अनेकांनी त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे नोटबुक शुभेच्छा म्हणून भेट दिली. दरम्यान वाढदिवसानिमित्त त्यांनी पनवेल शहर परिसरातील शिव मंदिर आण

वाढते प्रदूषण

Image
वाढते प्रदूषण*  लेखक- श्री. अण्णासाहेब संदिपान बिचुकले रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव बुद्रुक, तालुका- मसळा, जिल्हा- रायगड  देशाच्या भवितव्याचा दुर्गामी विचार केला तर वाढते प्रदूषण ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. वायु प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण या तिन्ही प्रदूषणामुळे आपले संपूर्ण वातावरण दूषित झाले आहे. श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा मिळेना, पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेना तर कानावर येणारा कर्कश्य आवाजामुळे कानाच्या संबंधित गंभीर समस्या उद्भवत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ-मोठे उद्योगधंदे उभारले जात आहेत. जंगले तोडून त्या ठिकाणी इमारती कारखाने उभारले जात आहेत परंतु याचा परिणाम प्रदूषणामध्ये दिसून येत आहेत. प्रदूषणामुळे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नसल्याने अनेक रोगाला आमंत्रण मिळत आहे. आजच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या शहरांचा आणि महानगर यांचा विस्तार खूप झपाट्याने होत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वापरली जाणारी वाहने मोटरसायकल, बसेस, रिक्षा यामुळे वायू प्रदूषणाचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. विकसित झालेल्या शहर आणि महानगरांमध्ये औद्योगीकरणासाठी झपाट आणि वाढ झालेली आहे

मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे दुष्परिणाम लेखक - श्री. अण्णासाहेब संदिपान बिचुकले

Image
मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे दुष्परिणाम लेखक - श्री. अण्णासाहेब संदिपान बिचुकले रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव बुद्रुक, तालुका- म्हसळा, जिल्हा- रायगड विसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या ज्या अनेक क्षेत्रात विकास झाला त्यात संपर्क क्षेत्राचा प्रामुख्याने समावेश होतो. रेडिओ, टेलिव्हिजन बरोबरच मोबाईल आणि इंटरनेटच्या आगमनाने या क्षेत्रात क्रांती झाली. माहितीची देवाण-घेवाण आणि उपलब्धता प्रचंड प्रमाणात वाढली. विशेषता इंटरनेटमुळे माहितीच्या निर्मिती आणि वितरणात वैयक्तिक सहभाग वाढला. यातूनच सामाजिक प्रसारमाध्यमांची *सोशल मीडिया* कल्पना साकार झाली. सुरुवातीच्या काळात इंटरनेट फक्त संगणक आणि लॅपटॉपशी संलग्न होते. त्यानंतर काळात ते मोबाईल मध्ये उपलब्ध झाले. जसे उपलब्ध झाले तसे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत काही तरुण तासंतास मोबाईल मध्ये घुसलेली आपल्याला पाहायला मिळतात. मोबाईल हे एक संवादाचे माध्यम म्हणून उत्तम आहे. परंतु मोबाईल अतिवापरणं किती धोकादायक आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे. सध्याच्या काळात मुलांना लहानापासून एक वेगळी सवय लागल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यांच्या हातात मोबाईल असल्याशिवाय त

म्हसळा महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने पाँवर पाँइट प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन

Image
म्हसळा महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने पाँवर पाँइट प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन म्हसळा : रायगड मत म्हसळा येथील वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणक्रम पुर्ण करताना जागतिक स्तरावरील गंभीर स्वरूप धारण करणा-या समस्याची जाणीव व्हावी तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात दृकश्राव्य तंत्रज्ञानाच्या साह्याने सादरीकरण कौशल्य आत्मसात करता यावे या उद्देशाने अर्थशास्त्र विभागातर्फे आणि मा.श्री. मुश्ताक साहेब अंतुले, मा.श्री.अशोक तळवटकर साहेब मा.श्री. फजलसाहेब हळदे,मा.श्री.महादेव पाटील साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर टेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात " पाँवर पाँइट प्रेझेंटेशन स्पर्धा "आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील १८विद्यार्थी विद्यार्थीनीनी सहभाग घेतला आणि जागतिक लोकसंख्येचे गंभीर स्वरूप दर्शवणा-या पोस्टरच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीचे चांगले आणि वाईट परिणाम स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला स्पर्धेमध्ये कु.साक्षी आंजार्लेकर , कु.मेदांडकर ,कु.आयेशा साईबोले

नाशिकमध्येही भीषण बस अपघात

Image
  नाशिकमध्येही भीषण बस अपघात नाशिक : समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही भीषण बस अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी बसमधून प्रवास करणारे अंदाजे ३५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर १८ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे

नवघर गावातील पहिला वकील होण्याचा मान कु.चेतन भोईर यांना प्राप्त.

Image
  नवघर गावातील पहिला वकील होण्याचा मान कु.चेतन भोईर यांना प्राप्त. उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्याचे भाग्यविधते तथा शिक्षण महर्षी वीर तू.ह.वाजेकरशेठ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरण मधील नवघर गावाचे सुपुत्र कु.चेतन मनोहर भोईर यांनी एलएलबी ची परीक्षा चांगल्या गुणांनी पास करून नवघर गावामधून वकील होण्याचा पहिला मान मिळविला असल्याने कु.चेतन भोईर यांच्यावर नवघर ग्रामस्थांसह त्यांचे नातेबाईक.हितचिंतक आणि मित्र परीवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.      अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कु.चेतन हे मनमिळाऊ स्वभावाचे असून आपले आजोबा धनजी भोईर आणि वडील मनोहर भोईर यांच्या समाज सेवेच्या कार्याचा वसा त्यानी पुढे चालू ठेवला असून त्यांच्या प्रेरणेमधून त्यांनी स्वतःवकील होण्याचा निर्णय घेतला.कु.चेतन हे चांगले कवी व गीतकार व नृत्यविशारद आहेत त्यांनी लिहिलेल्या गीतांवर आधारित त्यांचे अनेक अलबंब प्रसिद्ध झाले आहेत.तर अनेक काव्य संमेलनात त्यांनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.       कु.चेतन यांनी आपले प्राथमिक शिक्षण जेएनपीटी विद्यालयातून पूर्ण केले तर उच्च माध्यमि