Posts

Showing posts from June 21, 2023

अक्षय शंनमुगंम आणि दिनेश पवार यांची भारतीय पॉवरलिफ्टींग संघात निवड. 

Image
अक्षय शंनमुगंम आणि दिनेश पवार यांची भारतीय पॉवरलिफ्टींग संघात निवड.  रायगड मत # अरुण लक्ष्मण पाटकर दि.24 ते 30 जून दरम्यान हाँगकाँग येथे आशिया पॅसिफिक आफ्रिका पॉवर लिफ्टींग स्पर्धेत बेंचप्रेस प्रकारात सहभागी होण्यास रायगडच्यां दिनेश पवार, (लोखंडे जिम) खोपोली यांची मास्टर व अक्षय शनमुगन (आयर्न मेट)खोपोली याची ओपन स्पर्धा साठी भारतीय संघात निवड झाली आहे असे पॉवर लिफ्टिंग इंडिया या राष्ट्रीय कार्यकारिणी ने पत्र दिले आहे .बेंच प्रेस स्पर्धेस दिनाक,२३/६/२०२३रोजी  पहाटे  ते हाँगकाँगला रवाना होतील.सदर स्पर्धा दिनांक -२४/६/२०२३ते ३०/६/२०२३ या कालावधीत होणार आहेत.खेळाडूंचे निवडीबाबत महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग चे सेक्रेटरी छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतर राष्ट्रीय खेळाडू संजय सरदेसाई यांचे बहुमोल सहकार्य झाले  आहे.त्यांनी या खेळाडूना शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच  "पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड"चे वतीने आनंद व्यक्त करूनअध्यक्ष गिरीष वेदक,(पनवेल) सेक्रेटरी अरुण पाटकर  तसेच राहुल गजरमल.सचिन भालेराव.माधव पंडित,(रसायनी)सुभाष टेंबे(माणगाव) ,श्रीनिवास भाटे , दत्तात्रय मोरे, संदीप पाटकर, मानस

पॉवरलिफ्टीग रायगडचा संघ राज्य वरिष्ठ स्पर्धा साठी जाहीर

Image
  पॉवरलिफ्टीग रायगडचा संघ राज्य वरिष्ठ स्पर्धा साठी जाहीर रायगड मत # अरुण लक्ष्मण पाटकर मुंबई मध्ये दिंनाक २२जून२०२३ते २४जून२०२३या कालावधीत होणाऱ्या पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी पॉवरलिफ्टीग स्पोर्ट्स असोसिएशनने रायगडचा संघ जाहीर केला आहे. ही वरिष्ठ राज्य स्पर्धा असल्याने या स्पर्धेत खेळाडूंचा कस लागत असतो. पुढील खेळाडूंची निवड "पॉवरलिफ्टिग स्पोर्ट्स असोसिशनचे सचिव अरुण पाटकर,माधव पंडित,राहुल गजरमल यांचे निवड समितीने त्यांचे कडे आलेल्या नावातून खेळाडूंची आजवरची कामगिरी लक्ष्यात घेऊंनजाहीर केला.आहे.   १)अमृता ज्ञानेश्वर भगत(४७किलो वजनी गट ) आयनमेट जिम खोपोली. २)सलोनी पद्माकर मोरे.(५७किलो गट)चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमी ,महाड ३)विक्रांत अनिल गायकवाड.(१०५किलो वजनी गट)आयनमेट जिम, ४) ऋतिक शिशिर पोळ(१२०+किलो वजनी गट) आयनमेट जिम,खोपोली. व्यवस्थापक -- सचिन भालेराव,सुभाष टेंबे(माणगाव) तर प्रशिक्षक - माधव पंडित, अरुण पाटकर यांची निवड करण्यात आली आहे.