Posts

Showing posts from June 27, 2023

मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट

Image
  मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट पनवेल(प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर विशेष मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येते आहे. त्यानुसार उत्तर रायगड भाजपच्या वतीने या अभियानांतर्गत समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींचा (सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट) शनिवारी (दि. 24) मेळावा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. खारघर रॉयल तुलीप येथे झालेल्या या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महाराष्ट्र पदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी व भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. समाज माध्यमांवरील तब्बल 90 सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर यांचा सहभाग या कार्यक्रमासाठी लाभला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीना गोगरी यांनी केले. यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, सोशल मिडिया आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे आणि सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. प्रदेश प्रवक्या श्वेता शालिनी यांनी भारतीय जनता पक्षाचे कार

खांदा कॉलनीत संयुक्त मोर्चा संमेलन; मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

Image
  खांदा कॉलनीत संयुक्त मोर्चा संमेलन; मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती खांदा कॉलनी(प्रतिनिधी) देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मन उंचाविण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यानुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी  @  9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत रविवारी (दि. 25) संयुक्त मोर्चा संमेलन आयोजित करण्यात आला होता. खांदा कॉलनी येथील बेलिझा बँक्वेट हॉल येथे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, दीपक बेहेरा, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अल्प संख्यांक मोर्चा अध्यक्ष सय्यद अकबर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेविका चारुशीला घरत, नीता माळी,

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३

   राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३- मुंबई*   *स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र व्यंकटेश कोणार, मुंबई उपनगर व स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र कामिनी बोस्टे ठाणे*  दिनांक२३-६-२०२३ व २४-६-२०२३ या दिवशी वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा, समाज मंदिर हॉल गुरुतेग बहादुर सिंग नगर, सरदार नगर, अँटॉप हिल सायन कोळीवाडा , प्रमुख पाहुणे व या स्पर्धेचे प्रमुख आश्रयदाते मा. आमदार कॅप्टन तमिल सेलव्हन यांच्या उपस्थितीत  पॅरास्विमर श्री राजाराम घाग, (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्वदूर अशा जिल्ह्यातून जवळजवळ दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या महिला व पुरुषांचे गटांच्या स्पर्धा त्यांचा निकाल खालील प्रमाणे,  पुरुष गट: ५९ किलो:-१) धर्मेंद्र यादव, मुंबई शहर, २) वैभव थोरात, औरंगाबाद ३) निरज कुमार यादव, मुंबई उपनगर. ६६ किलो:- १) व्यंकटेश कोणार, मुंबई उपनगर २)साहिल उतेकर, मुंबई शहर,३) सिद्धेश काजरोलकर, पुणे ,७४ किलो:-१) विजय फासले, मुंबई उपनगर २) विजय शेलार, नवी मुंबई.३)