Posts

Showing posts from June 2, 2023

रस्ता खचल्या बाबत चौकशी करण्याची माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी

Image
  रस्ता खचल्या बाबत चौकशी करण्याची माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी पनवेल : पनवेल शहरातील महात्मा गांधी रोड मोहल्ला मशीद शेजारील रस्त्या खचल्या बाबत चौकशी करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.        पनवेल शहरातील महात्मा गांधी रोड पाडा मोहल्ला येथील मज्जिद शेजारील रस्ता खचून टँकरचा अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडता घडता टळली आहे. या रस्त्याच्या नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे. या कामात हयगय केल्याने रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने हा रस्ता खचला आहे तरी संबंधित कामाबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 'जल्लोष सुवर्णयुगाचा'; रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर 

Image
  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 'जल्लोष सुवर्णयुगाचा'; रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर  पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय,  क्रीडा कार्यक्रमांच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ०२ जून रोजी न्हावेखाडी रामबाग येथे  'जल्लोष सुवर्णयुगाचा' मनोरंजन कार्यक्रम तसेच सत्यनारायण महापूजेचे तर रविवार दिनांक ०४ जून रोजी मोहोपाडा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.            ग्रामस्थ मंडळ न्हावेखाडी व श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद तर सायंकाळी ७. ३० वाजता स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत पप्पू सूर्यराव निर्मित आणि गायक योगेश आग्रावकर, गायक अमोल जाधव, हास्य कलाकार सुशांत पाटील अशा अनेक कलाकारांचा समावेश असलेला 'जल्लोष सुवर्णयुगाचा' हा नृत्य आणि हास्य मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.             लो