रोजच्या आहारात भरड धान्य समाविष्ट करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी* *--उपविभागीय अधिकारी अमित शेडगे*
रोजच्या आहारात भरड धान्य समाविष्ट करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी - उपविभागीय अधिकारी अमित शेडगे प्रतिनिधी /संदीप लाड :- आहारातील भरड धान्यांचा वापर कमी झाल्याने प्रत्येक कुटूंबास विविध आजारांचा सामना करावा लागत असून रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी राजगिरा या सारख्या तृणधान्यांचा (भरड धान्य) वापर करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी आज श्रीवर्धन येथे केले. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणे व राज्य शासनाचे विविध विभाग तसेच नगरपरिषद श्रीवर्धन यांच्या सहकार्याने श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर येथे आंतरराष्ट्रीय भरड धान्य (पौष्टिक तृणधान्य) वर्ष 2023 निमित्त आयोजित मल्टीमिडीया प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार महेंद्र वाकळेकर, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, नगर परिषद मुख्याधिकारी विराज लबडे, , तालुका कृषी अधिकारी डी.एल. कुंभार, बालविकास सेवा अधिकारी श्रीमती अमिता भायदे, म्हसळा तहसिलदार समीर घारे, क्षेत्रीय प्रचार अधिक