Posts

Showing posts from May 15, 2023

जयेश दादुसचे 'दिल बेधुंद' !

Image
  जयेश दादुसचे 'दिल बेधुंद' ! 'टाईमपास' आणि 'टाईमपास ३' मधून प्रेक्षकांची मने जिंकणारा मलेरिया दादुस अर्थात अभिनेता जयेश चव्हाण आता 'दिल बेधुंद' या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात तो रामण्णा हे साऊथ इंडियन पात्र साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी जयेश म्हणाला, 'रामण्णा हा राजचा (हंसराज जगताप) जिगरी दोस्त आहे. राजचे पान रामण्णाशिवाय हलत नाही. राज कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असला तर त्यावर रामण्णाकडे १०१ उपाय असतात. पण त्याच उपायामुळे राजच्या आयुष्यात काय गमतीजमती घडतात हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. मलेरिया या पात्राने जशी धम्माल उडवली त्याहून अधिक धम्माल रामण्णा उडवून देईल असा मला विश्वास आहे.' टाईमपास चित्रपटात जयेशने आपल्या आगरी बोलीभाषा बोलताना दिसला होता, या चित्रपटात तो साऊथ इंडियन लहेजात बोलताना दिसेल. त्यासाठी त्याने 'चंगू मंगू' या मराठी चित्रपटातील अशोक सराफ यांच्या पात्राचा संदर्भ घेतला आहे. हंसराज जगताप आणि साक्षी चौधरी यांची केमिस्ट्री चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  या दोघांसमवेत

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांचा विकासाचा झंझावात

Image
आमदार आदिती तटकरे यांनी स्थानिक आमदार विकास निधीतून उभारण्यात आलेल्या कुणबीवाडी सामाजिक सभागृहाचे केले उद्घाटन म्हसला : मौजे पांगलोळी, कुणबीवाडी ता. म्हसळा येथे माझ्या स्थानिक आमदार विकास कार्यक्रम निधी अंतर्गत येथील नव्याने उभारण्यात आलेल्या कुणबीवाडी सामाजिक सभागृहाचे उद्घाटन तसेच मौजे आमशेत ता. म्हसळा येथे मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत येथील स्मशान शेड बांधणे व सुशोभीकरण या कामाचे उद्घाटन श्रीवर्धन मतदार संघाच्या अामदार अादिती तटकरे यांनी आले. यावेळी या कार्यक्रम प्रसंगी, सर्व ग्रामस्थ मंडळी, मंडळ महिला, मुंबई मंडळ, पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकासकामे लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य देऊन यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे असे यावेली अामदारांनी सांगितले. मौजे फळसप बौद्धवाडी येते रौप्य महोत्सवी वर्ष तसेच संयुक्त जयंती निमित अामदार आदिती तटकरे यांनी दिल्या शुभेच्छा म्हसळा : मौजे फळसप बौद्धवाडी ता.म्हसळा येथे फळसप बौद्धजन सेवा संघ,संघ मित्र महिला मंडळ,फळसप नवतरुण मित्र मंडळ यांच्या विद्यमाने रौप्य महोत्सवी वर्ष