Posts

Showing posts from June 24, 2023

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३- मुंबई* 

Image
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३- मुंबई*  आज दिनांक२३-६-२०२३, वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा, समाज मंदिर हॉल गुरुतेग बहादुर सिंग नगर, सरदार नगर, अँटॉप हिल सायन कोळीवाडा , प्रमुख पाहुणे व या स्पर्धेचे प्रमुख आश्रयदाते मा. आमदार कॅप्टन तमिल सेलवन यांच्या उपस्थितीत प्यारा स्विमर श्री राजाराम घाग, (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्वदूर अशा जिल्ह्यातून जवळजवळ दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेमध्ये आज महिला गट आणि पुरुषांचे गटांच्या स्पर्धा त्यांचा निकाल खालील प्रमाणे,  पुरुष गट: ५९ किलो:-१) धर्मेंद्र यादव, मुंबई शहर, २) वैभव थोरात, औरंगाबाद ३) निरज कुमार यादव, मुंबई उपनगर. ६६ किलो:- १) व्यंकटेश कोणार मुंबई उपनगर, २)साहिल उतेकर, मुंबई शहर,३) सिद्धेश काजोलकर, पुणे ,७४ किलो:-१) विजय फासले, मुंबई उपनगर २) विजय शेलार, नवी मुंबई.३) ओमकार वाणी,कोल्हापूर महिला गट:-४७ किलो:- १)काजल भाकरे, ठाणे, २)हर्षदा घुले, मुंबई उपनगर ३)अमृता भगत रायगड ,

नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी- प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये  राज्यात महाविकास आघाडी नाही तर महाहतबल आघाडी 

Image
  नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी- प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये  राज्यात महाविकास आघाडी नाही तर महाहतबल आघाडी  पनवेल (प्रतिनिधी) मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी वाटचाल ठरली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.  देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली. या काळात देशाच्या विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @ ९ महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली.  पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे मावळ लोकसभा  निवडणूक प्रमुख  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख

प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी पनवेलमध्ये महारोजगार मेळावा; नामदार उदय सामंत, नामदार मंगलप्रभात लोढा यांची लाभणार प्रमुख उपस्थिती

   प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी पनवेलमध्ये महारोजगार मेळावा; नामदार उदय सामंत, नामदार मंगलप्रभात लोढा यांची लाभणार प्रमुख उपस्थिती  पनवेल(प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेलमध्ये शनिवार दिनांक २४ जून रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यास राज्याचे उद्योग मंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.        प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड- अलिबाग, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम २४ जून रोजी सकाळी ०९ वाजता आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात होणार आहे.  यावेळी प्रमुख म

तळा बाजारपेठेतील रस्‍त्‍यांनी घेतला मोकळा श्‍वास नगरपंचायतीचे स्वच्छता अभियान

Image
  तळा बाजारपेठेतील रस्‍त्‍यांनी घेतला मोकळा श्‍वास नगरपंचायतीचे स्वच्छता अभियान* तळा संजय रिकामे  रायगड जिल्ह्यातील शहरांसह गावांचे केवळ सुशोभीकरणच न करता स्वच्छ्ताही व्हायला हवी, या उद्‌देशाने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत क्षेत्रातील अस्वच्छ जागा तसेच अनधिकृतपणे टपऱ्या हटविण्याची मोहीम शुक्रवारी पार पडली.तळा नगरपंचायत ते बळीचा नाका ते भोईर वाडी पर्यंतचा मुख्य रस्ता या रस्त्यावर  स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले. स्वच्छतेची जबाबदारी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर शहारातील प्रत्‍येक नागरिकांची आहे. आपल्या परिसराची दैनंदिन स्वच्छ्ता ठेवली पाहिजे तसेच दुकानाच्या बाहेर अनधिकृतपणे टपर्‌या, पत्रे टाकले असल्‍यास तातडीने काढावे, अशा सूचना मुख्याधिकारी माधुरी मेकडे  यांनी केल्‍या आहेत. स्वच्छ्ता मोहिमेत नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्य चंद्रकांत रोडे, विरोधी पक्ष नेत्या नेहा पांढरकामे, तहसीलदार स्वाती पाटील,नगरसेवक नगरसेविका नगरपंचायत कर्मचारी पोलीस कर्मचारी प्रतिष्टीत नागरिक आणि तळेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते                 अभिया