शेतकऱ्यांना डबलची मदत
शेतकऱ्यांना डबलची मदत पनवेल(प्रतिनिधी) गोदरेज अग्रो व्हेट लिमिटेडच्या (जीएव्हीएल ) क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसने भारतीय शेतकर्यांना अधिक चांगले उत्पादन काढण्यासाठी सक्षम करणाऱ्या डबल या आपल्या बायोस्टिम्युलंटला २५ वर्षे पूर्ण झाल्याची आज घोषणा केली. डबलने गेल्या २५ वर्षात २ कोटी शेतकरी कुटुंबांचे जीवन समृद्ध करत ३ कोटी एकर भारतीय शेतजमिनीवर याचा वापर केला आहे.कंपनीने डबलच्या २५ वर्षांचे स्मरण करणारा आणि शेतकऱ्यांना बनावट उत्पादनांपासून संरक्षण देण्यासोबतच अधिक चांगल्या शेतीसाठीची बांधिलकी जपणारा सेलिब्रेटरी पॅक देखील सादर केला. डबल हे एक बायोस्टिम्युलंट , कापूस , सोयाबी न , भुईमूग आणि भाजीपाला (टोमॅटो) पिकांमध्ये फुलं आणि फळांची गळती कमी करते. फुलं आणि फळे गळून पडणे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर १५ ते २५ टक्के परिणाम होतो . डबलच्या योग्य डोससह बरोबर शेती पद्धतीशेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यात मदत करू शकते. डबलचा नवीन पॅक वापरकर्त्याना वापरायला सुलभ आणि सुरक्षित पॅकेजिंग बाटलीमध्ये आहे. बनावट भेसळ टाळण्यासाठी लेबलमध्ये जटिल वॉटरमार्क आहेतआणि अस्सलतेची खात्री करण्