Posts

Showing posts from May 19, 2023

आमदार प्रशांत ठाकूर आणि भरत गोगावले होणार मंत्री; रायगड जिल्ह्याचा होईल आता सुपर फास्ट विकास...

Image
आमदार प्रशांत ठाकूर आणि भरत गोगावले होणार मंत्री; रायगड जिल्ह्याचा होईल आता सुपर फास्ट विकास... पनवेल (रायगड मत/जितेंद्र नटे) रायगड जिल्ह्याला 2 मंत्री पदे मिळणार आहेत. महाडचे आमदार भरत शेठ गोगावले आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर होणार मंत्री. पालकमंत्री आता रायगडचा होणार त्यामुळे रायगडचा विकास हा सुपरफास्ट होईल यात शंकाच नाही. दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड असा दुहेरी विकास साधण्यासाठी एक भाजपचा आणि शिवसेनेचा असा दुहेरी संगम साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, रायगड जिल्ह्यात सध्या 3 भाजपचे तर 3 शिवसेनेचे आमदार आहेत. म्हणजे खासदारकी साठी येथे नक्कीच युतीचा उमेदवार उभा जिंकू।शकतो. त्याची तयारी आता पासूनच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेली अनेक महिने मंत्री मंडळाचा रखडलेला विस्तार रखडला होता. अखेर या महिन्याच्या मंत्री पद वाटण्यात येतील. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या महाराष्ट्र दाै-यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केल्याचे खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यावर शिंदे - फडणव