Posts

Showing posts from June 5, 2023

सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद.

Image
  सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद.  विविध सामाजिक संस्था, संघटनेला पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव.  उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे) सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबूसरे या संस्थेची स्थापना 20 एप्रिल 2023 रोजी झाली. या संस्थेच्या माध्यमातून रविवार दि. 4 जून 2023 रोजी उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबीर व आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2023 वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.संस्था स्थापन झाल्यापासून हा संस्थेचा पहिलाच उपक्रम होता.या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे यांच्या माध्यमातून व समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले.एकीकडे रक्तदान सुरु असतानाच दुसरीकडे उरण मधील विविध सामाजिक संस्थांना, संघटनांना आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी 35 हून अधिक विविध सामाजिक संस्था, सघटनांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव

खासदार की साठी महेंद्रशेठ घरत मावळ मतदार संघामधून 100% जिंकणार

Image
  मावळ लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा .  कोकण आणि रायगड मध्ये काँग्रेसला  संजीवनी देण्यासाठी सर्व दृष्टीने सक्षम अशा  रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना मावळची  उमेदवारी द्या. रायगड जिल्हा काँग्रेस नेते , पदाधिकारी ,महिला काँग्रेस ,युवक काँग्रेस अल्पसंख्यक सेल ,ओ .बी .सि .सेल सेवादल सर्व कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्टींकडे एकमुखी मागणी उरण - काँग्रेस पक्षाने राज्यातील  लोकसभा मतदार संघात उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून कोणकोणत्या जागा काँग्रेस सक्षमपणे लढऊ शकतो याची चाचपणी करण्यासाठी 2 व 3 जून रोजी टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत हे मावळ लोकसभा मतदार संघातून चांगली लढत देऊ शकतात या वर चर्चा झाली असून महाविकास आघाडीच्या बैठकीत मावळ लोकसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षासाठी सोडून घेण्यावर एकमत झाल्याचे कळते. पुढील सर्व निवडणुका आघाडी एकत्र लढणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीला सोडला गेल्यामुळे काँग्रेस पक्षाने मावळ

"नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेलला सुद्धा करमाफी मिळावी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

Image
  " नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेलला सुद्धा करमाफी मिळावी मा.   विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी पनवेल :    पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील सिडको विभागातील मालमत्ता कराबाबत अजूनही संभ्रम आहे. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या दुहेरी मालमत्ता कर भरण्याबाबत पालिकेने रहिवाश्यांना नोटीस बजावल्या आहेत. यावर प्रितम म्हात्रे यांनी वेळोवेळी सवलती संदर्भात पाठपुरावा केलेला आहे.             मालमत्ता करमाफीसाठी नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईतही  500  चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यास सरकार अनुकुल आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक घेतली. नवी मुंबई महानगरपालिकेने  PAP ( प्रकल्प प्रभावित व्यक्ती) निवासी मालमत्तांसाठी मालमत्ता कर दंड वसूलीचा निर्णय तात्काळ स्थगित ठेवला आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या मालकांकडून मालमत्ता वसुली करण्यावर भर देण्यात आला होता.   राज्य सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतरच