Posts

Showing posts from July 4, 2023

विकासकामांना चालना देण्याचे नेतृत्व म्हणजे खा. सुनील तटकरे -उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे तळेगाव,बहुलेवाडी, शेणवली बौद्धवाडी ग्रामस्थाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Image
विकासकामांना चालना देण्याचे नेतृत्व म्हणजे खा. सुनील तटकरे -उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे तळेगाव,बहुलेवाडी, शेणवली बौद्धवाडी ग्रामस्थाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश   तळा संजय रिकामे  राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुक्याच्या वतीने जाहीर पक्ष प्रवेश आणि मेळाव्याचे आयोजन दि.2.7.23 रोजी तळा येथे करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये बहुलेवाडी, तळेगाव, शेणवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला या सर्व ग्रामस्थाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाल घालून स्वागत करण्यात आले.यावेळी विकासकामांना चालना देण्याचे नेतृत्व म्हणजे खा. सुनील तटकरे असून त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आज ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुका अध्यक्ष नाना भौड, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे महिला अध्यक्षा जानव्ही शिंदे,माजी सभापती हिराचंद तांबे माजी राजीप सदस्य बबन चाचले, माजी सभापती अक्षरा कदम, उपसभापती गणेश वाघमारे, नथुराम अडखळे ऍड उत्तम जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

स्वार्थी राजकारणापेक्षा जनतेची सेवा करुन सामाजिक बांधिलकी जपणे कधीही चांगले-रवींद्रशेठ नटे

Image
स्वार्थी राजकारणापेक्षा जनतेची सेवा करुन सामाजिक बांधिलकी जपणे कधीही चांगले-रवींद्रशेठ नटे माजी सभापती रवींद्रशेठ नटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  तळा संजय रिकामे तळा पंचायत समितीचे माजी सभापती श्री.रविंद्रशेठ नटे यांचा वाढदिवस ज्ञानदीप विद्यामंदिर उसरखुर्द शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करुन व वृद्धाश्रमात झाडे लागवड करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रवींद्रशेठ नटे यांच्या 50 व्या वाढदिवस निमित्ताने हॉटेल बगीचा इंदापूर येथे ऑर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले होते या मध्ये सुमधुर गाणी आणि लावणी सादर करण्यात आले आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती यावेेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रा.जि.प.माजी सभापती हिराचंद तांबे, तळा नगरपंचायत उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रदुमन ठसाळ, भाजपा तालुका अध्यक्ष ऍड.निलेश रातवडकर,शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके, जिल्हा कोअर कमेटी सदस्य लीलाधर खातू,धनराज गायकवाड, पाणी कंपनीचे मालक पांडुरंग महाडिक, पत्रकार संजय रिकामे,सरपंच शरद सारगे,उपसरपंच दिनेश गायकर, राजेश गायकर, नथुराम चोरगे, मनीष वाजे,

सामाजिक सलोख्यासाठी रक्तदान शिबिर हा स्तुत्य उपक्रम- प्रीतम म्हात्रे

Image
सामाजिक सलोख्यासाठी रक्तदान शिबिर हा स्तुत्य उपक्रम- प्रीतम म्हात्रे पनवेल : बकरी ईद आणि आषाढी एकादशी निमित्त पनवेल मधील विविध संघटना गेली पाच वर्षे रक्तदान शिबिर भरवित आहेत. हा स्तुत्य उपक्रम असून त्याचं अनुकरण करायला हवं." असे उद्गार माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी काढले. विविध संघटनांनी आयोजित रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिल्यावर ते बोलत होते.              'ईद-उल-अजहा' (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. धर्माने सांगितलेले त्याग हे मूल्य कुर्बानी प्रथेशी जोडलेले आहे. तसेच समतेची शिकवण देणारी आषाढी एकादशीही यावर्षी एकच दिवशी आली आहे. बकरी ईद निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते.      आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. आपल्या सर्वधर्मीय संतांनी ही हीच शिकवण दिली आहे. हाच विचार समोर ठेवून  “बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून  पनवेल मधील विविध पुरो

अभंगरंग" या कार्यक्रमाचे आयोजन

Image
  अभंगरंग" या कार्यक्रमाचे आयोजन  पनवेल : आषाढी एकादशी निमित्त "अभंगरंग" या कार्यक्रमाचे आयोजन मैत्री मल्टीक्रिएशन्स यांच्यातर्फे पनवेल येथे करण्यात आले होते. यावेळी पंडित आनंद भाटे आणि गायिका केतकी माटेगावकर यांच्यासोबत सिनेअभिनेते विघ्नेश जोशी, पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते.      या कार्यक्रमासाठी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी स्नेहकुंज आधार गृह नेरे येथील आजी-आजोबा यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलावले होते. या आजी-आजोबांच्या लेकरांनी जरी यांच्यावरील लक्ष कमी केले असले तरीसुद्धा आपण एक माणूसकी म्हणून त्यांच्या वयोमानानुसार पंढरपूरला जरी नेऊ शकत नसलो तरी सुद्धा या कार्यक्रमाची त्यांची आवड पाहता त्यांना नक्कीच काही क्षणाचा एक सुखद अनुभव देऊ शकतो या विचाराने त्यांना बोलावले होते. कार्यक्रमानंतर त्यांच्या डोळ्यातील आपुलकीचे भाव पाहून पनवेलमध्येच साक्षात विठू माऊली चे दर्शन मिळाल्याचा भास झाला असे मत माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे  यांनी व्यक्त केले.

करंजाडे डॉक्टर्स असोशिएशन तर्फे वृक्षारोपण.

Image
  करंजाडे डॉक्टर्स असोशिएशन तर्फे वृक्षारोपण.  उरण :  (विठ्ठल ममताबादे ) निसर्गाचे,पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, पर्यावरण संरक्षणा विषयी समाजात जणजागृती व्हावी या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील करंजाडे डॉक्टर्स असोशिएशन तर्फे रविवार दि 2 जुलै 2023 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत साईतिर्थ प्रतिष्ठाण, सेक्टर 4, करंजाडे, टाटा पॉवर हाउसच्या मागे,करंजाडे पाईपलाईनजवळ पनवेल येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.सदर वृक्षारोपण कार्यक्रम करंजाडे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विक्रम पाटील व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पर्यावरणाची होणारी हानी व धोक्यात आलेले सजीव सृष्टी, धोक्यात आलेले सृष्टीचक्र लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत सर्व डॉक्टरांनी एकत्र येत यावेळी वृक्षारोपण केले.सर्वप्रथम सर्व डॉक्टरांच्या हस्ते श्री साईबाबांची आरती करण्यात आली. डॉ. विक्रम पाटील यांनी आपल्या  प्रस्तावनेत वृक्षारोपण करणे किती महत्वाचे आहे हे सांगितले , डॉ. डी. व्ही जगदाळे,ज्वालासिंह देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.करंजाडेचे उपसरपंच सागरभाई आंग्रे,डॉ. सागर पाटील,डॉ. सुनिल
Image
  महेंद्रशेठ घरत यांच्या शिष्यांनी केली  गुरुपौर्णिमा साजरी. उरण : विठ्ठल ममताबादे हजारो तरुणांचे आधार,गुरुवर्य महेंद्रशेठ घरत यांच्या शेकडो शिष्यांनी आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पूर्वीच्या काळात अध्यात्माचे ज्ञान देणाऱ्या गुरूंचे पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशी करत असत तीच परंपरा सुरु आहे परंतु आजच्या इंटरनेटच्या जमान्यात जगात कसे जगावे हे शिकविणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आधुनिक गुरु आहेत. शेकडो युवकांना जिवनाचा मार्ग दाखविणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शिष्यांनी शेलघर येथील घरी उपस्थित राहून आपल्या गुरुना वंदन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

बेंचप्रेस चेआंतरराष्ट्रीय स्पर्धेत अक्षय आणि दिनेश पदक विजेते.

Image
बेंचप्रेस चेआंतरराष्ट्रीय स्पर्धेत अक्षय आणि दिनेश पदक विजेते. पनवेल : एशिया -पॅसिफिक - आफ्रिका  क्लासिक आणि एक्वीप पॉवरलिफ्टींग आणि बेंच प्रेस सब ज्युनिअर,ज्युनिअर, सिनिअर  (पुरुष/महिला)स्पर्धा हाँगकाँग येथे दिंनाक २४/०६/२०२३ते३०/६/२०२३या कालावधीत पार पडली.या स्पर्धेत बेंचप्रेस क्लासिक स्पर्धेत रायगडजिल्यातील अक्षय शनमुगंम यांनी ओपन ७४ कीलों वजनी गटात रौप्य पदक मिळून द्वितीय क्रमांक मिळवला आणि दिनेश पवार यांनी मास्टर गटात 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.             आंतरराष्ट्रीय स्पर्धात अक्षय आणि दिनेश  हे  पहिल्यांदा पदक विजेते आहेत या मेहनती आणि जिद्दी खेळाडूचे    "पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड "  संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदनकेले आहे.तसेच या दोन्ही खेळाडूंचे यशाबद्दल महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशन चे सेक्रेटरी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सिरर्देसाई यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच पॉवरलिफ्टिंगस्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे   गिरीष वेदक,अरुण पाटकर,राहुल गजरमल,सचिन भालेराव.यशवंत मोकल.माधव पंडीत,सुभाष टे