Posts

Showing posts from June 11, 2023

"पॉवरलिफ्टींग क्लासिक राष्ट्रीय स्पर्धेत कुणाल पिंगळे ला सुवर्ण पदक"

Image
  "पॉवरलिफ्टींग क्लासिक राष्ट्रीय स्पर्धेत कुणाल पिंगळे ला सुवर्ण पदक" पनवेल (अरुण लक्ष्मण पाटकर) रांची येथे सुरू असलेल्या क्लासिक राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचा स्पर्धक"कुणाल सुभाष पिंगळे"(लोखंडे जिम,खोपोली) याने ५३ किलो वजनी गटात  प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. त्याने या स्पर्धेत  स्कॉट,बेंचप्रेस, डेडलिफ्ट या प्रकारात एकूण४३७.५००किलो ग्रॅम वजन घेतले.त्याबद्दल त्याला स्कॉट मध्ये रौप्य,बेंच प्रेसला रौप्य आणि डेड लिफ्ट ला कांस्य पदक मिळाली आहेत. कुणाल याने  सुवर्ण पदका सह आणखी तीन पदक प्राप्त केली आहेत.सब ज्युनिअर चे ८३ किलो वजनी गटात"अथर्व लोधी "(संसारे फिटनेस,पेण) याने ५०५वजन घेऊन ४था क्रमांक घेतला. तर सब ज्युनिअर महिला४३किलो वजनी गटामध्ये"सुहानी संतोष गावडे"(सार्व.व्यांयाम शाळा, वाडगाव अलिबाग हीने ९वें स्थान प्राप्त केले.  खेळाडूंचे यशाबद्दल"पॉवरलि फ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे सचिव अरुण पाटकर,अध्यक्ष गिरीश वेदक,उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे(महाड),कार्याध्यक्ष यशवंत मोकल (पनवेल),खजिनदार राहु

"रायगडचे सुहानी गावडे,कुणाल पिंगलेआणी अथर्व्ह लोधी राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धा साठी रवाना"

Image
                                                                       सुहानी गावडे,                                                                      अथर्व्ह लोधी.                                                                         कुणाल पिंगळे     "रायगडचे सुहानी गावडे,कुणाल पिंगलेआणी अथर्व्ह लोधी राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धा साठी रवाना" पनवेल (अरुण पाटकर):  झारखंडमध्ये "रांची"येथे राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर मुले आणि मुली यांची पॉवरलिफ्टींग स्पर्धा होणार आहे.ही स्पर्धा ०६जून ते ११ जून २०२३ या कालावधीत होणार आहे.या राष्ट्रीय स्पर्धा साठी एकूण ५६२खेळाडू भाग घेणार आहेत.या मध्ये ३३४पुरुष आणि २२८महिला खेळाडू येणार आहेत.या राष्ट्रीय स्पर्धेतून दिंनाक २४ ऑगस्ट ते ०३सप्टेंबर२०२३ या कालावधीत "रोमानिया"मधील क्लुझ नेपोका या ठिकाणी होणाऱ्या जागतिक सब ज्युनियर आणि ज्युनिअर स्पर्धेस भारतीय संघाची निवड होणार आहे.त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्व आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग संघात रायगड ची "सुहानी संतोष गावडे"(सार्व. व्याय