Posts

Showing posts from May 22, 2023

ठाकरोली विभाग समाज भवनचे उद्घाटन खा. तटकरे यांच्या हस्ते

Image
 ठाकरोली विभाग समाज भवनचे उद्घाटन खा. तटकरे यांच्या हस्ते  वाढीव १५ लाख निधीचे तात्काळ पत्र देऊन पुढील कामाला चालना म्हसळा - २१ मे २०२३ रोजी म्हसळा तालुका कुणबी समाज संघटना दक्षिण ठाकरोली विभाग भव्य वास्तू चे उद्घाटन श्रीकृष्ण वाडी (कोकबल) येथे मा. खा.सुनिलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कुणबी समाज तालुका अध्यक्ष महादेव पाटील, कृषी संवर्धन माजी सभापती बबन मनवे, उपनगराध्यक्ष सुनीलजी शेडगे कुणबी समाज नेते कृष्णा कोबनाक, कुणबी संघ उपाध्यक्ष बबन उंडरे,रायगड भूषण पुरस्कार प्राप्त शंकर बेटकर, शंकर तिलटकर, नथुराम घडशी तालुका अध्यक्ष समिर बनकर, मुंबई सरचिटणीस महेश शिर्के, माजी उपसभापती संदिप चाचले,उपाध्यक्ष महेंद्र टिंगरे , महिला अध्यक्षा स्नेहा खापरे, मिना टिंगरे, स्नेहा सोलकर माजी सभापती छाया म्हात्रे, विभाग अध्यक्ष रमेश शिंदे, दिलिप मांडवकर, मोहन शिंदे,सदा आग्रे, राजु जाधव, नथुराम भुवड, संतोष घडशी, अनिल बांद्रे ,संजय ठोंबरे, महेंद्र घडशी, मनोज मोरे,भरत बांद्रे सुनिल सोलकर,संदिप मोरे,रघुनाथ गोणबरे यावेळी विशेष सन्मान नथुराम काताळे, व सतीश शिगवण यांचा करण्यात आले.             खा

श्रृती सुनिल शिगवण हिचा ग्रामस्थ मंडळ तोंडसुरे कुणबी समाजाच्या वतीने कौतुक

Image
 श्रृती सुनिल शिगवण हिचा ग्रामस्थ मंडळ तोंडसुरे कुणबी समाजाच्या वतीने कौतुक म्हसळा -   ग्रामस्थ व महिला मंडळ (स्थानिक - मुंबई)आणि वाघेश्वर क्रिकेट संघ कुणबी समाज तोंडसुरे यांच्या वतीने गावातील सुकन्या श्रृती सुनिल शिगवण हिने  नुकत्याच झालेल्या रायगड पोलिस भरतीत ती पात्र ठरली आहे. म्हणून या चमकदार कामगिरी बद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच एक हात मदतीचा म्हणून पुढील शैक्षणिक सहकार्यासाठी आर्थिकदृष्ट्या सहाय्य केले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित गावचे सरपंच सुरेश महाडीक, गोविंद महाडीक ग्रामीण अध्यक्ष, सुरेश गुणाजी महाडिक मुंबई अध्यक्ष, विशेष निमंत्रित पाहुणे आदर्श शिक्षक नरेश सावंत सर , गणेश भायदे युवा कार्यकर्ते,समाजसेवक जलालभाई जहांगीर, प्राथमिक शिक्षक जयसिंग बेटकर , क्रिडा मंडळ अध्यक्ष वसंत महाडीक, सेक्रेटरी प्रकाश बांद्रे, उपाध्यक्ष मनेष बांद्रे, विनोद जाधव , कर्णधार रोहन महाडीक,उपसेक्रेटरी, गाव सदस्य प्रकाश महाडिक, तुकाराम महाडीक, सुनील शिगवण, शैलेश शिगवण, महिला अध्यक्षा लक्ष्मीबाई बांद्रे, हिना महाडीक,भिमा महाडीक आदि मान्यवर

उरणच्या प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विदयाभूषण पुरस्कार प्रदान.

Image
  उरणच्या प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विदयाभूषण पुरस्कार प्रदान. उरण (विठ्ठल ममताबादे ) अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र, "मराठी साहित्य मंडळ" या संस्थेतर्फे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार 2023 ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या शुभहस्ते जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाच्या शिक्षिका प्रमिला संतोष पवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शुक्रवार दि. 19/5/2023 रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे  प्रदान करण्यात आला.उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या त्या पत्नी आहेत. उरणच्या प्रमिला संतोष पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विदयाभूषण पुरस्कार 2023 मिळाल्याने प्रमिला पवार यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फळांचा राजा असलेला आंबा लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत आवडीचे फळ आहे. सध्याच्या मोसमात आंब्यांची मोठी रेलचेल आणि मागणी आहे. त्या अनुषंगाने मोहोपाडा रसायनी परिसरात विविध फळांसाठी प्रसिद्ध असलेले फळविक्रेता मंगेश घाडगे यांच्या दुकानात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात फळे मिळत आहेत, त्यामुळे दुकानात आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे.

Image
  मे महिना आणि आंबा असं समीकरणचं आहे. सध्या आंब्याचा सीजन आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले आहेत. अनेक जण आंबा म्हटलं की अगदी ताव मारतात.    आंब्यात भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि विटॅमिन ए असतं. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते.   आंब्याचा मोसम जेमतेम दोन तीन महिन्यांचा. पण तेवढ्या काळात आपल्या जिभेचे पुरवता येतील तेवढे चोचले पुरवून हे फळ साक्षात अमृताची अनुभूती देत असतं…   ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ सर्वानी आपल्या लहानपणी आंब्याचे हे गाणे नक्की ऐकले असेल. आंबा या नावातच एक वेगळे माधुर्य आहे. ‘आम्र’ या संस्कृत नावात तर मस्त राजेशाही थाट आहे. उगाच नाही आंब्याला फळांचा राजा म्हणत. चव, रंग, रूप प्रत्येक बाबतीत आपला आब राखून असलेले फळ.     फळांचा राजा असलेला आंबा लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत आवडीचे फळ आहे. सध्याच्या मोसमात आंब्यांची मोठी रेलचेल आणि मागणी आहे. त्या अनुषंगाने मोहोपाडा रसायनी परिसरात विविध फळांसाठी प्रसिद्ध असलेले फळविक्रेता मंगेश घाडगे यांच्या दुकानात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात फळे मिळत आहेत, त्यामुळे दुकानात आंबा खरेदीसाठी

युवा वॉरियर्स फुटबॉल, व्हॉलीबॉल चषक स्पर्धा रंगली

Image
  युवा वॉरियर्स फुटबॉल, व्हॉलीबॉल चषक स्पर्धा रंगली पनवेल(प्रतिनिधी) महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी खारघर येथील गोखले शाळेच्या मैदानात रंगलेल्या युवा वॉरियर्स व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते, तर खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या युवा वॉरियर्स फुटबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) झाले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी फुटबॉल स्पर्धेला भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. खारघरमधील हॉलीबॉल चषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ, माजी नगरसेवक हरेश केणी, रामजी बेरा, प्रवीण पाटील, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका अनिता पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, दीपक शिंदे, किरण पाटील, विजय पाटील, रमेश खडकर, वासुदेव पाटील, विपूल चौतालिया, प्रभाक

मुलाच्या वाढदिवशी रक्तगट तपासणी शिबिर,"प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी"

Image
  मुलाच्या वाढदिवशी रक्तगट तपासणी शिबिर,"प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी"  पनवेल : सध्या शाळा आणि कॉलेजचे प्रवेश सुरू झाले आहेत नव्याने प्रवेश घेताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप देणे अनिवार्य झाले आहे. यावेळी पालकांना शाळेजवळील लॅब शोधून तेथून रक्तगट तपासणी करावी लागत होती. यासंदर्भात पनवेल मधील विद्यार्थ्यांकरिता  जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून  श्री.प्रितम म्हात्रे यांनी त्यांचा मुलगा आराध्य याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीतून "मोफत रक्तगट तपासणी शिबिर " दिनांक 19 मे ते 19 जून असा संपूर्ण महिनाभर तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल च्या समोरील त्यांचे सेवालय ,दिपक क्लीनिकल लॅबोरेटरी शॉप नंबर 4, वास्तु श्री सोसायटी, पनवेल येथे आहे. तिथे हे शिबिर आयोजित केले आहे. तसेच प्रवेशादरम्यान इतर ऑनलाईन दाखले आणि सुविधांसाठी आपल्याला तिथून सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे. अधिक माहितीसाठी त्यांनी दिपक कुदळे :-9930203100 हेल्पलाइन क्रमांक:-8334050505 / 7769050505/9326050505 / 8542050505 या

रायगडमध्ये फेनेस्टा

Image
रायगडमध्ये फेनेस्टा    पनवेल(प्रतिनिधी)  भारतातील सर्वात मोठे दारे व खिडक्यांचे ब्रॅंड आणि या विभागाच्या बाजारपेठेतील आघाडीचे लीडर फेनेस्टा यांनी आणखी एक शोरूम चालू करून त्यांच्या रिटेल विस्ताराला बळकटी दिली आहे. त्यानुसार अलिबाग मधील विद्यानगर येथे प्रिया सेल्स हे खास शोरूम उपलब्ध झाले आहे.    या ठिकाणी सर्वोत्कृष्ट दर्जाच्या अॅल्युमिनियम  खिडक्या व दरवाजे, यूपीव्हीसी खिडक्या व दरवाजे आणि अंतर्गत आणि डिझाईनर दरवाजे तेथे उपलब्ध आहेत.  फेनेस्टाचे व्यवसाय प्रमुख साकेत जैनया लॉंच बाबत म्हणाले,  “ संपूर्ण देशात आमचा ठसा वाढवणे हा एक आनंददायी प्रवास आहे. गेल्या २० वर्षांमध्ये ग्राहकांना पूर्ण समाधान देण्यासाठी फेनेस्टाचे अथक प्रयत्न आणि आमच्या ग्राहकांचा आमच्यावरील विश्वास यामुळे फेनेस्टामध्येवाढ झाली आहे. हे नवीन शोरूम म्हणजे आमचा ठसा रुंदावण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.  फूटप्रिंट आणि वैयक्तिक प्राधान्यांवर आधारित निर्णय घेण्यापूर्वी लोकांना उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांचे  विस्तृत पर्याय पाहण्याची संधी देते.  फेनेस्टा शोरूम्स ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मार्केटलीडर म्हणून स्थान मिळ