...तर, प्रीतम म्हात्रे खासदार होतील? # मावळ लोकसभा मतदार संघ ते जिंकू शकतील. #राजकारणात काहीही घडू शकते 8 वी पास श्रीरंग बारणे खासदार होऊ शकतात, तर उच्च शिक्षित प्रीतम म्हात्रे का नाही?
... तर, प्रीतम म्हात्रे खासदार होतील? मावळ लोकसभा मतदार संघ ते जिंकू शकतील. #राजकारणात काहीही घडू शकते 8 वी पास श्रीरंग बारणे खासदार होऊ शकतात, तर उच्च शिक्षित प्रीतम म्हात्रे का नाही? पनवेल (रायगड मत/जितेंद्र नटे) सध्या पावसाळा जवळ जरी आला असला तरी राजकारणाचा तवा मात्र तापू लागला आहे. या तव्यावर आपली भाकरी कशी शेकवायची आणि 5 वर्षे जनतेला कसे शेकवायचे याच्यातच लबाड राजकारणी गर्क आहेत. राजकारणात आणि क्रिकेटमध्ये कधी काहीं घडेल कधी कोण जिंकेल आणि कधी कोण क्लीन बोल्ड होईल सांगू शकत नाही. सध्या चर्चा सुरू आहे ती मावळ मतदार संघातील उमेदवाराची. का चर्चा चालू आहे? का सर्वांना अचानक वाटू लागले की आपण इथे जिंकू शकतो? कारण शिवसेनेचे खासदार शिवसेना सोडून शिवसेनेत गेले आहेत. वाचताना गडबडलात ना? अशीच गडबड होणार आहे मतांची म्हणूनच सगळ्यांना इथं आपली डाळ शिजू शकते असे वाटू लागले आहे. इथले खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटाच्या शिवसेनेत गेलेत, खऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेत नाहीत. आणि लोकांनी हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दैवत म्हणून मतदान श्रीरंग बारणे यांना केले होते. यावेळी श्रीरं