Posts

Showing posts from May 16, 2023

पालकमंत्री व उद्योगमंत्री यांनी राष्ट्रीय सामाजीक न्याय विभाग आयोग सचिव - महाराष्ट्र राज्य या पदी सुखदेव सस्ते यांची केलीनियुक्ती # रामदास शेवाळे यांचा पक्ष वाढीचा झंझावात, कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

Image
पालकमंत्री व उद्योगमंत्री यांनी राष्ट्रीय सामाजीक न्याय विभाग आयोग सचिव - महाराष्ट्र राज्य या पदी सुखदेव सस्ते यांची केलीनियुक्ती # रामदास शेवाळे यांचा पक्ष वाढीचा झंझावात, कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह  पनवेल (प्रतिनिधी) : शिवसेना प्रभाग १० कळंबोली चे विभाग संघटक श्री. सुखदेव सस्ते यांची राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानव अधिकार आयोगाच्या *सचिव - महाराष्ट्र राज्य* या पदी अध्यक्ष जितेंद्र काटकर यांनी नियुक्ती केली. व त्याचे नियुक्ती पत्र काल उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा रायगड जिल्हा पालकमंत्री *मा. श्री. उदय सामंत साहेब* यांच्या हस्ते बाळासाहेब भवन मुंबई येथे त्यांनी स्वीकारले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..! राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानव अधिकार आयोगाच्या सचिव-महाराष्ट्र राज्य पदी सुखदेव सस्ते यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री , शिवसेना नेते श्री. आनंदराव अडसूळ यांनी शुभेच्छा दिल्या..! राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानव अधिकार आयोगाच्या *सचिव-महाराष्ट्र राज्य* पदी सुखदेव सस्ते यांची नियुक्ती झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे लाडके शिवसेना *जिल्हा प्रमुख

#श्रीवर्धनमध्ये रस्ते कामाचा शुभारंभ; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश #श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांचा करिष्मा #आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Image
  श्रीवर्धनमध्ये रस्ते कामाचा शुभारंभ; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश , श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांचा करिष्मा आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यातील हुनरवेली, शिरवणे, काळींजे आणि कोंडिवली येथे जिल्हा नियोजन विकास निधीतून रस्ते कामांचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते शनिवारी  झाला. या दरम्यान हुनरवेली व शिरवणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमांना भाजप कोकण विस्तारक अविनाश कोळी, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश मपारा, युवा मोर्चा दक्षिण रायगड अध्यक्ष अमित घाग, भाजप रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, सरपंच प्रचिती घडसे, उपसरपंच मंगेश खैरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री गुरुकृपा संगीत परिवार या संचाने केला  १०१ कार्यक्रमांचा टप्पा पार

Image
  श्री गुरुकृपा संगीत परिवार या संचाने केला  १०१ कार्यक्रमांचा टप्पा पार    पनवेल : गव्हाण कोपर गावातील श्री लालचंद शेठ घरत यांच्या सुनबाई सौ सुप्रिया समीर घरत (खारकोपर) आणि श्री तुषार घरत (चिरले) यांच्या संकल्पनेतुन सुरु केPवलेला हा सांगीतिक संच २०१९ पासुनच लोकांच्या सेवेत रुजु आहे.. कार्यक्रम सुखाचा किंवा दुखाचा.. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व रसिक श्रोते, आयोजक मंडळींची कायम पहिली पसंती असते ती “श्री गुरुकृपा संगीत परिवारचा कार्यक्रम” त्यात सादर होणारे, अभंग, भक्तीगीत, भावगीत, गोळणी, जोगवा, गोंधळ, पोवाडे, शिवगीते, भीमगीते, श्री साईबाबा, स्वामी समर्थांची भजने तसेच दुखःच्या प्रसंगी तर सुप्रियाजिंच्या गाण्याने ऐकणाऱ्यांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या शिवाय राहात नाही.. यासोबतच हा संगीत परिवार लग्न समारंभात मंगलाष्टके, आगरी कोळी गाणी सादर करुन सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करत आहे.. आणि या परिवाराला कायम साथ असते ती सन्माननीय श्री जे. एम. म्हात्रे साहेब मा. नगराध्यक्ष पनवेल, विरोधीपक्ष नेते श्री प्रितम दादा म्हात्रे यांची.      तरी या सुमधुर अशा “श्री गुरुकृपा संगीत परिवारातील सर्व सदस्या

श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम

Image
   श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम पनवेल : श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठया उत्साहाने करण्यात आले. पनवेलचे माजी नगराध्यक्ष, शिक्षणप्रेमी, उद्योगपती, दानशूर जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव प्रितम म्हात्रे यांनी खालापूर तालुक्यात नढाळ येथे श्री गणेश, श्री साई श्रबाबा,म रुती, भगवान श्री शंकर शिवलिंग आणि आई भवानी माता मंदिराची स्थापना केली आहे. मंदिराच्या स्वागत कमानीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिराचा आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पनवेल उरण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील भाविकांनी धार्मिक कार्यक्रम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ही मंदिर म्हणजे धार्मिक लोक आणि भक्तांचे श्रद्धास्थान असून धार्मिक पर्यटन स्थळ झाले आहे. दररोज या ठिकाणी अनेक भक्तजन याठिकाणी दर्शनाला येत असतात, तर येथील असलेल्या सुंदर बागेत अनेक लहान मुले खेळत असतात. या परिसरातील प्रेक्

पनवेल महापालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

Image
  पनवेल महापालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी पनवेल(प्रतिनिधी)   पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांची महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 15) अधिकार्‍यांसह पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.        मान्सूनपूर्व कामांमधील अनेक मार्गी लागली असून काही कामे सुरू आहेत. या कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कळंबोली सेक्टर 7, 8, 10,  खारघरमधील सेक्टर 20,19,16,12,7,6,8 आणि कोपरा गावात पाहणी करून आढावा घेतला. या पाहणी दौर्‍यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, रामजी बेरा, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, राजू शर्मा, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष राविनाथ पाटील, समीर कदम, वासुदेव पाटील, किरण पाटील, गीता चौधरी, साधना पवार, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, प्रवीण बेरा, रमेश खडकर, गजय सिंग, वॉर्ड अधिकारी जितू मढवी, स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांच्यासह