Posts

Showing posts from May 18, 2023

21 मे ला पनवेलमध्ये  लपंडाव? कुणाचा

Image
  21 मे ला पनवेलमध्ये  लपंडाव? कुणाचा पनवेल : त्रिकुटालाय थिएटर आणि अबस्त्रॅक्ट डिजिटल यांच्या माध्यमातून पनवेलच्या रसिक प्रेक्षकांसाठी पनवेल मधील कलाकारांनी "नाट्यनांदी" हा एक नाट्यमय सोहळा आयोजित केला आहे. येत्या रविवारी २१ मे रोजी रात्री ८ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह इथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या नाट्य सोहळ्यात दोन एकांकिका असणार आहेत. विशाल कदम लिखित आणि उमेश वाळके दिग्दर्शित एकांकिका लपंडाव आणि समीर खरे लिखित लिखित आणि संकेत गुरव दिग्दर्शित एकांकिका टेक्नोपेटी. लग्न झालेल्या आणि लग्न करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी नात्याचे गणित नव्याने उलगडणारी एकांकिका म्हणजे लपंडाव. आणि हरवत चाललेला पत्र संवाद यावर भाष्य करणारी एकांकिका म्हणजे टेक्नोपेट. तर या रविवारी रात्री 8 वाजता नक्की या सोहळ्यात सहभागी व्हा.

मौजे गौळवाडी ( निगडी )येथे भगवान श्रीकृष्ण मंदिराचा २० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Image
  *मौजे गौळवाडी ( निगडी )येथे भगवान श्रीकृष्ण मंदिराचा २० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न* प्रतिनिधी/संदीप लाड श्रीवर्धन तालुक्यातील  गौळवाडी (निगडी )येथे यादव गवळी समाज स्थानिक ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ ,श्री समर्थ महिला मंडळ, (रजि)यांच्या वतीने श्री कृष्ण मंदिराचा २० वा वर्धापन दिन व महाराष्ट्र यादव ट्रस्ट श्रीवर्धन शाखेचे २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा,महाआरती, महाप्रसाद, ज्येष्ठ समाज सेवकांचा ,व मान्यवरांचा सत्कार , विद्यार्थ्यांचा गुणगौरव, मनोगत, महिलांचा हळदी कुंकू, संगीत खुर्ची, लहान मुलां मुलींची डान्स स्पर्धा , असे विविध कार्यक्रम पार पडले सदर कार्यक्रमात मुरुड चिकणी येथील MBBS डॉक्टर झालेली कुमारी सीमा सुभाष खेडेकर व गौलवाडी येथील LLB वकील झालेले कुमार निश्चय संजय महाडिक आणि मुलीसाठी किडनी दान केलेल्या नागलोली येथील समाजसेविका शुभांगी महाडिक यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाला संजय रिकामे, नागेश साबळे,गणेश दिवेकर,मोहन दिवेकर, संतोष मिरगळ,गणेश साबळे, रुपेश महाडिक,सुनील तांबडे,संजय महाडिक,मोहन लाड,दिगंबर तांबडे,विनोद