Posts

Showing posts from July 11, 2023

रायगड मत Web News

Image
 https://www.raigadmat.page/2023/07/blog-post_95.html उरणची रेल्वेसेवा सुरु होणार मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे काय ? ------- https://www.raigadmat.page/2023/07/blog-post_38.html चरई गौळवाडी आदिवासी वाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप* ---------- https://www.raigadmat.page/2023/07/blog-post_44.html ------ https://www.raigadmat.page/2023/07/blog-post_83.html कर्तव्य काळ' निमित्ताने वृक्षारोपण मोहिम; प्रधान सचिवांची लाभली प्रमुख उपस्थिती ------https://www.raigadmat.page/2023/07/blog-post_11.html कामगार नेते महेंद्रजी घरत यांची जादुयी मध्यस्थी! नऊ महिने बंद असलेली कंपनी सुरु करण्यात यश!------- https://www.raigadmat.page/2023/07/blog-post_29.html दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव राज्याने त्वरित केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा- कृती समितीची मागणी  ९ ऑगस्टला विमानतळाच्या जागेवर लावणार नामफलक -----

उरणची रेल्वेसेवा सुरु होणार मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे काय ? प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे सिडको व रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष. शांततेच्या व लोकशाही मार्गाचा अवलंब करून सुद्धा न्याय मिळत नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा.

Image
  उरणची रेल्वेसेवा सुरु होणार मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे काय ?  प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे सिडको व रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष. शांततेच्या व लोकशाही मार्गाचा अवलंब करून सुद्धा न्याय मिळत नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा. उरण : (विठ्ठल ममताबादे )उरण ते नेरुळ, उरण सी-वूड्स ते सीएसएमटी(मुंबई )रेल्वे सेवा १५ जुलै पासून सुरु होणार अशी चर्चा सर्वत्र रंगली असतानाच मात्र स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मात्र उपेक्षितच ठेवण्यात आल्याचे वास्तव समोर येत आहे. उरण तालुक्यातील कोटनाका काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमीनी उरणच्या रेल्वे स्टेशन करीता (रेल्वे प्रकल्पाकरीता) महसूल विभाग(प्रांत कार्यालय पनवेल,प्रशासन) मार्फत संपादित करण्यात आली. मात्र त्या जमिनी बदल्यात शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. उरणच्या स्थानिक भूमीपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून त्यांच्या मागण्या मान्य न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे सुरू होणार आहे. त्यामुळे उरणचा विकास हा स्थानिक भूमीपुत्रांच्या जीवावर उठला असून स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्

चरई गौळवाडी आदिवासी वाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*

Image
* चरई गौळवाडी आदिवासी वाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*  तळा (जयसिंग बेटकर)- दि.९ जुलै  २०२३ रोजी रा.जि.प.शाळा चरई गौ.आदिवासी वाडी येथे शैक्षणिक  साहित्याचे वाटप करण्यात आले.साहित्या साठी दाते म्हणून मुबंई येथील‌ किशोर भाई शहा , हंसाबेन अरविंद भाई पटेल नम्रता बेन गाला यांचे विद्यार्थी पालक सर्व ग्रामस्थ मंडळ यांचे कडून हार्दिक स्वागत करण्यात आले व प्रमुख पाहुणे मा.कृष्णाजी महाडीक साहेब अतुल भाई शहा सर  किरण सर सानिका पराडकर  मॅडम  श्रेया नवघरे मॅडम लाड सर लाड मॅडम उपस्थित होते सौ.श्रेया यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री. महाडीक सर यांनी शाळेच्या बांधकाम करून देणारे दात्याच्या संदर्भात माहिती देऊन मुलांना दहावी पर्यंत तरी कंपल्सरी शिकलच पाहिजे असे अवाहन विद्यार्थ्यांना व पालकांना केले. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या,  कंपास, स्केचपेण. चित्रकला वहि , बॅग वाटप केले. भाऊसाहेब पवार सर , योगेश गायके सर अध्यक्ष गणपत कोळी शा.व्य. स. अध्यक्ष संजय हिलम व सर्व च उपस्थितीचे श्रीम. कल्याणी वाजे मॅडम यांनी आभार  यावेळी शाळा समिती चे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ व पालक आवर्ज

नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांची कामगार नेते महेंद्र घरत यांनी घेतली भेट.

Image
  नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांची कामगार नेते महेंद्र घरत यांनी घेतली भेट. उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )कार्यतत्पर पोलीस अधिकारी सतीश निकम यांची उरण पोलीस ठाणे येथे नवीन नियुक्ती झाले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांची नव्यानेच नियुक्ती झाल्या बद्दल काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जिल्हाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलींद पाडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील,उरण तालुका महिला अध्यक्षा रेखा घरत, महाराष्ट्र इंटक युवक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित  होते.

कर्तव्य काळ' निमित्ताने वृक्षारोपण मोहिम; प्रधान सचिवांची लाभली प्रमुख उपस्थिती

Image
    ' कर्तव्य काळ '  निमित्ताने वृक्षारोपण मोहिम; प्रधान सचिवांची लाभली प्रमुख उपस्थिती     पनवेल(प्रतिनिधी)  भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने हरित व पर्यावरणपूरक भविष्य निर्मितीसाठी योगदान देण्याचे प्रयत्न सुरु ठेवत ,  आपल्या वालवन धरणाच्या परिसरात महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वृक्षारोपण मोहिमेची सुविधा उपलब्ध करून दिली. महाराष्ट्र शासनाचे वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी ,  पीसीसीएफ आणि वन दलाचे प्रमुख वायएलपी राव यांच्या नेतृत्वाखाली ,  टाटा पॉवरचे हायड्रोजचे चीफ प्रभाकर काळे ,  डब्ल्यूआरईएलचे सीईओ ए जी पाटील आणि इतर वरिष्ठांच्या उपस्थितीत  ' टाटा अमृतवन ' मध्ये ४०० पेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली.    निसर्ग संवर्धनाप्रती आपल्या जबाबदारीचे पालन करत टाटा पॉवरने स्वातंत्र्याच्या पुढील २५ वर्षांमध्ये आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या भारताच्या धोरणाला अनुसरून ,  कर्तव्य काळच्या निमित्ताने या उपक्रमात सहयोग प्रदान केला आहे.  गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून टाटा पॉवरने वालवनमध्ये एक व्याप

दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव राज्याने त्वरित केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा- कृती समितीची मागणी ९ ऑगस्टला विमानतळाच्या जागेवर लावणार नामफलक

Image
दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव राज्याने त्वरित केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा- कृती समितीची मागणी  ९ ऑगस्टला विमानतळाच्या जागेवर लावणार नामफलक       पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे,त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून  मंजूर करुन घ्यावा, अशी एकमुखी मागणी येथे झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सभेत करण्यात आली.      लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीच्या मुंबई ,नवी मुंबई,रायगड,ठाणे,पालघर,नाशिक आदी जिल्ह्यांतील कार्यकत्योंची सभा शनिवारी दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल,उरण आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली त्यावेळी सभेतील सर्व वक्त्यांनी ही मागणी केली.         दि.बा.पाटील यांचे नाव या विमानतळाला द्यावे,असा ठराव राज्य सरकारने विधिमंंडळाच्या दोन्ही सभागृहात करुन आज वर्षभराचा काळ उलटून गेला आहे.  राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर क

कामगार नेते महेंद्रजी घरत यांची जादुयी मध्यस्थी! नऊ महिने बंद असलेली कंपनी सुरु करण्यात यश!

Image
  कामगार नेते महेंद्रजी घरत यांची जादुयी मध्यस्थी! नऊ महिने बंद असलेली कंपनी सुरु करण्यात यश! उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )इसांबे ता. खालापूर येथील मे. डि. एस.व्ही. केमिकल्स हि कंपनी मागील नऊ महिन्यांपासून बंद होती. बळवंतराव पवार यांची कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात पगारवाढीची चर्चा असफल झाल्यामुळे कामगारांनी कामबंद केले होते. नऊ महिने कंपनी बंद असल्यामुळे पगार नाही, कामगारांना उत्पन्न नाही त्यामुळे कामगार अस्वस्थ झाले व कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची भेट घेऊन आपण कंपनी सुरु करण्यासाठी आम्हांस सहकार्य करावे अशी विनंती केली. कामगारांना न्याय देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे  कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कामगार क्षेत्रातील अनुभवाने, कंपनी व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी करून बंद कंपनीतील कामगारांना ७००० रुपये पगारवाढ करण्याचा करार दि. १० जुलै २०२३ रोजी केला व १२ जुलै पासून हि कंपनी पूर्ववत सुरु होत आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या जादुई मध्यस्थीने ५२ कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागला यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन कामगारांनी कामगार नेते